पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसीय फ्रान्स दौऱ्यावर असून, ‘या भेटीमुळे भारत-फ्रान्स संबंध नवी उंची गाठतील’, असे भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी म्हटले आहे. ‘पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत, दोन्ही देशातील संबंध निश्चितच अधिक दृढ होतील,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
भागीदारी मजबूत करणे
मिस्री यांनी सांगितले, की “या दौऱ्यामुळे संरक्षण आणि सुरक्षा, अवकाश सहकार्य, नागरी अणु सहकार्य, आर्थिक सहकार्य अशा विविध धोरणात्मक क्षेत्रांमध्ये, भारत आणि फ्रान्स यांच्याचील दीर्घकालीन भागीदारी आणखी दृढ होईल. तसेच नवे उभरते तंत्रज्ञानांन, नवे उर्जा प्रकल्प, पर्यावरण संवर्धन, आरोग्य, शिक्षण आणि संस्कृती आदी क्षेत्रांच्या विकासावर यावेळी बहुमूल्य चर्चा होईल. या दौऱ्याुमुळे दोन देशांमधील आणि दोन्हीकडच्या लोकांमधील अपूर्व संबंधांना अधिक बळकटी मिळेल.”
द्विपक्षीय बैठका
पंतप्रधानांनी एस्टोनियाचे राष्ट्राध्यक्ष अलार कॅरिस आणि अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हॅन्स यांचीही या दौऱ्यादरम्यान भेट घेतली.
भरीव परिणाम
मोदींच्या या दौऱ्यातील चार मुख्य क्षेत्रांमधल्या “भरीव परिणामांविषयी”, मीडियाशी संवाद साधताना परराष्ट्र सचिवांनी सांगितले, “आता तुम्ही म्हणू शकता की, भारत-फ्रान्स संबंधांनी प्रत्यक्षात नवी उंची गाठली आहे.” त्यांनी यावेळी, AI Action Summit 2025 च्या, संपूर्ण सत्रातील मोदींच्या भाषणाचा उल्लेखही केला.
“डिजिटल विज्ञान आणि स्टार्टअप सहकार्यावरही, या भेटीचे सकारात्मक परिणाम झाले आहेत. नागरी अणु ऊर्जा सहकार्याच्या क्षेत्रात, दोन्ही बाजूंनी- छोटे मॉड्यूलर रिएक्टर (SMRs) आणि अॅडव्हान्स्ड मॉड्यूलर रिएक्टर (AMRs) सह-डिझाइन करण्यासाठी, तसेच सह-निर्मीती आणि सह-उत्पादन करण्यासाठी एक विशेष जाहीरनामा अंतिम केला गेला आहे. या क्षेत्रातील संशोधक आणि व्यावसायिकांची क्षमता वाढवण्यासाठी, दोन्ही देश समान सहकार्य करणार आहेत,” अशी माहिती मिस्री यांनी दिली.
त्यांनी ‘दोन्ही देशांतील संस्कृती संवर्धन आणि नागरिकांच्या हितसंबंधातील’ भरीव परिणामांकडेही लक्ष वेधले.
SMRs आणि AMRs चे सह-उत्पादन
परराष्ट्र सचिवांनी स्पष्ट केले, “जर आपण सुरुवातीपासूनच, SMRs आणि AMRs च्या सह-डिझाइन, सह-उत्पादन आणि सह-विकसनामध्ये सामील झालो, तर ते भारतातील आधीपासून अस्तित्वात असलेल्या आण्विक घटक आणि आण्विक ऊर्जा प्रकल्पांसाठी असलेल्या औद्योगिक परिसंस्थेचा लाभ घेऊ शकेल, आणि त्याचा दोन्ही देशांना फायदा होईल.”
“AI मध्ये होणरी क्रांती आणि तिच्या ऊर्जा मागणीच्या दृष्टीने, SMRs आणि AMRs च्या सहकार्य आणि विकासाचे हे विशेष क्षेत्र, भारत-फ्रान्स सहकार्यासाठी भविष्याच्या दृष्टीने एक आशादायक मार्ग आहे,” असेही ते म्हणाले.
