भारतीय हवाई दलातील सुवर्ण युगाचा अंत; MiG-21 फायटरला अखेरचा निरोप

0

आज (शुक्रवारी) दुपारी, चंदीगडचे आकाश एका ऐतिहासिक कॅन्व्हासमध्ये बदलले, जेव्हा एअर चीफ मार्शल ए.पी.सिंग (कॉल साईन बादल 3) यांच्या नेतृत्वाखाली, 6 MiG-21 बायसन जेट्स गर्जना करत हवेत झेपावली. एकीकडे शानदार वाटणाऱ्या मात्र तितक्यात उदासीन अशा या उड्डाणांनंतर, भारतीय हवाई दलातील सहा दशकांचा एक जुना अध्याय अखेर संपुष्टात आला.

पाकिस्तानविरुद्धच्या चार युद्धांमध्ये दमदार कामगिरी दाखवणाऱ्या आणि भारतीय हवाई दलातील वैमानिकांच्या अनेक पिढ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या, जेट मिकोयान-गुरेविच मिग-21 ने आज अखेरचे ऑपरेशनल उड्डाण केले.

या फॉर्मेशनमध्ये हवाई दलाच्या प्रमुखांसोबत, स्क्वॉड्रन लीडर प्रिया शर्मा यांनीही उड्डाण केले. त्या भारताच्या सातव्या महिला लढाऊ वैमानिक अूसन, त्यांनी राजस्थानच्या बिकानेरमधून मिग-21च्या ऐतिहासिक निरोपात सामील होण्यासाठी उड्डाण केले. “हे विमान एकदा नाही तर अनेकदा निरोप घेण्यास पात्र होते,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, वरिष्ठ लष्करी नेतृत्वासह यावेळी उपस्थित होते. “मिग-21 हे केवळ एक विमान नव्हे, तर भारत आणि रशियामधील सखोल धोरणात्मक भागीदारीचे प्रतीक आहे,” असे सिंह यावेळी म्हणाले. “आज आपण त्याला निरोप देतेवेळी, लष्करी विमान वाहतुकीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लक्षात ठेवला जावा, असा एक अध्याय संपवतो आहोत,” असे त्यांनी पुढे जोडले.

लँडिंगनंतर हवाई दलातील या ऐतिहासीक फायटर्सना, पाण्याच्या तोफांची सलामी देण्यात आली

जागतिक स्तरावर, 11,500 हून अधिक मिग-21 विमाने तयार करण्यात आली; त्यापैकी 850 मिग विमानांनी भारतीय हवाई दलात आपली सेवा प्रदान केली. हे या विमानांची “लोकप्रियता, विश्वासार्हता आणि बहुआयामी क्षमतेचे” प्रतीक आहे, असे संरक्षणमंत्र्यांनी नमूद केले.

एप्रिल 1963 मध्ये, भारतीय हवाई दलात दाखल झाल्यापासून, मिग-21 विमाने एअरफोर्सचा मजबूत कणा बनली. मिग-21, 23, 25, 27 आणि 29 अशा पाच प्रकारची विमाने एकत्रितपणे सेवेत असताना, भारतीय हवाई दलाला “मिग एअर फोर्स” असे टोपणनाव प्राप्त झाले. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)ने, भारतात परवान्याअंतर्गत बनवलेल्या या मिग विमानांनी, केवळ देशाच्या हवाई ताकदीला बळकटी दिली नाही, तर स्वदेशी एरोस्पेस उत्पादनातही प्रगती केली.

साधे तरीही शक्तिशाली, परवडणारे पण प्राणघातक असे हे मिग-21, केवळ एक लढाऊ विमान नव्हते, तर राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक होते. सहा दशकांहून अधिक काळ आपल्या अतुलनीय कामगिरीने भारतीय आकाशाचे संरक्षण करणारे खंबीर सेनापती होते.

मूळ लेखक- ध्रुव यादव

+ posts
Previous articleCounter-Insurgency, Jungle Warfare Masterclass: Meet The CIJWS Commandant. Vairengte Warriors, Episode I
Next articleमोदी, पुतिन यांच्याबाबतचा NATO प्रमुखांचा दावा चुकीचा; भारताची प्रतिक्रिया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here