देशाला लाँग-रेंज क्षेपणास्त्र हल्ला करु शकणाऱ्या विमानांची गरज- IAF Chief

0

एअर चीफ मार्शल ए.पी. सिंग, यांनी शुक्रवारी सशस्त्र दलांना आवाहन केले की, त्यांनी मानवी तंत्रज्ञान आणि मानवरहित प्रणाली यांचा संतुलित वापर राखावा, जो लाँग-रेंज आणि उच्च क्षमतेच्या शस्त्रसज्जतेने समर्थित असावा. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “फक्त ड्रोन वापरून युद्ध जिंकता येत नाही,” आणि कोणत्याही लष्करी मोहिमेत राजकीय उद्दिष्टांची स्पष्टता शस्त्रांइतकीच महत्त्वाची असते.

भारतीय हवाई दलाच्या (IAF), अधिकाऱ्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलताना, सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, “हे ऑपरेशन भारताने पूर्ण स्वातंत्र्य, स्पष्ट उद्दिष्टे आणि तीनही सैन्य दलांतील एकत्रित सहभागाने यशस्वीपणे राबवले.”

“हे ऑपरेशन मानवी आणि मानवरहित प्रणालींच्या प्रभावी मिश्रणाचे उदाहरण होते. अनेक सुसज्ज ड्रोन्स जेव्हा एकत्र काम करतात तेव्हा, ते शत्रूची प्रणाली अडचणीत आणतात. मात्र, केवळ ड्रोनवर अवलंबून राहून युद्ध जिंकता येत नाही,” असेही ते यावेळी म्हणाले.

सिंग यांनी S-400 क्षेपणास्त्र प्रणाली आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या लाँग-रेंज रडार्सचा विशेष उल्लेख केला. “हे रडार्स एवढ्या मोठ्या क्षेत्रावर नजर ठेवू शकतात की, शत्रूच्या विमानांना त्यांच्या क्षेपणास्त्र टाकण्याच्या क्षमतेच्या आतही येता येत नाही. शत्रूची विमाने आपल्या हद्दीत येण्याआधीच आमच्या रडारच्या टप्प्यात येत होती, त्यामुळे आमच्याकडे प्रतिउत्तराची संधी होती, हा निश्चितच एक गेम-चेंजर ठरला,” असे त्यांनी सांगितले.

ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरलेल्या अनेक शस्त्रसज्जता (शस्र-प्रणाली) या नवीन आणि प्रामुख्याने स्वदेशी बनवाटीच्या असल्याचे, असे सिंग यांनी अधोरेखित. बहुतांशी वेपन सिस्टीम्स या एकतर भारतातच बनवलेल्या किंवा भारतीय संघांनी समाकलित केलेल्या होत्या.

“मला आशा आहे की, पुढेही आपला कल स्वदेशीलाच अधिक असेल,” असे सिंग म्हणाले.

सिंग म्हणाले की, “भारतीय सैन्याने पाकिस्तानातील आतंकवादी तळे अचूकपणे उद्ध्वस्त केली आणि त्यांच्या रेडार्स, नियंत्रण केंद्रे, विमानतळ हॅंगर आणि विमाने यांवर मोठा हल्ला केला. मात्र,जेव्हा हे उद्दिष्ट पूर्ण झाले, तेव्हा भारताने त्वरित संघर्ष थांबवला.”

सिंग यांनी, एखाद्या मोहिमेतील गोंधळ आणि खुल्या लढाईच्या राजकीय आणि धोरणात्मक परिणांमाबाबत इशारा दिला. “सतत लांबणारा संघर्ष देशाच्या प्रगतीवर परिणाम करतो,” असा युक्तिवाद त्यांनी केला. मात्र, ‘भारताने शक्य तितक्या लवकर संघर्ष कसा सुरू करायचा आणि तो योग्यवेळी कसा संपवायचा याचे उदाहरण घालून दिले आहे,’ असे ते म्हणाले.

त्यांनी इशारा दिला की, “सतत कारवाईची मागणी करणारे बाह्य निरीक्षक बहुतेकदा संघर्षाचे मूळ लक्ष्य आणि उद्दिष्टांबद्दल जागृत नसतात. आपण का युद्ध सुरू केले हे बाहेरच्या जगाला ठाऊक नाही. आता ते उद्दिष्ट विसरून दुसरीकडे लक्ष केंद्रित करत आहेत. त्यांच्या अहंकारामुळे मार्ग बदलत आहे.”

त्यांच्या वक्तव्यांचा एकंदरीत सार काढायचा झाल्यास: आज भारताला- अधिक सुसज्ज मानवयुक्त प्लॅटफॉर्म्स, मानवरहित युद्ध प्रणाली आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची क्षमता असलेल्या विमानांची गरज आहे. तसेच एकात्मिक हवाई संरक्षणासह, संतुलित लष्कर आधुनिकीकरणाची गरज आहे. राजकीय उद्दिष्टांची स्पष्टता, मर्यादित आणि नियोजित कारवाई, आणि राष्ट्रीय हिताशी सुसंगत निर्णय घेणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleWhy Pakistan Terror Groups Are Shifting Bases to Khyber Pakhtunkhwa
Next articleसंशयित ड्रग्जवाहू बोटीवर अमेरिकन सैन्याने केलेल्या हल्लात 3 जण ठार: ट्रम्प

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here