India-UK तंत्रज्ञान करारामुळे महत्त्वाची खनिजे, सीमावर्ती क्षेत्रांवर लक्ष केंद्रित

0

भारत-युके यांच्यातील ‘तंत्रज्ञान सुरक्षा उपक्रम’ (TSI)च्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त, पंतप्रधान मोदी आणि त्यांचे ब्रिटिश समकक्ष केयर स्टारमर यांनी, उच्च तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आर्थिक विकास आणि धोरणात्मक स्थैर्य वाढवण्याचा दृढनिश्चय केला.

2024 मध्ये India-UK यांच्यामध्ये सुर करण्यात आलेला- टेक्नोलॉजी सिक्युरिटी इनिशिएटिव्ह (TSI) हा उपक्रम, दोन्ही देशांतील धोरणात्मक भागीदारीचा एक मुख्य आधार बनली आहे. या उपक्रमामुळे दूरसंचार नवोपक्रम, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), क्रिटिकल मिनरल्स (दुर्मिळ खनिजे), जैवतंत्रज्ञान यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य घडून आले आहे. दोन्ही देशांनी या पुढाकाराचा विस्तार नव्या क्षेत्रांमध्ये करण्याचा निर्धार केला असून, उद्योग, शिक्षण संस्था आणि स्टार्टअप्ससाठी नवीन संधी उपलब्ध होणार आहेत.

सहकार्याच्या माध्यमातून तंत्रज्ञानातील सार्वभौमत्व

गेल्या वर्षभरात TSI अंतर्गत खालील ठोस प्रगती झाली आहे:

  • Future Telecoms संदर्भातील £7 दशलक्ष मूल्याचा संयुक्त संशोधन कार्यक्रम सुरू करण्यात आला असून, 5G/6G तंत्रज्ञानाचा विकास आणि ओपन RAN चाचणी केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत.ट
  • भारतातील C-DOT आणि युकेमधील SONIC (Smart RAN Open Network Interoperability Centre) यांच्यात पुढील पिढीच्या दूरसंचार नवकल्पनांसाठी औपचारिक सहकार्य झाले आहे.
  • बेंगळुरूमध्ये पार पडलेल्या पहिल्या भारत-युके AI परिषदेमुळे, नैतिक आणि जबाबदार AI तंत्रज्ञानाच्या वापराबाबत सातत्यपूर्ण चर्चा सुरू झाली आहे. 

क्रिटिकल मिनरल्स – भागीदारीचा केंद्रबिंदू

TSI अंतर्गत, एक महत्त्वपूर्ण उपलब्धी म्हणजे, India-UK क्रिटिकल मिनरल्स सप्लाय चेन ऑब्झर्व्हेटरीची स्थापना. पहिल्या टप्प्याच्या यशानंतर दुसऱ्या टप्प्यासाठी £1.8 दशलक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे, ज्यामुळे जगातील सर्वात सुसंगत आणि व्यापक डिजिटल पायाभूत सुविधा तयार होणार आहेत, जी दुर्मिळ खनिज पुरवठा साखळ्यांचा मागोवा घेतील. झारखंडमधील इंडियन स्कूल ऑफ माइन्स, धनबाद येथे एक सॅटेलाइट कॅम्पस उभारण्यात येणार आहे.

दरम्यान, ‘UK-India Critical Minerals Guild’ या नव्या संस्थेची घोषणा करण्यात आली असून, ती जागतिक वित्तीय मानकांमध्ये सुधारणा करणे, शाश्वत खाण पद्धती प्रोत्साहित करणे आणि पुनर्वापर व ट्रेसिबिलिटीला चालना देण्याचे काम करेल. ही भागीदारी सर्क्युलर इकॉनॉमीचे तत्त्व अंगीकारून सेमीकंडक्टर्स, बॅटरी आणि स्वच्छ ऊर्जेसाठी आवश्यक पुरवठा साखळ्या सुरक्षित करणार आहे.

AI, दूरसंचार, जैवतंत्रज्ञान आणि बरेच काही

कराराच्या पुढील टप्प्यात TSI अंतर्गत पुढील गोष्टींचा समावेश करण्यात येणार आहे:

  • UK-India Joint AI Centre – सार्वजनिक सेवा, उत्पादन व वित्तीय सेवांमध्ये AI चे प्रत्यक्ष उपयोग, पारदर्शकता व विश्वास टिकवून.
  • India-UK Connectivity and Innovation Centre – AI-आधारित दूरसंचार नेटवर्क, सुरक्षित 5G/6G आणि अवकाश-आधारित संवाद प्रणालींसाठी संशोधनास चालना. तसेच ITU व 3GPP सारख्या आंतरराष्ट्रीय मानक प्राधिकरणांमध्ये सहकार्य.
  • UK-India Biotech Accelerator – बायोमॅन्युफॅक्चरिंग, बायोफाउंड्रीज, बायोप्रिंटिंग आणि शाश्वत शेती क्षेत्रातील नवोपक्रमांना समर्थन.

यासोबतच, ग्राफीन व अन्य 2D मटेरियल्सवर संयुक्त संशोधनही सुरू आहे, जे प्रगत सामग्री व नव्या शास्त्रीय क्षेत्रांसाठी महत्त्वाचे आहे.

राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोरणात्मक आधारस्तंभ

TSI च्या केंद्रस्थानी दोन प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत – आर्थिक नवकल्पनांना चालना देणे आणि राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी देणे. सुरक्षित-डिझाईन तंत्रज्ञान, लवचिक पुरवठा साखळ्या आणि नव्याने विकसित होत असलेल्या डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये विस्तार हा दोन्ही देशांच्या सुरक्षा प्राधान्यांना समर्पित आहे.

उद्योग व नवोपक्रम क्षेत्राला आमंत्रण

दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी स्टार्टअप्स, खासगी उद्योग व विद्यापीठांना अधिक सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. TSI हे नवकल्पनांचे व्यासपीठ असून, त्याला जागतिक महत्त्वाचे रूप दिले जात आहे.

या पुढच्या टप्प्यात, भारत-युके भागीदारी ही फक्त द्विपक्षीयच नव्हे तर मूल्याधिष्ठित, विश्वासार्ह तंत्रज्ञान सहकार्याचे जागतिक मॉडेल बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

– हुमा सिद्दकी

+ posts
Previous articleमालदीवमध्ये PM मोदींचे स्वागत; भारतासोबतचे संबंध सुधारण्याचे प्रयत्न
Next articleIndia–Maldives Defence Ties Back on Track: Aircraft Operation Agreement Renewed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here