नवीन डिजिटल-प्रिंट कॉम्बॅट कोटसाठी लष्कराला मिळाले IPR

0
आधुनिकीकरण आणि स्वदेशीकरण मोहिमेत आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलत, भारतीय लष्कराने त्यांच्या नव्याने विकसित केलेल्या कोट कॉम्बॅटसाठी (डिजिटल प्रिंट) विशेष बौद्धिक संपदा अधिकार (IPR) मिळवले आहेत. लष्कराने त्यांच्या अपग्रेड केलेल्या डिजिटल-प्रिंट लढाऊ गणवेशाचे अनावरण केल्यानंतर काही महिन्यांनी ही नोंदणी करण्यात आली. यामुळे सैनिक-केंद्रित डिझाइन तसेच संरक्षणात क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण प्रगती दर्शवते.

जानेवारी 2025 मध्ये सादर करण्यात आलेला न्यू कोट कॉम्बॅट, आर्मी डिझाइन ब्युरोच्या मार्गदर्शनाखाली एका सल्लागार प्रकल्पांतर्गत, नवी दिल्ली येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीद्वारे (NIFT) डिझाइन करण्यात आला आहे. तीन-स्तरीय पोशाखात प्रगत तांत्रिक कापडांचा व्यापक वापर करण्यात आला असून विविध भूप्रदेश आणि हवामान परिस्थितीत आराम, गतिशीलता आणि ऑपरेशनल कार्यक्षमता सुधारण्याच्या उद्देशाने ergonomic construction चा यात उपयोग करण्यात आला आहे.

अधिकृत माहितीनुसार, हे डिझाइन कोलकाता येथील पेटंट्स, डिझाईन्स आणि ट्रेडमार्क महानियंत्रकांकडे दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी डिझाईन ॲप्लिकेशन क्रमांक 449667-001 अंतर्गत नोंदणीकृत करण्यात आले असून 7 ऑक्टोबर 2025 रोजी पेटंट ऑफिसच्या अधिकृत जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

नोंदणी आता लागू झाल्यामुळे, भारतीय लष्कराकडे डिझाइन आणि कॅमफ्लाज पॅटर्न दोन्हीची विशेष मालकी आली आहे, ज्यामुळे त्यांना कोणतेही अनधिकृत उत्पादन, पुनरुत्पादन किंवा व्यावसायिक वापर रोखण्यासाठी पूर्ण कायदेशीर अधिकार देण्यात आले आहेत. उल्लंघन केल्यास डिझाईन्स कायदा 2000, डिझाईन्स नियम 2001 आणि पेटंट कायदा 1970 च्या संबंधित तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, ज्यामध्ये मनाई आदेश आणि नुकसानीचे दावे यांचा समावेश आहे.

लढाऊ पोशाखातील त्रिस्तरीय भाग

नवीन कोट लढाऊ पोशाखात पुढील गोष्टी समाविष्ट आहेत:

  • बाह्य थर: टिकाऊपणा, लपण्याची क्षमता आणि ऑपरेशनल कामगिरी वाढविण्यासाठी डिझाइन केलेला डिजिटली प्रिंट केलेला कॅमफ्लाज कोट.
  • अंतर्गत जॅकेट: संपूर्ण हालचालींना परवानगी देताना उष्णता प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेला एक इन्सुलेटेड, हलके मध्यम-स्तर.
  • थर्मल थर: अत्यंत थंड हवामानात इष्टतम उष्णता टिकवून ठेवण्यासाठी डिझाइन केलेला ओलावा-नियमन करणारा बेस लेयर.

एकत्रितपणे, हे घटक लष्कराच्या लढाऊ पोशाख, संतुलित संरक्षण, कार्यक्षमता आणि सैनिकांच्या आरामासाठी असणाऱ्या दृष्टिकोनात महत्त्वपूर्ण उत्क्रांती दर्शवतात.

व्यापक परिवर्तनाचा भाग

या लष्करी कोटसाठी आयपीआर सुरक्षित करण्याच्या लष्कराच्या निर्णयामुळे डिझाईन नवोपक्रम, कायदेशीर संरक्षण आणि संरक्षण वस्त्रोद्योगात स्वावलंबन यावर असणारा वाढता भर अधोरेखित होतो. हे ‘आत्मनिर्भर भारत’ आणि लष्कराच्या ‘परिवर्तन दशक (2023-2032)’ या राष्ट्रीय दृष्टिकोनाशी सुसंगत आहे, जे सैनिकी प्रणालींचे आधुनिकीकरण करण्याकडे मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित करत आहे.

भारतीय कायद्यांतर्गत आता संरक्षित नवीन लढाऊ कोटसह, सैन्याने सैनिकांना अधिक प्रगत, लढाऊ-सज्ज गियरने सुसज्ज करताना स्वदेशी डिझाइनचे संरक्षण करण्याची आपली वचनबद्धता अधिक दृढ केली आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleदुबई एअरशो 2025: रशियाची भारताला Su-57 सह-उत्पादन करण्याची ऑफर
Next articleप्रादेशिक सुरक्षा चर्चेपूर्वी डोवाल यांनी घेतली बांगलादेशच्या NSA ची भेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here