खाद्यतेल सुरक्षेच्या दृष्टीकोनातून भारताचे अर्जेंटिनाला प्राधान्य

0

भारत पाम तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, अर्जेंटिनामधून सूर्यफूल आणि सोयबीनच्या तेलाची आयात वाढवण्यावर अधिकाधिक भर देत आहे. खाद्यतेल आयातीच्या स्त्रोतांमध्ये विविधता आणण्याच्या आणि अन्न सुरक्षा मजबूत करण्याच्या हेतूने भारताने हे पाऊल उचलले आहे.

या आठवड्याच्या प्रारंभी, भारतीय आयातदारांनी अर्जेंटिनामधून सुमारे 3 लाख मेट्रिक टन, इकते सोयाबीन तेल आयात केले आहे. अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस एरिअसने, सोयाबीन आणि इतर खाद्यपदार्थांवरील निर्यात कर रद्द करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे त्यांचे तेल जागितक बाजारात अधिक स्पर्धात्मक झाले. याच पार्श्वभूमीवर भारताने तेल खरेदीचा निर्णय घेतला.

जानेवारी ते जुलै 2025 या दरम्यान, अर्जेंटिनाने भारतामध्ये 2.1 दशलक्ष टन सोयाबीन तेल आणि 4,20,000 टन सूर्यफूल तेल निर्यात केले होते, जी एक दशकाहून अधिक काळातील सर्वाधिक निर्यात होती. हे आकडे सध्याच्या जागतिक पुरवठा साखळीतील अडथळ्यांदरम्यान, एक विश्वासार्ह पुरवठादार म्हणून अर्जेंटिनाची वाढती भूमिका अधोरिखेत करतात.

“भारतातील खाद्यतेलाची मागणी सातत्याने वाढत असल्यामुळे, अर्जेंटिनासोबतच्या दीर्घकालीन सहकार्याची आम्हाला आशा आहे,” असे रोझारिओ बोर्ड ऑफ ट्रेडच्या आर्थिक अभ्यास विभागाते अर्थतज्ज्ञ ब्रुनो फेरारी यांनी सांगितले. “भारताच्या भविष्यातील खाद्यतेल वापराचा ट्रेंड लक्षात घेता, अर्जेंटिना एक विश्वासार्ह आणि सासत्यपूर्ण पुरवठदार बनण्यास तयार आहे,” असेही ते म्हणाले.

दरम्यान, पर्यावरणविषयक चिंता, किंमतींतील अस्थिरता आणि पुरवठ्यातील जोखीम यामुळे, भारताने आग्नेय आशियातून पारंपारिक पद्धतीने आयात होणाऱ्या पाम तेल आयातीवरील आपले अवलंबित्व कमी करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. भारतीय कुटुंबात आणि उद्योगांमध्ये सोयाबीन आणि सूर्यफूलाच्या तेलाचा वापर, अधिक आरोग्यदायी आणि बहुउपयोगी पर्याय म्हणून वापरले जाते.

रशिया-युक्रेन संघर्षामुळे, जागतिक स्तरावरील सूर्यफूल तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे, जे एकेकाळी दोन्ही देशांचे वर्चस्व मानले जायचे. यालाच प्रतिसाद म्हणून, भारताने लॅटिन अमेरिकन भागीदारांसोबत खाद्यतेलाचा व्यापार वाढवण्याच्या प्रयत्नांना गती दिली आहे. कच्च्या सूर्यफूल तेलाच्या दीर्घकालीन करारांना अधिक सुलभ करण्यासाठी, भारताने मर्कोसुर राष्ट्रांसोबतच्या अर्थात- अर्जेंटिना, ब्राझील, पॅराग्वे आणि उरुग्वे सोबतच्या प्राधान्य व्यापार करारात (PTA) सुधारणा करण्यासाठी चर्चांना सुरुवात केली आहे.

“अर्जेंटिना सध्या जागतिक संघर्षांपासून दूर असून, त्याने स्थिर निर्यात आणि मजबूत उत्पादन क्षमतेसह स्वत:ला सिद्ध केले आहे,” असे अर्जेंटिनाच्या कृषी मंत्रालयातील बाजार नियोजन आणि विश्लेषण संचालक ऑगस्टिन लाराल्डे यांनी नमूद केले.

2023-24 या वार्षिक हंगामात, अर्जेंटिनाचे सोयाबीन तेल उत्पादन 8.7 दशलक्ष टनांवर पोहोचले, जे दहा वर्षातील सर्वाधिक प्रमाण आहे. अनुकूल हवामान आणि प्रगत शेती पद्धतींमुळे हे शक्य झाले.

यावर्षी, दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांनी कृषी सहकार्याचा आढावा घेण्यासाठी एकमेकांना भेट दिली. जुलै महिन्यात, भारताच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी अर्जेंटिनाला भेट दिली, त्यानंतर ऑगस्टमध्ये अर्जेंटिनाचे शिष्टमंडळ चर्चेसाठी दिल्लीत आले होते.

अर्जेंटिनाचे राजदूत मॅरियाने कॉसिनो यांनी सांगितले की, “वनस्पती तेल क्षेत्र हे आमच्या भागीदारीचा एक आधारस्तंभ आहे.” “शाश्वत विकास आणि परस्पर विकासाच्या सामायिक मूल्यांवर आधारित व्यापक द्विपक्षीय संबंधांना चालना मिळत आहे,” असेही ते म्हणाले.

भारताची वाढती लोकसंख्या, वाढणारा मध्यमवर्ग आणि बदलत्या आहाराच्या सवयी यामुळे खाद्यतेलांची मागणी दिवसागणीक वाढत आहे. अशातच, सोयाबीन आणि सूर्यफूलाच्या तेलातील आरोग्यदायी घटकांमुळे त्याचा स्वयंपाकातील वाढता वापर, हे त्याची मागणी वाढवत आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत, भारत सरकार विश्वासू आंतरराष्ट्रीय स्त्रोतांची चाचपणी करत असताना, देशांतर्गत पुरवठा स्थिर ठेवण्यावरही भर देत आहे. 

खंडित झालेल्या जागतिक बाजारपेठेत, भारत सुरक्षित खाद्यतेल पुरवठादाराच्या शोधात असल्यामुळे, भविष्यात अर्जेंटिनासोबतची भागीदारी अधिक मजबूत होण्याची चिन्हे आहेत. स्थिर सरकार, कार्यक्षम दळणवळण व्यवस्था आणि तेलबियांचे विस्तारित उत्पादन, या वैशिष्ट्यांमुळए अर्जेंटिना भारताच्या दीर्घकालीन अन्न सुरक्षेसाठी एक विश्वासू आणि मोठा पुरवठादार बनण्याचे सामर्थ्य ठेवतो.

मूळ लेखिका- हुमा सिद्दकी

+ posts
Previous articleArmy Moves to Induct Indigenous Air Defence Shield ‘Anant Shastra’ QRSAM
Next articleIndia Revives Medium Transport Aircraft Program as IAF Faces Acute Airlift Gap

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here