जर्मनीची 15 अतिरिक्त F-35 लढाऊ विमाने खरेदी करण्याची योजना

0

जर्मनी 15 अतिरिक्त F-35 लढाऊ विमाने खरेदी करेल असे वृत्त पॉलिटिकोने शुक्रवारी या प्रकरणाशी परिचित असलेल्या अनेकजणांचा हवाला देत दिले, ज्यामुळे देशातील अमेरिका निर्मित जेटचा नियोजित ताफा 50 पर्यंत वाढेल.

फ्रान्को-जर्मन लढाऊ विमान FCAS च्या संयुक्त भागीदारीवर जर्मनी आणि फ्रान्स यांच्यातील तणावाच्या दरम्यान हे वृत्त आले आहे, या आठवड्याच्या सुरुवातीला आलेल्या एका बातमीनंतर फ्रान्सला आता यात 80 टक्के उत्पादनातील वाटा हवा आहे.

याच्याशी संबंधित उद्योग क्षेत्रातील एका सूत्राने रॉयटर्सला सांगितले की, या मागणीमुळे कामांची आधी मान्य केलेली विभागणी रद्द होईल आणि कदाचित प्रकल्प त्याच्या पुढील टप्प्यात प्रवेश करण्याआधीच त्यावर निर्णय घेतला जाईल.

रशियाकडून निर्माण झालेला दीर्घकालीन धोका आणि नागरी तसेच लष्करी लवचिकता बळकट करण्याची गरज लक्षात घेऊन, वृत्तात नमूद जर्मन आदेश पुढील दशकात त्यांच्या सामूहिक खर्चाचे उद्दिष्ट उत्पादनाच्या 5 टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी नाटो मित्रराष्ट्रांमधील कराराशी संरेखित होईल. आतापर्यंत, नाटो आपल्या लष्करी क्षमतेसाठी अमेरिकेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.

जर्मन संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की ते सामान्यतः “संसदेत जाण्यापूर्वी संभाव्य खरेदी योजनांबद्दल” भाष्य करत नाहीत.

आतापर्यंत, जर्मनीने 35 F-35 विमाने 85 जुन्या टॉर्नेडो लढाऊ विमानांची जागा घेतील असे आदेश दिले आहेत. टॉर्नेडो विमाने आता टप्प्याटप्याने बंद केली जातील. जर्मन हवाई दलाला बळकट करण्याची स्पष्ट गरज आहे.

एका लष्करी सूत्राने रॉयटर्सला सांगितले की 15 अतिरिक्त F-35 विमानांची संख्या पूर्वीच्या परिस्थितीवर आधारित निर्णयाचा एक भाग होती, मात्र नाटोच्या शस्त्रे आणि सैन्याच्या संख्येसाठीच्या नवीन लक्ष्यांनुसार ही संख्या स्वीकारणे आवश्यक होते.

नवीन उद्दिष्टांनुसार  प्रारंभिक आकडा पुरेसा मोठा नव्हता आणि आवश्यक असलेल्या अतिरिक्त F-35 विमानांची प्रत्यक्षातील संख्या शेवटी आणखी वाढू शकते. अर्थात स्रोताने याला दुजोरा दिलेला नाही.

जर्मन चॅन्सेलर फ्रेडरिक मर्झ यांनी बुधवारी सांगितले की एफसीएएस प्रकल्पाच्या संरचनेबाबत मतभेद आहेत, जे विलंब आणि बौद्धिक संपदा अधिकार यासारख्या समस्यांमधून निर्माण झाले आहे.

टीम भारतशक्ती
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleभारताच्या पाठीशी उभे रहात नेपाळचा पाकिस्तानला इशारा
Next articleवर्षअखेरीस पुतीन यांचा भारत दौरा अपेक्षित, भारताचे लक्ष भूदलावर केंद्रित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here