सांस्कृतिक संबंध मजबूत करण्यासाठी करार
मीडियाशी संवाद साधताना मिस्री सांगितले की, ‘दोन्ही नेत्यांनी भारताचे राष्ट्रीय संग्रहालय आणि फ्रान्स म्युझीयम डेव्हलपमेंट यांच्यातील कराराच्या तात्काळ अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत.’
दोन्ही बाजूंनी तरुणांसाठीची व्यावसायिक योजना कार्यान्वित झाली आहे. ही योजना व्यावसायिकांना, कौशल्य संपन्न कामगारांना आणि विद्यार्थ्यांना, कायदेशीर गतीशीलता आणि प्रोत्साहन देण्यास मदत करेल.
मोदी आणि मॅक्रॉन यांची ITER सुविधेला भेट
परराष्ट्र सचिवांनी सांगितले की, ‘दोन्ही नेत्यांनी कॅडारचे येथील आंतरराष्ट्रीय थर्मोन्यूक्लियर प्रायोगिक अणुभट्टी सुविधा, ITER ला भेट दिली.’
परराष्ट्र मंत्रालयाने अशा प्रकारे त्यांच्या ITER भेटीचे महत्त्व अधोरेखित केले. “कोणत्याही राज्यप्रमुखाची किंवा सरकारच्या प्रमुखांची ITER ला दिलेली ही पहिली भेट होती – आज जगातील सर्वात महत्वाकांक्षी फ्यूजन ऊर्जा प्रकल्पांपैकी एक.”
MEA ने म्हटले आहे की, नेत्यांनी ITER च्या प्रगतीचे कौतुक केले, ज्यामध्ये जगातील सर्वात मोठ्या Tokamak च्या असेंब्लीचा समावेश आहे, जेथे बर्निंग प्लाझ्मा तयार करून, समाविष्ट करून आणि नियंत्रित करून शेवटी 500 MW फ्यूजन पॉवर तयार केली जाईल.
उल्लेखनीय म्हणजे, गेल्या दोन दशकांत या प्रकल्पात योगदान देणाऱ्या सात ITER सदस्यांपैकी एक, म्हणून भारताचा समावेश आहे.
ITER प्रकल्पात भारताचा सहभाग
अंदाजे, 200 भारतीय शास्त्रज्ञ आणि सहकारी, तसेच L&T, Inax India, TCS, TCE, HCL Technologies यांसारख्या प्रमुख उद्योग कंपन्या ITER प्रकल्पात सहभागी आहेत.
दोन्ही नेत्यांनी सीईओ फोरमला संबोधित केले
पंतप्रधानांनी दोन्ही देशांतील व्यापारी नेत्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे कौतुक केले, ज्यामुळे भारत-फ्रान्स संबंधांमध्ये सान्निध्य आले आहे आणि द्विपक्षीय संबंधांचा प्रचार झाला आहे.
त्यांनी यावेळी, भारतात लागू होणाऱ्या आर्थिक सुधारणांच्या पुढील पिढीची ओळख करुन दिली आणि फ्रेंच कंपन्यांना, भारताच्या वाढत्या विकास मार्गात- संरक्षण, नागरी अणु शक्यता, विमा आणि अन्य प्रगत उत्पादन क्षेत्रांत, नवीन संधी शोधण्याचे आमंत्रण दिले.
राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांची सहमतीदर्शक कृती
मिस्री यांनी, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या काही अपूर्व आणि सहमतीदर्शक इशाऱ्यांचा यावेळी उल्लेख केला.
त्यांनी सांगितले की, ”पंतप्रधान मोदींनी जुलै 2023 च्या पॅरिस दौऱ्यात जाहीर केलेल्या, मार्सेल्समधील नवीन भारतीय वाणिज्य दूतावासाचे त्यांच्यासोबत केलेले उद्घाटन, हे मॅक्रॉन यांच्या सहकार्याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल.”
