‘मॉडर्न वॉर’चा सामना करण्यासाठी, भारताला आधुनिक तंत्रज्ञानाचीच गरज

0
आधुनिक
IIT Bombay आयोजित, 'ICONS 2025' या संरक्षण सेमिनारमध्ये, IITB चे प्राध्यापक सचिन पटवर्धन, एअर व्हाईस मार्शल- धनंजय व्ही. खोत यांना सन्मानित करत आहेत.

IIT बॉम्बे आयोजित संरक्षण सेमिनार- ‘ICONS 2025’ चा आज शुभारंभ झाला. ‘संरक्षण क्षेत्रासाठी आत्याधुनिक आणि वेगवान तंत्रज्ञान’ अशी या दोन दिवसीय सेमिनारची थीम आहे. भारताच्या संरक्षण क्षेत्राशी निगडीत भविष्यातील धोके आणि त्यावर मात करण्यासाठीच्या आधुनिक उपाययोजना हा मुख्य केंद्रबिंदू ठेवत, भारतीय लष्कर आणि आयआयटी बॉम्बेच्या तज्ज्ञांनी उपस्थितांना मार्गदर्शित केले. तंत्रज्ञानातील नवकल्पना, परस्पर सहकार्याचे पर्याय आणि संरक्षण क्षेत्रासाठी IIT बॉम्बे फॅकल्टी आणि स्टार्टअप्सचे संशोधन कार्य तसेच उत्पादने, याविषयी सविस्तर आढावा घेण्यात आला.

आयआयटी बॉम्बेचे प्राध्यापक, तज्ज्ञ धोरणकर्ते आणि लष्करी अधिकारी, यांच्यात संवाद आणि ज्ञानाची देवाणघेवाण वाढवणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून, संरक्षण क्षेत्रातील उदयोन्मुख सुरक्षा धोके आणि त्यावरील उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी, एक व्यासपीठ म्हणून या सेमिनारकडे पाहिले जात आहे.

भारताच्या संरक्षण क्षेत्राशी निगडीत अनेक प्रकल्पांमध्ये आयआयटी बॉम्बेचे भरीव योगदान आहे, ज्यामध्ये High frequency x-ray पॉवर सोर्स, नौदल उपकरणे आणि Reliability analyzer सॉफ्टवेअर, उच्च उर्जा सामग्री (HEM) संश्लेषण, स्मार्ट ड्रोन आणि एकात्मिक गतीशील प्रणाली इत्यादींचा समावेश आहे.

कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात, प्राध्यापक सचिन पटवर्धन (Dean R&D, IIT Bombay) यांनी आयआयटी बॉम्बेने गेल्या काही वर्षांत, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा आणि यशस्वी उपक्रमांचा आढाव घेतला. तसेच भविष्यात भारतीय लष्कर आणि DRDO (Defence Research and Development Organisation) सोबत, आयआयटी बॉम्बे करत असलेल्या तसेच करु इच्छित असलेल्या तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध प्रकल्पांविषयी देखील माहिती दिली.

जनरल मनोज पांडे (Chief of the Army staff, Indian Army) यांनी देखील भारतासमोरील सुरक्षा आव्हानांचा आणि त्यासंबधी उपाययोजनांचा आढाव घेतलाा. “आजच्या काळात फक्त सीमेवर सुरक्षा पहारा देणे पुरेसे नाहीये, तर सध्या जलद गतीने वाढत असलेले सायबर हल्ले, हॅकिंग, Malware attacks यापासून देशाला सुरक्षित ठेवण्याची अधिक गरज आहे,” असे जनरल पांडे यांनी अधोरेखित केले. अशाप्रकारच्या ‘प्रगत टेक हल्ल्यांना’ प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराला आधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाची गरज असून, लष्कर त्यादृष्टीने उपाययोना आखण्यावर भर देत असल्याचेही, त्यांनी यावेळी सांगितले.

देशाच्या संरक्षण क्षेत्रात झपाट्याने विकसीत होत असलेल्या ‘मानवी आणि मानवविरहीत’ प्रणाली तसेच आधुनिक ड्रोन प्रणालींचा भविष्यातील वाढता वापर, याचाही जनरल पांडे यांनी यावेळी आढावा घेतला.

“भारताला संरक्षण प्रणालीच्या विकासामधील अन्य देशांवरचे अवलंबन कमी करुन, ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत स्वदेशी प्रणाली विकसित करण्याची आवश्यकता आहे आणि भारत त्यादृष्टीने प्रयत्न देखील करत आहे,” असे त्यांनी यावेळी नमूद केले.

सायबर अटॅक्स, AI tools चा गैरवार तसेच प्रॉक्सी वॉरचा हवाला देत, “देशाला ‘मॉडर्न वॉर’चा सामना करण्यासाठी ‘मॉडर्न डिफेन्स टेक्नॉलॉजी’ची गरज आहे,” असे ते यावेळी म्हणाले.

