‘डेझर्ट सायक्लोन II’ संयुक्त सरावासाठी भारतीय लष्कराची तुकडी युएईला रवाना

0
डेझर्ट सायक्लोन II

भारत–यूएई संयुक्त लष्करी सराव ‘डेझर्ट सायक्लोन–II’ च्या दुसऱ्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी, भारतीय लष्कराची एक तुकडी संयुक्त अरब अमिरातीकडे (UAE) रवाना झाली आहे. हा सराव, 18 ते 30 डिसेंबर 2025 या कालावधीत अबूधाबी येथे आयोजित करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

सरावात सहभागी होणाऱ्या भारतीय तुकडीमध्ये ‘मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंट’चे 45 कर्मचारी समाविष्ट असेल, तर युएई लँड फोर्सेसचे प्रतिनिधित्व 53 व्या मेकॅनाइज्ड इन्फंट्री बटालियनमधील समान संख्या असलेली तुकडी करेल, ज्यामुळे दोन्ही लष्करांमधील वाढते ऑपरेशनल सहकार्य अधोरेखित होईल. 

या संयुक्त सरावाचा उद्देश, शहरी ऑपरेशनल वातावरणात वास्तववादी संयुक्त प्रशिक्षणाद्वारे, एकमेकांची कार्यक्षमता आणि संरक्षण सहकार्य वाढवणे हा आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आदेशानुसार ‘सब-कन्व्हेन्शनल’ ऑपरेशन्सवर मुख्य भर दिला जाईल, ज्याद्वारे शांतता राखणे, दहशतवादविरोधी कारवाया आणि स्थिरता मोहिमांमध्ये एकत्र काम करण्याची दोन्ही दलांची तयारी पूर्ण होईल. 

सुमारे दोन आठवडे चालणाऱ्या या सरावादरम्यान, दोन्ही बाजूंचे सैनिक विविध तांत्रिक कसरतींचे एकत्रित प्रशिक्षण घेतील, ज्यामध्ये नागरी भागातील लढाया, हेलिबॉर्न ऑपरेशन्स आणि सविस्तर मिशन प्लॅनिंगचा समावेश असेल. या कार्यक्रमात मानवरहित हवाई प्रणाली (UAS) आणि काउंटर-UAS तंत्रांच्या एकात्मतेचाही समावेश असेल, जे आधुनिक शहरी युद्धाचे बदलत जाणारे स्वरूप दर्शवते. 

‘डेझर्ट सायक्लोन-II’ हा सराव, अलीकडील उच्च-स्तरीय लष्करी देवाणघेवाणीतून मिळालेल्या गतीवर आधारित आहे. यामध्ये ऑक्टोबर 2025 मधील युएई लँड फोर्सेसच्या कमांडरची भेट आणि डिसेंबर 2025 मधील युएई प्रेसिडेन्शियल गार्डच्या कमांडरच्या भेटीचाही समावेश आहे. या परस्पर संवादांमुळे द्विपक्षीय लष्करी सहकार्याची व्याप्ती आणि खोली वाढण्यास हातभार लागला आहे.

‘डेझर्ट सायक्लोन-II’ चे आयोजन, भारत आणि युएई मधील सखोल धोरणात्मक भागीदारी आणि लष्करी मुत्सद्देगिरीला अधोरेखित करते. या सरावामुळे दोन्ही लष्करांमधील व्यावसायिक बंध अधिक दृढ होतील, तसेच युद्धनीती, तंत्र आणि कार्यपद्धतींची परस्पर समज वाढेल आणि प्रादेशिक शांतता, सुरक्षा स्थिरतेच्या समर्थनासाठी एकमेकांसोबत काम करण्याच्या क्षमतेच्या विकासात योगदान मिळेल अशी अपेक्षा आहे. 

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleIndian Army Contingent Heads to UAE for Desert Cyclone-II Joint Military Exercise
Next articleIndian Navy Commissions Second MH-60R Helicopter Squadron at Goa

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here