भारताच्या तटरक्षक दलात ‘ICGS Akshar’ या नव्या जहाजाचा समावेश

0

शनिवारी, पुद्दुचेरीतील कराईकल येथे भारतीय तटरक्षक दलाने ‘ICGS Aksharया नवीन जहाजाचा ताफ्यात अधिकृतरित्या समावेश करुन घेतला, ज्यामुळे भारताच्या सागरी क्षमतेला अधिक बळकटी प्राप्त झाली आहे.

51 मीटर लांबीचे हे ‘फास्ट पेट्रोल व्हेसल’ (FPV) अर्थात जलद गस्ती जहाज, गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL) द्वारे तयार केल्या जाणाऱ्या 8 ‘अदम्य’ श्रेणीतील जहाजांपैकी दुसरे जहाज असून, याची निर्मिती पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आहे.

‘अक्षर’ या नावाचा अर्थ “अमर किंवा अविनाशी” असा असून, हे जहाज भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील सागरी हितसंबंधांचे संरक्षण आणि निगराणी वाढवण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे.

संरक्षण मंत्रालयाने आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, “60% हून अधिक स्वदेशी घटकांसह तयार करण्यात आलेले ICGS अक्षर हे जहाज, भारताच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाअंतर्गत वाढत्या सागरी क्षमतेचे प्रतीक आहे.”

सुमारे 320 टन वजनाचे हे जहाज, 3,000 किलोवॉट क्षमतेच्या दोन डिझेल इंजिनांवर चालते, जे याला अधिकतम 27 नॉट्स (सुमारे 50 किमी/तास) पर्यंतची गती आणि 1500 नॉटिकल मैलांची प्रतिकारशक्ती प्रदान करतात.

हे जहाज, कंट्रोलेबल पिच प्रोपेलर्स (दिशा व वेग अधिक अचूकपणे नियंत्रित करणारे प्रोपेलर्स), 30 मिमी लांबीती CRN91 तोफ, तसेच 12.7 मिमीच्या 2 स्वयंचलित रिमोट-कंट्रोल मशिन गन्स अशा आधुनिक आणि स्वदेशी बनावटीच्या उपकरणांनी सुसज्ज आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनानुसार, या जहाजावर- इंटिग्रेटेड ब्रिज सिस्टम, प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टम आणि ऑटोमेटेड पॉवर मॅनेजमेंट सिस्टम… यासारख्या प्रगत प्रणाली बसवण्यात आल्या आहेत, ज्या त्याच्या ऑपरेशनल कार्यक्षमतेत मोठी वाढ करतात.

हे जहाज कराईकल, पुद्दुचेरी येथे तैनात असेल, आणि याच्या प्रशासकीय तसेच ऑपरेशनल हालचाली, कोस्ट गार्ड रीजन (ईस्ट) चे कमांडर आणि कोस्ट गार्ड डिस्ट्रिक्ट मुख्यालय क्रमांक 13 यांच्यामार्फत नियंत्रीत केल्या जातील.

‘ICGS अक्षर’च्या समावेशामुळे, तटरक्षक दलाच्या सुरक्षा ताफ्याला एक आधुनिक आणि आत्मनिर्भर जोड मिळाली आहे. यामुळे भारताच्या सागरी सीमेचे संरक्षण अधिक मजबूत होण्यास आणि पूर्व किनारपट्टीवरील सुरक्षा अधिक प्रभावीपणे सुनिश्चित करण्यास निश्चीतच मदत मिळणार आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleब्राझीलचे संरक्षणमंत्री लवकरच भारत दौऱ्यावर; संरक्षण भागीदारीला चालना
Next articleपंतप्रधान स्टारमर यांच्या भेटीपूर्वी, यूके-भारत नौदल सरावाला गती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here