एअर व्हाईस मार्शल- धनंजय व्ही. खोत यांनी कार्यक्रमादरम्यान, ‘पुढील पिढीच्या संरक्षण उपक्रमांवर’ प्रकाश टाकला. संरक्षण क्षेत्राचे बदलत गेलेले स्वरुप, गेल्या काही दशकांत तंत्रज्ञानामध्ये झालेला अमूलाग्र बदल, इव्हॉलव्हिंग नेचर ऑफ वेलफेअर अशा अनेक मुद्द्यांविषयी मार्शल डी.व्ही. खोत यांनी चर्चा केली.

”पूर्वी फक्त सीमारेषेवर होणारे युद्ध आता आणि टेक-वॉरच्या माध्यमातून आपल्या दारात आले आहे, ज्याचा सामना करण्यासाठी आपण आधुनिक तंत्रज्ञानाची वृद्धी आणि सक्षमीकरण यावर भर देण्याची गरज आहे,” असेही त्यांनी सांगितले.

याशिवाय त्यांनी RMA (Revolutions in Military Affairs) वरही यावेळी प्रकाश टाकला. तसेच R&D-Technology मध्ये भारताने आजवर कोणकोणते टप्पे यशस्विरित्या संपादन केले आहेत आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रात आपल्याला अजून किती उंची गाठण्याची गरज आहे, यावर खोत यांनी सविस्तर चर्चा केली.

यावेळी त्यांनी Space Technology, Cyber Tech, AI/ML, Robotics, Automation Tech, Communications तसेच Energy Generations यासारख्या विविध क्षेत्रांचा, त्यातील प्रगतीचा आणि धोक्यांचा आढावा घेतला.

संरक्षण क्षेत्रातील भारतीय लष्कराच्या ‘ROAD MAP’ वर प्रकाश टाकत, एअर व्हाईस मार्शल खोत यांनी- R&D साठी मंजूर करण्यात आलेले वाढीव बजेट, रिसोर्स आणि फॅसिलीटी शेअरिंग, फास्ट ट्रॅक अप्रूव्हल्स, सिव्हील मिलिटरीचे संयुक्त संरक्षण उपक्रम अशा बराच्यशा विषयांची सविस्तर माहिती दिली.

याव्यतिरिक्त, इकॉनॉमिक एक्स्प्लोझिव्ह लिमिटेडचे- डॉ. मनजित सिंग (Director-R&D) यांनी, संरक्षण क्षेत्रातील कंपनीच्या योगदाविषयी सांगितले. तसेच भारतीय लष्करासोबतच्या हायटेक संयुक्त उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला. भारतीय संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सद्ध कामगिरी आणि भविष्यातील योजनांबाबत सविस्तर माहिती दिली.

भारतीय लष्कराला आधुनिक शस्त्रास्त्र पुरवणाऱ्या, भारत फोर्जची सहाय्यक कंपनी- कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेड (KSSL) चे डायरेक्टर आणि सीईओ- निलेश तुंगार यांनी, ‘संरक्षण धोरणांचा आणि त्यातील नाविन्यपूर्ण बदलांचा’ आढावा घेतला. तसेच भारतीय लष्करासोबतच्या भविष्यातील महत्वांकाक्षी उपक्रमांविषयी माहिती दिली.

IITB चे प्राध्यापक मिलींद अत्रे यांनी, IIT Bombay संरक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी, भविष्यात कोणकोणते उपक्रम राबवणार आहेत, त्याची रुपरेषा कशी असेल याविषयी सांगितले. आयआयटी बॉम्बे- DRDO सोबत विविध स्तरावर राबवणार असलेल्या 1000 हून अधिक प्रोजेक्ट्सची माहिती दिली.

भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर येणाऱ्या विविध भारतीय स्टार्ट-अप्स मधील, आयआयटी बॉम्बेच्या योगदानाविषयी तसेच त्यातील भारत सरकारच्या गुंतवणूकीविषयी प्राध्यापक अत्रे यांनी सविस्तरपणे सांगितले.

IITB चे प्राध्यापक- नागेंद्र कुमार आणि प्राध्यापक नीरज कुंभकरन यांनी, संरक्षण क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी, आयआयटी बॉम्बे काम करत असलेल्या काही फ्युचर प्रोजेक्ट्सचा आढावा घेतला तसेच मशीन लर्निंग आणि आर्टिफिशिअल इंटलिजन्स क्षेत्रातील IITB च्या योगदानाविषयी माहिती दिली.

वेद बर्वे


Spread the love
Previous articleHard Lessons From Ukraine: No Alternative To Self-Reliance

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here