MoD signed a ₹13,500 Cr deal with Hindustan Aeronautics Limited (#HAL) to procure 12 Su-30MKI fighter jets. These aircraft will feature 62.6% domestic content, with key components to be manufactured by Indian #defenceindustry. This marks another milestone in India’s journey… pic.twitter.com/v2mjdiVueS
— Ministry of Defence, Government of India (@SpokespersonMoD) December 12, 2024
सुखोई एसयू-30 एमकेआय हे रशियन उत्पादक सुखोईने विकसित केलेले आणि भारतीय हवाई दलासाठी एचएएलच्या लायसन्सखाली तयार केलेले दोन आसनांचे, दुहेरी जेट, बहुउद्देशीय हवाई श्रेष्ठता असलेले लढाऊ विमान आहे. सुखोई एसयू-30 चा एक प्रकार, एमकेआय हे एक जड, सर्व-हवामानासाठी परिपूर्ण, लांब पल्ल्याचे लढाऊ विमान आहे. भारतीय हवाई दलात सध्या 259 एसयू-30 एमकेआय विमाने वापरली जातात, ज्यापैकी बहुतांश एचएएलच्या लायसन्सखाली तयार केलेली असून, भारतीय हवाई दलाच्या लढाऊ ताफ्याचा कणा आहे.
3 डिसेंबर रोजी संरक्षण अधिग्रहण परिषदेने (डीएसी) 21 हजार 772 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या पाच भांडवली अधिग्रहण प्रस्तावांसाठी आवश्यकतेची स्वीकृती (एओएन) मंजूर केली. यामध्ये सुखोई-30 एमकेआय लढाऊ विमानांसाठी प्रगत इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट (ईडब्ल्यूएस) खरेदी करणे समाविष्ट आहे. ईडब्ल्यूएसमध्ये external airborne self-protection jammer pods, next – generation radar warning receivers आणि इतर संबंधित उपकरणांचा समावेश असेल.
जुलैपर्यंत, संरक्षण मंत्रालयाने (एमओडी) अंदाजे 63 हजार कोटी रुपये खर्चून 84 एसयू – 30 एमकेआयची पहिली तुकडी अद्ययावत करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीच्या (सीसीएस) मंजुरीच्या प्रस्तावाला अंतिम रूप दिले होते. ‘सुपर सुखोई’ म्हणून ओळखली जाणारी ही अद्ययावत विमाने पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानांच्या क्षमतेशी स्पर्धा करतील. ही विमाने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि सुरक्षित डेटा लिंक्स वापरून प्रगत स्वायत्त ड्रोनच्या बाजूने काम करण्यास सक्षम बनवण्यासाठी मानव-मानवरहित सांघिक क्षमता वाढवतील. हाती आलेल्या बातम्यांनुसार, 2055 पर्यंत ही प्रगत विमाने चालवण्याचा भारतीय हवाई दलाचा (आयएएफ) मानस आहे.
टीम भारतशक्ती