भारत आणि अमेरिका यांच्यातील, द्विपक्षीय त्रिसेवा मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण (HADR) साठीचा सराव– ‘Tiger Triumph 2025’ चा चौथा टप्पा गुरुवारी, काकीनाडा येथे डिस्टिंग्विश्ड व्हिजिटर्स डे (DV Day) च्या दिवशी भव्य संयुक्त लष्करी शक्तिप्रदर्शनासह संपन्न झाला.
या प्रसंगी, तमिळनाडू व पुडुचेरी नौदल क्षेत्राचे प्रमुख (FOTNA), अमेरिकेचे कॉन्सुल जनरल, अमेरिकेच्या नेव्ही स्ट्राइक ग्रुप फाईव्हचे कमांडर, तसेच भारतीय 54 इन्फंट्री डिव्हिजनचे डेप्युटी जनरल ऑफिसर कमांडिंग हे वरिष्ठ लष्करी आणि राजनैतिक पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी दोन्ही देशांमधील वाढती लष्करी एकसंधता दर्शवणारे वेगवान आणि समन्वित लष्करी ऑपरेशन्स पाहिले.
DV Day दरम्यान दोन्ही देशांच्या विशेष दलांनी SC व Mi-17 V5 हेलिकॉप्टरच्या सहाय्याने स्लिथरिंग ऑपरेशन्स केले, तसेच C-130 वाहतूक विमानांचाही सहभाग होता. स्टँडऑफ आणि हार्ड बीचिंगसह जटिल उभयचर आणि हवाई युद्धतंत्राचे सादरीकरण करण्यात आले. या संयुक्त ऑपरेशन्समध्ये भारतीय नौदल, सैन्य आणि हवाई दलासोबतच अमेरिकी नौदल, सैन्य व मरीन कॉर्प्सनेही सहभाग घेतला, यामुळे दोन्ही देशांच्या दलांमधील उच्च पातळीचा समन्वय व कार्यक्षमतेचा प्रत्यय आला.
The 4th edition of the Tri-Service HADR Amphibious Exercise #TigerTriumph25 between India and United States culminated with a Distinguished Visitors’ Day at/off #Kakinada, #AndhraPradesh, on #11Apr 25.
-
#BridgesofFriendship @SpokespersonMoD @HQ_IDS_India https://t.co/ObJhDA84bX pic.twitter.com/pdwHhVoNLk
— SpokespersonNavy (@indiannavy) April 12, 2025
1 एप्रिल ते 11 एप्रिल दरम्यान, आयोजित करण्यात आलेल्या ‘टायगर ट्रायम्फ 2025’ या संयुक्त त्रिसेवा सरावाचे उद्दिष्ट, मानवतावादी मदत व आपत्ती निवारण मोहिमांसाठी संयुक्त तयारी वाढवणे होते. या सरावाद्वारे एकमेकांच्या प्रक्रियांचे, क्षमतांचे आणि तंत्रज्ञान एकत्रीकरण चौकटींचे, क्रॉस-ट्रेनिंग करण्याची अमूल्य संधी दोन्ही देशांना मिळाली.
ही सरावमालिका प्रथम 2019 मध्ये पार पडली होती. भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारीखालील हा एक महत्त्वाची पायाभूत उपक्रम आहे. लॉजिस्टिक्स एक्सचेंज मेमोरँडम ऑफ अॅग्रीमेंट (LEMOA) या कराराअंतर्गत हे सहकार्य शक्य झाले असून, त्यात एकमेकांना परस्पर लॉजिस्टिक पाठबळ पुरवण्याची तरतूद आहे.
या सरावाचे दोन टप्पे होते- हार्बर टप्पा: 1 ते 7 एप्रिल दरम्यान विशाखापट्टणम येथे आणि समुद्र टप्पा: 8 ते 11 एप्रिल दरम्यान काकीनाडा किनाऱ्याजवळ.
हार्बर टप्प्याची सुरुवात एका उद्घाटन समारंभाने झाली, ज्यामध्ये यूएस एम्बसीतील चार्जे द’अफेर्स जॉर्गन के. अँड्र्यूज आणि ईस्टर्न नेव्हल कमांडचे चीफ ऑफ स्टाफ व्हाइस अॅडमिरल समीर सक्सेना हे प्रमुख उपस्थित होते.
या टप्प्यात सहभागी जवानांनी, Pre-Sail Conference आणि Subject Matter Expert Exchange (SMEE) द्वारे वैद्यकीय मदत, ड्रोन वापर, अवकाश-आधारित क्षमता यांसारख्या नव्याने उदयास येणाऱ्या तंत्रज्ञानांवर चर्चासत्रे घेतली. यासोबत Cross-deck visits, Ship-boarding drills, तसेच सौहार्द वृद्धिंगत करणाऱ्या मैत्रीपूर्ण क्रीडा स्पर्धाही पार पडल्या.
‘टायगर ट्रायम्फ 2025’ ने, पुन्हा एकदा भारत आणि अमेरिकेतील वाढत्या धोरणात्मक समन्वयाला अधोरेखित केले, विशेषतः मानवतावादी मदत व आपत्ती निवारण क्षेत्रात — जे आजच्या काळात नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटांच्या पार्श्वभूमीवर अधिकच महत्त्वपूर्ण ठरत आहे.