दहशतवाद विरोधी आसियान संरक्षणविषयक बैठक यंदा भारतात

0
आसियान
8व्या आसियन संरक्षण मंत्र्यांच्या प्लस बैठकीला (ADMM-PLUS) संबोधित करताना, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

आसियान गटाच्या संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीसह (ADMM-plus) तज्ज्ञ कृती गटाची (EWG) दहशतवाद विरोधातील चौदावी बैठक नवी दिल्लीत 19 आणि  20 मार्च 2025 दरम्यान होणार असून भारत व मलेशिया या बैठकीचे सहअध्यक्ष असतील. या बैठकीला दहा आसियान देश (ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओ लोकशाही प्रजासत्ताक, म्यानमार, फिलिपिन्स, व्हिएतनाम, सिंगापूर व थायलंड) आणि आठ संवाद भागीदार (ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कोरियन प्रजासत्ताक, जपान, चीन,  अमेरिका, रशिया) याशिवाय तिमोर लेस्ट व आसियान मंत्रालय देखील या बैठकीत सहभागी होईल.

भारत प्रथमच दहशतवाद विरोधी तज्ञ कृती गटाचा (EWG) सह अध्यक्ष असणार आहे. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग 19 मार्च 2025 रोजी होणाऱ्या उदघाटन समारंभात आपले बीजभाषण करतील.

सहभागी देशांच्या संरक्षण दलांच्या प्रत्यक्ष अनुभवांना सामायिक करण्यासाठी ADMM plus या व्यासपीठाचा उपयोग होणार आहे. सध्या त्यांचा भर पुढील मुद्द्यांवर असेल – दहशतवाद विरोध, सागरी सुरक्षा, मानवतावादी मदतकार्य व आपत्ती व्यवस्थापन, शांतता राखण्यासाठीच्या मोहीमा, लष्करी मोहीम किंवा संबंधित परिस्थितीत उपयोगी वैद्यकशास्त्र, मानवतावादी भूसुरुंग निवारण कृती व सायबर सुरक्षा. या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्य घडवून आणण्यासाठी तज्ञ कृती गटांची (EWG) स्थापना केली गेली आहे.

दहशतवाद विरोधी तज्ञ कृती गटाच्या (EWG) सध्याच्या 2024 ते 2027 या कार्यकाळातील उपक्रमांची योजना करण्यासाठी आयोजित केलेली ही पहिली बैठक आहे. दहशतवाद व अतिरेकीवादाने उभ्या केलेल्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्यावर या बैठकीतील चर्चेत भर दिला जाईल. आसियान देशांच्या व त्यांच्या संवादक भागीदार देशांच्या संरक्षण दलांच्या प्रत्यक्ष अनुभवांना या बैठकीत सामायिक केले जाईल. यावर आधारित 2024 ते 2027 या कार्यकाळातील पुढील उपक्रम/प्रशिक्षण-सराव / कार्यशाळा/चर्चासत्रे ठरवण्यात येतील.

सह-अध्यक्ष म्हणून, भारत आणि मलेशिया धोरणात्मक उद्दिष्टांची रूपरेषा तयार करतील, धोरणात्मक मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करतील आणि नियमित बैठकांद्वारे ईडब्ल्यूजीच्या प्रगतीवर देखरेख ठेवतील. तीन वर्षांच्या अध्यक्षपदाची सांगता बहुराष्ट्रीय दहशतवादविरोधी सरावात होईल, ज्यामध्ये व्यावहारिक सहकार्यात झालेल्या प्रगतीचे मूल्यांकन केले जाईल.

टीम भारतशक्ती

 


Spread the love
Previous articleUS Deploys Nuclear Submarine On Australia’s Strategic Coast Under AUKUS
Next articleRajnath Singh, Tulsi Gabbard Hold Talks To Strengthen Defence Ties

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here