हंटर बायडेनला करचुकवेगिरी प्रकरणात 17 वर्षांचा कारावास

0
हंटर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेन याने गुरुवारी फेडरल टॅक्स चार्जेसमध्ये दोषी असल्याचे कबूल केले. हंटरच्या या आश्चर्यकारक कबुलीजबाबमुळे अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या काही आठवडेआधी सुरू होणारा संभाव्य लाजिरवाणा खटला आता टळला आहे.
हंटर बायडेन याच्यावर फौजदारी आरोपांनुसार एलए फेडरल कोर्टहाउसमध्ये खटला चालवला जाणार होता. ड्रग्ज, सेक्स वर्कर्स आणि लक्झरी वस्तूंवर प्रचंड खर्च करताना 1.4 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स एवढा कर भरण्यात अयशस्वी ठरल्याबद्दल त्याच्यावर आरोप ठेवण्यात आले होते.
त्याऐवजी, हंटरने त्याच्यावरील सर्व नऊ गुन्ह्यांसाठी दोषी असल्याचे कबूल केले.
न्यायाधीश मार्क स्कार्सी यांनी बायडेन याला सांगितले की या कबुलीजबाबमुळे त्याला 17 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 4 लाख 50 हजार डॉलर्सपर्यंत दंड भरावा लागेल. यासंदर्भात न्यायालयाने 16 डिसेंबरला शिक्षा सुनावली होती.
फौजदारी खटल्यांमध्ये दोषी असल्याचे कबूल करणारे प्रतिवादी सामान्यतः खटला टाळण्याच्या बदल्यात कमी शिक्षा मिळण्याच्या आशेने सरकारी वकिलांशी आधीच करार करतात.
मात्र या प्रकरणात असे होताना दिसले नाही.
अल्फोर्ड याचिका
त्याआधी, बायडेन याने आरोपांची कबुली देण्याचा प्रस्ताव दिला होता, परंतु चुकीचे कृत्य कबूल करणे टाळले होते. ही “अल्फोर्ड याचिका” नावाची एक असामान्य कायदेशीर युक्ती आहे. सरकारी वकिलांनी या कायदेशीर युक्तीवाद विरोध केला.
काही काळाच्या विश्रांतीनंतर, बायडेनचे वकील ॲबे लोवेल यांनी न्यायाधीशांना सांगितले की बायडेन आपला गुन्हा कबूल करेल. मात्र त्याची शिक्षा कमी करण्यासाठी सरकारी वकिलांशी त्याचा कोणताही पूर्वकरार झालेला नव्हता.
सुनावणीनंतर बायडेन याने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जेव्हा आपल्याला अंमली पदार्थांचे व्यसन लागले होते तेव्हापासून न्यायालयासमोर येऊ शकणाऱ्या लहानात लहान तपशीलापासून आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी त्यांनी दोषी असल्याचे कबूल केले आहे. तो म्हणाला, “गेल्या काही वर्षांत मी त्यांना जो काही त्रास दिला आहे, त्याबदल्यात मी त्यांच्यासाठी इतके नक्कीच करू शकतो.” याशिवाय आपण चुकवलेला करही भरल्याचे त्याने निवेदनात म्हटले आहे.
लोवेल यांनी पत्रकारांना सांगितले की बायडेन त्याच्या शिक्षेविरोधात अपील करू शकतो. बायडेन याने गुन्ह्याची कबुली देण्यासाठी खटल्याला सुरुवात होण्याच्या दिवसापर्यंत का वाट पाहिली? असे विचारले असता त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही.
निवडणूक प्रचार शिगेला पोहोचलेला असताना आठवडाभर चालू शकणारा हा खटला या कबुलीजबाबामुळे आता रद्दबातल ठरला आहे.
राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक
डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातून एकाची निवड करण्यासाठी मतदार 5 नोव्हेंबर रोजी मतदान करणार आहेत. जो बायडेन यांनी त्यांच्या सहकारी डेमोक्रॅट्सच्या दबावामुळे जुलैमध्ये त्यांची पुनर्निवडणुकीची उमेदवारी मागे घेतली.
हंटर बायडेन देखील अमली पदार्थांचा वापर करताना बेकायदेशीरपणे बंदूक खरेदी केल्याबद्दल डेलावेरमधील एका वेगळ्या प्रकरणात दोषी निकालासाठी अपील करत आहे.
त्या प्रकरणाचा अर्थ असा आहे की जर तो दोषी ठरला तर त्याला करचुकवेगिरी प्रकरणात कठोर शिक्षेला सामोरे जावे लागू शकते, कारण तो दुसऱ्यांदा गुन्हेगार ठरेल.
राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी आपल्या मुलाला क्षमा करण्यास नकार दिल्याचे व्हाईट हाऊसने म्हटले आहे.
ऐश्वर्या पारेख
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleRush In Washington To Send $6 Billion Aid To Ukraine As September 30 Deadline Looms
Next articleBlinken: Incumbent On Hamas, Israel To Finalise Gaza Ceasefire

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here