भारतीय लष्कराकडून 293 कोटींच्या ‘PULS’ रॉकेट प्रणालीची तात्काळ ऑर्डर

0
PULS
इस्रायली पल्स रॉकेट लाँचर्स

भारतीय लष्कराने पुणे येथील संरक्षण उत्पादक कंपनी ‘नाइब लिमिटेड’ला, 293 कोटी रुपयांची आपत्कालीन खरेदी ऑर्डर दिली आहे. या ऑर्डरमध्ये ‘प्रिसाईज अँड युनिव्हर्सल लॉन्चिंग सिस्टम (PULS) मल्टी-बॅरल रॉकेट लाँचरसाठी लाँचर सिस्टम, त्यासाठी पूरक उपकरणे आणि विशेष दारुगोळ्याचा समावेश आहे. ही प्रणालीमध्ये 150 किलोमीटर आणि 300 किमीपर्यंत मारा करण्याची क्षमता असलेले दीर्घ-पल्ल्याचे रॉकेट प्रकारही समाविष्ट आहेत. या प्रणालीचा पुरवठा पुढील 12 महिन्यांत टप्प्याटप्प्याने केला जाईल.

गुरुवारी, बीएसई (BSE) आणि एनएसई (NSE) कडे सादर केलेल्या नियामक निवेदनात नाइब लिमिटेडने म्हटले आहे की, त्यांनी भारतीय लष्करासोबत ‘अनेक प्रकारचे रॉकेट एकत्रित करण्यास सक्षम’ असलेल्या युनिव्हर्सल रॉकेट लाँचर प्रणालीची उपकरणे आणि दारुगोळ्याच्या निर्मिती आणि पुरवठा करारावर स्वाक्षरी केली आहे. या कराराचे मूल्य सर्व कर आणि शुल्कासह 292.69 कोटी रुपये आहे.

2020 मध्ये, गलवान खोऱ्यात चिनी सैन्याशी झालेल्या चकमकीनंतर युद्धजन्य परिस्थिती किंवा गंभीर आणीबाणी हाताळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या आपत्कालीन खरेदी चौकटीअंतर्गत, लष्कराच्या उपप्रमुखांना तातडीच्या ऑपरेशनल गरजा पूर्ण करण्यासाठी 300 कोटी रुपयांपर्यंतच्या खरेदीला गती देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

हे विशेष अधिकार दीर्घकाळ चालणारी खरेदी प्रक्रिया टाळण्यासाठी आणि लष्करी सज्जतेसाठी आवश्यक असलेल्या आघाडीच्या यंत्रणांचा जलद समावेश, भरपाई किंवा दुरुस्ती सुनिश्चित करण्यासाठी देण्यात आले आहेत.

इस्रायलच्या ‘एल्बिट सिस्टम्स’ने विकसित केलेली PULS रॉकेट प्रणाली ही अष्टपैलू प्रणाली असून, सर्व हवामानांत काम करणारी आणि मल्टि-कॅलिबर रॉकेट आर्टिलरी प्लॅटफॉर्म आहे, जे 2026 पर्यंत अतिरिक्त ‘पिनाका’ रेजिमेंटचा समावेश करण्यासह आपल्या रॉकेट दलाचा विस्तार आणि आधुनिकीकरण करण्याच्या लष्कराच्या दीर्घकालीन योजनेशी सुसंगत आहे.

जुलै 2025 मध्ये, निबे लिमिटेडने स्वदेशी संरक्षण उत्पादनाला पाठबळ देणाऱ्या भागीदारीअंतर्गत भारतात PULS लाँचर सिस्टम तयार करण्यासाठी एल्बिट सिस्टम्ससोबत करार केला होता. एकदा का ही प्रणाली ताफ्यात सामील झाली की, भारतीय लष्कराच्या सेवेतील ‘PULS’ हे पहिले युनिव्हर्सल रॉकेट लाँचर प्लॅटफॉर्म ठरेल.

यापूर्वी मे २०२५ मध्ये, भारताच्या संरक्षण उत्पादन परिसंस्थेतील आपल्या वाढत्या भूमिकेचा भाग म्हणून, कंपनीने इस्रायलमधील एका आघाडीच्या तंत्रज्ञान कंपनीकडून 150.62 कोटी रुपयांची ऑर्डर मिळवली होती.

या नव्या ऑर्डरमुळे, लष्कराची ‘डीप-स्ट्राइक’ (खोलवर मारा करण्याची) आणि जलद प्रतिसाद देण्याची क्षमता लक्षणीयरीत्या वाढण्याची अपेक्षा आहे, जी भविष्यातील उच्च-गतिमान ऑपरेशन्ससाठी एक महत्त्वाची गरज आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articlePakistan Tests ‘Taimoor’ Cruise Missile With 600-km Range
Next articleWhy Defence Ministry is Rushing to Lock in Major Procurements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here