जपानसोबतच्या राजनैतिक वादात हाँगकाँगचा चीनला पूर्ण पाठिंबा

0
हाँगकाँगचा

सोमवारी, हाँगकाँगचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन ली यांनी सांगितले की, “त्यांचे प्रशासन चीनच्या जपानप्रती असलेल्या राजनैतिक भूमिकेला पाठिंबा देते, तसेच ते घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवतील आणि आवश्यक पावले उचलतील.”

दोन आठवड्यांहून अधिक काळ चीन-जपान संबंधांमध्ये कायम असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीर, हाँगकाँगच्या अधिकाऱ्यांनी सार्वजनिकरित्या भाष्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

चीन-जपान तणाव

जपानच्या पंतप्रधान सनेई ताकाईची यांनी, 7 नोव्हेंबर रोजी, संसदेत केलेल्या विधानांमुळे चीन-जपान वादाला सुरुवात झाली. ताकाईची म्हटले होते की, “लोकशाही पद्धतीने कारभार करणाऱ्या तैवानवर, जर चीनने संभाव्य हल्ला केला, तर त्याला टोकियोकडून लष्करी प्रत्युत्तर मिळू शकते.”

ली यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, “हे अत्यंत चुकीचे वक्तव्य आहे, ज्यामुळे चीन आणि जपानमधील व्यापार संबंध बिघडले आहेत. यामुळे देवाणघेवाणीच्या अनेक प्रभावीतेबद्दल आमच्या मनात शंका निर्माण होते.”

रविवारी, चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी म्हणाले की, “जपानच्या नेत्याने तैवानबद्दल उघडपणे असे चुकीचे विधान करणे हे “धक्कादायक” आहे, ज्यावर चीन स्वतःचा प्रदेश असल्याचा दावा करतो, जरी बेट सरकारच्या हे दावे फेटाळून लावते.”

हाँगकाँगची प्रतिक्रिया

हाँगकाँगने जपानच्या दूतावासासोबतचे व्यवहार थांबवले आहेत, असे जपानी वृत्तसंस्था ‘क्योटो’ने रविवारी सांगितले.

हाँगकाँगने देवाणघेवाण निलंबित केल्या आहे का, या प्रश्नावर ली यांनी थेट उत्तर दिले नाही, मात्र ते म्हणाले, “आमची व्यवस्था राष्ट्राच्या प्रतिष्ठेशी आणि हाँगकाँगवासीयांच्या फायद्यांशी सुसंगत असली पाहिजे.”

शहराच्या सुरक्षा विभागाने 15 नोव्हेंबर रोजी, जपानसाठीचा आपला प्रवास सल्ला अद्ययावत केला आहे, ज्यात जपानला भेट देणाऱ्या किंवा तेथे राहणाऱ्या रहिवाशांना सावध राहण्याचे आणि सुरक्षिततेकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. जपान हे हाँगकाँगच्या रहिवाशांसाठी प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. ‘लुनार न्यू इयर’ सारख्या गर्दीच्या हंगामात, चीनच्या शहरातून, 13 जपानी शहरांकडे दररोज सुमारे 150 विमाने उड्डाण करतात.

जपानी पर्यटन आकडेवारीनुसार, गेल्यावर्षी सुमारे 2.68 दशलक्ष हाँगकाँग रहिवाशांनी जपानला भेट दिली होती, जे एकूण परदेशी पर्यटकांच्या 7.3% होते.

कॅथे पॅसिफिकसह हाँगकाँगच्या अन्य विमान कंपन्यांनी जाहीर केले आहे, ‘गेल्या दोन आठवड्यांत जपानला जाणाऱ्या प्रवाशांना त्यांची बुकिंग्स बदलण्यासाठी किंवा प्रवासाच्या योजना समायोजित करण्याचे पर्याय उपलब्ध करून देतील.’

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleभारत आणि कॅनडाने पुन्हा एकदा व्यापार चर्चा सुरू करण्यावर सहमती दर्शवली
Next articleतैवानजवळ क्षेपणास्त्रे तैनात करण्याच्या योजनेवरून, चीनने जपानला खडसावले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here