एचएएल भारतीय लष्करी दलांना पुरवणार 156 हलकी लढाऊ हेलिकॉप्टर्स

0
एचएएल
एलसीएच प्रचंड

एचएएल (हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड)  कंपनीकडून 156 हलकी लढाऊ हेलिकॉप्टर्स (एलसीएच) खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने (एमओडी) रिक्वेस्ट फॉर प्रपोजल (आर. एफ. पी.) जारी केल्याचे कंपनीकडून सोमवारी जाहीर करण्यात आले. देशांतर्गत उत्पादन वाढवणे आणि संरक्षण क्षेत्रात देशाची वाढती आत्मनिर्भरता दर्शविण्याच्या उद्देशाने हे ‘मेक इन इंडिया’ उपक्रमातील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. एचएएलच्या म्हणण्यानुसार, यापैकी 90 हेलिकॉप्टर्स भारतीय लष्कराला देण्यात येतील, तर उर्वरित 66 भारतीय हवाई दलाकडे सुपूर्द केली जातील.

कंपनीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, “आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की संरक्षण मंत्रालयाने 156 हलकी लढाऊ हेलिकॉप्टर्स (एलसीएच) खरेदीसाठी रिक्वेस्ट फॉर प्रपोजल (आरएफपी) जारी केले आहे. विनंती करण्यात आलेल्या 156 एलसीएचपैकी 90 भारतीय लष्करासाठी (आयए) आहेत तर उर्वरित 66 भारतीय हवाई दलासाठी (आयएएफ) आहेत, असेही निवेदनात नमूद केले आहे.

दुसऱ्यांदा मंत्रालयाची सूत्रे हाती घेतल्यानंतर, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी देशाची सुरक्षा यंत्रणा आणखी मजबूत करण्याबरोबरच संरक्षण उत्पादनात स्वयंपूर्णता साध्य करण्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेवर भर दिला. “आमचे लक्ष सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणावर आणि आपल्या सेवारत आणि निवृत्त सैनिकांच्या कल्याणावर आहे,” याचा त्यांनी पुनरुच्चार केला. यामुळे संरक्षण क्षेत्रात भविष्यात अधिक आत्मविश्वास निर्माण होईल.

एलसीएच प्रचंड

एलसीएच प्रचंड हे एक अष्टपैलू हेलिकॉप्टर आहे. प्रगत हलके हेलिकॉप्टर (एएलएच) ध्रुवशी याचे बऱ्याच प्रमाणात साधर्म्य आहे. याशिवाय प्रचंड हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या काही फिचर्समुळे ते सहजासहजी शत्रूच्या रडारवर येणार नाही. चिलखती संरक्षण प्रणाली, रात्रीच्या वेळी हल्ले करण्याची क्षमता आणि क्रॅश झालेल्या स्थितीतही लँडिंग गियर आहे जे त्याला विविध ऑपरेशनसाठी अनुकूल बनवते. एलसीएचची कमी वजनामुळे तत्काळ टेक ऑफ करणे किंवा लॅन्डींग करण्यातील कुशलता, विस्तारित श्रेणी, उच्च उंचीवरील कामगिरी आणि सर्व हवामानातील लढाऊ क्षमता यामुळे ते  शोध आणि बचाव कार्य (सीएसएआर), शत्रूच्या हवाई संरक्षणाचा नाश (डीईएडी) करणे आणि बंडखोरीविरोधी (सीआय) मोहिमा यासारख्या असंख्य कामगिऱ्या उत्कृष्टरित्या पार पाडू शकते.

प्रचंड हेलिकॉप्टर्स उंचीवरील बंकर-बस्टिंग ऑपरेशन्स, जंगल आणि शहरी भागातील कारवायांसाठी तैनात केले जाऊ शकतात. जमिनीवरील दलांना महत्त्वपूर्ण आधार प्रदान करणे, याव्यतिरिक्त, मंद गतीने फिरणाऱ्या प्रतिस्पर्ध्यांना आणि दुरून हल्ला करत जाणाऱ्या विमानांचा (आरपीए) सामना करण्यासाठी याची रचना करण्यात आली आहे. कॉकपिटची सर्व फिचर्स पायलटच्या हेल्मेटवर डिस्प्ले करण्यात आली आहेत. अत्याधुनिक काचेचे कॉकपिट आणि संमिश्र एअरफ्रेम रचनेसह अत्याधुनिक विमान उड्डयन तंत्रज्ञान देशांतर्गत विकसित केले गेले आहे. यामुळे उत्कृष्ट कामगिरी आणि विश्वासार्हता निश्चितच निर्माण होईल.

टीम भारतशक्ती


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here