बंगालच्या उपसागरात भारत आणि बांगलादेशचे उच्चस्तरीय नौदल सराव

0
भारत
भारतीय नौदलाची युद्धनौका 'INS रणवीर' आणि बांगलादेशी नौदलाचा 'BNS अबू उबैदाह', बोंगोसागर 2025 या नौदल सरावात सहभागी

भारत आणि बांगलादेशने या आठवड्यात, बंगालच्या उपसागरामध्ये संयुक्त उच्चस्चरीय नौदल सराव आणि समन्वित गस्त आयोजित केली, ज्यामुळे दोन्ही नौदलांमधील परस्पर क्रियाशीलता, तांत्रिक नियोजन, समन्वय, आणि माहिती-सामायिकरण यांच्यातील देवाणघेवाण सुधारुन, समुद्री ऑपरेशन्स सुलभतेने पार पाडली जाऊ शकते.

या सरावामध्ये, बांगलादेश आणि भारतीय नौदलाच्या ‘INS रणवीर’ आणि ‘BNS अबू उबायदाह’ या युद्धनौकी समील झाल्या होत्या, असे भारतीय नौदलाने सांगितले. दोन्ही युद्धनौकांनी यावेळी विविध उच्च दर्जाचे सराव पार पाडले, ज्यामध्ये पृष्ठभागावरील फायरिंग, तांत्रिक डावपेच, पाण्याखालील उपयायोजनांची पूर्तता तसेच सर्च आणि सिझर (VBSS) यासारख्या ऑपरेशन्सचा समावेश होता.

“दोन्ही नौदलांमधील सुधारित समन्वय सराव, हा सागरी क्षेत्रातील सुरक्षा आणि स्थिरतेसाठी आणि भारताच्या ‘सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास’ (SAGAR) या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी पुरक असून, जागतिक सुरक्षा आव्हानांचा सामना करण्याच्या सामायिक वचनबद्धतेचे प्रतिक आहे,” असे भारतीय नौदलाने सांगितले.

‘या सरावामुळे दोन्ही नौदलांना तांत्रिक नियोजन, समन्वय आणि माहिती-सामायिकरणामध्ये अधिक चांगले संबंध विकसित करण्याची संधी मिळाली, ज्यामुळे भविष्यात समुद्री ऑपरेशन्स सुलभतेने पार पाडणे शक्य होईल’, असेही त्यांनी म्हटले.

दोन्ही देशांच्या नौदलांमधील समन्वय आणि विश्वास या सरावामुळे वृद्धिंगत झाला, ज्यामुळे संयुक्त ऑपरेशन्स पार पाडण्याची क्षमता आणि उद्भवणाऱ्या समुद्री धोक्यांना त्वरित प्रतिसाद देण्याची क्षमतेचा सखोल आढावा घेता आला. संरक्षण मंत्रालयानुसार, ‘भारतीय आणि बांगलादेशी नौदलांमधील हा वाढता समन्वय, सागरी क्षेत्रातील विकसित होत असलेल्या सुरक्षा आव्हानांचा सामना करण्यासाठीची त्यांची वचनबद्धता दर्शवितो.’

टीम भारतशक्ती


Spread the love
Previous articlePortugal Rethinks F-35 Purchase, May Consider European Options
Next articleपंतप्रधान मोदी श्रीलंका दौऱ्यावर जाण्याची शक्यता; भेटीमधून काय अपेक्षित?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here