‘इम्रान खान यांची प्रकृती ठीक, पण ते विलगीकरणात’ असल्याचा बहिणीचा खुलासा

0

तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची प्रकृती चांगली आहे, परंतु त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले असल्याने मानसिक ताणाने ग्रस्त आहेत, असे त्यांच्या बहिणीने एका दुर्मिळ पण निरीक्षणाखालील भेटीनंतर मंगळवारी सांगितले. अनेक आठवड्यांच्या प्रतिबंधित प्रवेशानंतर ही भेट झाली. मात्र त्यामुळे त्यांच्या आरोग्याबद्दल चिंता वाढली होती.

खान यांच्या तीन बहिणींपैकी डॉक्टर असलेल्या उज्मा खानम या बहिणीला आदियाला तुरुंगात त्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली. ही परवानगी असलेल्या त्या कुटुंबातील एकमेव सदस्य होत्या. तुरुंगाबाहेर खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) पक्षाचे समर्थक त्यांच्या तुरुंगवासाबद्दल निषेध करण्यासाठी जमले होते.

“ते शारीरिकदृष्ट्या निरोगी आहे,” असे खानम यांनी पत्रकारांना सांगितले. “पण त्यांना नेहमीच आत ठेवले जाते आणि ते फक्त थोड्या काळासाठी बाहेर पडतात. त्यांचा कोणाशीही संपर्क नाही.” त्यांनी पुढे सांगितले की कडक देखरेखीखाली ही भेट पार पडली. भेटीच्या वेळी मोबाईल डिव्हाइसेसना परवानगी नव्हती आणि त्यांनी भेटीबाबत अधिक तपशील सांगण्यास नकार दिला.

मर्यादित प्रवेशाबाबत कुटुंबाला चिंता

73 वर्षीय खान यांना भ्रष्टाचाराशी संबंधित अनेक प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आल्यानंतर ऑगस्ट 2023 पासून तुरुंगात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या कुटुंबियांनी आणि पीटीआय सदस्यांनी असा दावा केला आहे की त्यांची भेट घेण्याचे न्यायालयाचे आदेश असले तरी, गेल्या काही आठवड्यांपासून त्यांच्या नियमित भेटींवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

अधिकाऱ्यांनी या आरोपांचा इन्कार केला आहे, त्यांच्या मते खान यांना एखाद्या प्रमाणित कैद्याचे सर्व हक्क मिळतात. गृह राज्यमंत्री तलाल चौधरी म्हणाले की भेटीबाबतचे निर्णय “तुरुंग अधिकाऱ्यांवर अवलंबून असतात, सरकारवर नाही.”

गेल्या आठवड्यात, खान यांच्या मुलाने रॉयटर्सला सांगितले की तीन आठवड्यांहून अधिकाळ कुटुंबाचा त्यांच्याशी थेट किंवा पडताळणीयोग्य कशाही प्रकारचा संपर्क नव्हता आणि त्यांच्या स्थितीबद्दल “काहीतरी भयंकर असे” लपवले जाऊ शकते अशी भीती होती. कुटुंबाने वारंवार खान यांच्या वैयक्तिक डॉक्टरकडे त्यांची तपासणी करण्याची परवानगी मागितली आहे, मात्र एक वर्षाहून अधिक काळ ही विनंती नाकारली गेली आहे.

मानवाधिकार गटाकडून माणुसकीच्या वर्तनाचे आवाहन

या सगळ्या प्रकाराबद्दल पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाने सोशल मीडियावर चिंता व्यक्त करत म्हटले की त्यांना प्रतिबंधात्मक अटकेबद्दल आणि कुटुंबाच्या भेटींवर मर्यादा आणल्याबद्दल वृत्तांबद्दल “गंभीरपणे चिंता” आहे. त्यांनी नातेवाईक आणि कायदेशीर सल्लागारांना नियमित प्रवेश देणे हे “विलगीकरण आणि अटकेच्या अधिकारांचा गैरवापर करण्यापासून मूलभूत संरक्षण” असल्याचे म्हटले आणि अधिकाऱ्यांना मानवी वागणुकीसाठी संवैधानिक आणि आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करण्याचे आवाहन केले.

2018 ते 2022 पर्यंत पंतप्रधान म्हणून काम केलेले खान तुरुंगवासात असूनही पाकिस्तानच्या सर्वात प्रभावशाली राजकीय व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांच्या पीटीआय पक्षाचा दावा आहे की त्यांच्याविरुद्धचे कायदेशीर खटले त्यांना राष्ट्रीय राजकारणापासून दूर करण्याच्या व्यापक मोहिमेचा एक भाग आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुटसह)
+ posts
Previous articleभारत, EU, IOR देश समुद्राखालील डिजिटल केबल्सच्या सुरक्षेवर चर्चा करणार
Next articleब्रिटनचे पंतप्रधान स्टारमर जानेवारीच्या अखेरीस चीनला भेट देण्याची शक्यता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here