“माझ्या आठवणीत, खूप कमी वाणिज्य दूतावासांचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान यांनी एकत्रितपणे उद्घाटन केले आहेत, त्यामुळे तो प्रसंग निश्चीतच एक विशेष होता. यामुळे पुन्हा एकदा दोन्ही नेत्यांमधील मैत्री आणि सहकार्याची सद्भावना दर्शवते.”
त्यांनी सांगितले की, सीईओ फोरमच्या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी फ्रेंच राष्ट्रपतींच्या विमानातून मार्सेल्सपर्यंत एकत्र प्रवास केला.
“ही राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांची एक अभूतपूर्व कृती होती आणि हे प्रतिक आहे दोन्ही नेत्यांच्या एकमेकांवरील दृढ विश्वासाचे आणि भविष्यातील संबंध बळकटीचे.”
परराष्ट्र सचिवांनी सांगितले की, ‘भारत आणि फ्रान्सने त्रिकोणीय विकास सहकार्याबाबत, एका संयुक्त हेतू जाहीरनाम्याची घोषणा केली आहे.’
Indo-Pacific मधील सहकार्य
“आमच्या इंडो-पॅसिफिकमधील सहकार्याचा उद्देश, या प्रदेशातील देशांना त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि विकासासाठी उपाय प्रदान करणे आहे, जे भारत-फ्रान्स इंडो-पॅसिफिक रोडमॅपच्या पुढाकाराचे अनुसरण करते. या भूमिकेचा आणखी एक उद्देश म्हणजे, दोन्ही देशांनी प्राधान्य दिलेल्या सर्व क्षेत्रांमध्ये विकासाचा टिकाऊ मार्ग तयार करणे आणि पर्यावरणची काळजी घेऊन, सगळ्या क्षेत्रांमध्ये आवश्यक उपाययोजनांचा आराखडा तयार करणे हा आहे, ज्यामध्ये डिजिटल परिवर्तन, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, सौर ऊर्जा, हरित तंत्रज्ञान, जैवविविधतेचे संरक्षण, महिला सशक्तीकरण, शिक्षण, आरोग्य, पोषण, जल आणि स्वच्छतेचा समावेश आहे.”
भारत पुढील AI समिटचे आयोजन करणार
‘भारताने पुढील वर्षी, AI समिट आयोजित करण्याबाबत दिलेल्या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून, 2026 हे वर्ष भारत-फ्रान्स नव-निर्मितीचे वर्ष म्हणून निश्चित केले आहे,’ असेही ते म्हणाले.
धोरणात्मक सहकार्य
त्यांनी सांगितले की, ‘दोन्ही नेत्यांनी सखोल आणि वैविध्यपूर्ण अशा सर्व धोरणात्मक सहकार्यांचा संपूर्ण आढावा यावेळी घेतला.’
“आमचे धोरणात्मक सहकार्य नव्या युगात प्रवेश करत आहे, जे नवीण्यता, विज्ञान आणि तंत्रज्ञानावर केंद्रित आहे. दोन्ही देशांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर एक स्वतंत्र जाहीरनामा स्वीकारला आहे, ज्यामध्ये या क्षेत्रातील आपली मुख्य उद्दिष्टे ओळखली जातील आणि AI संदर्भात भारत आणि फ्रान्स दरम्यान असलेल्या मोठ्या संरेखनाच्या दृष्टीने सहकार्याच्या शक्यता अन्वेषित केल्या जातील. उदाहरणार्थ, सार्वजनिक हितासाठी सुरक्षित, विश्वासार्ह आणि सुरक्षित AI च्या विकासाला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने दोन्ही देशातील समान वचनबद्धता.”
“भारत-फ्रान्स संबंध, ज्याला धोरणात्मक सहकार्य म्हणून 25 वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यात 2047 पर्यंतच्या रोडमॅपचे तीन मुख्य स्तंभांनुसार, सातत्यपूर्ण आणि सर्वांगीण प्रगतीच्या दृष्टीने विभाजन केले आहे. ज्यामध्ये, सुरक्षा आणि सार्वभौमत्वासाठी सहकार्य, जमीन सहकार्य, आणि नागरी हिंतसंबांधासाठीचे सहकार्य यांचा समावेश आहे,” अशी माहिती मिस्री यांनी दिली.