भारतीय लष्कराच्या ‘भैरव’ कमांडो बटालियनची वैशिष्ट्ये, वाचा सविस्तर

0

भारतीय लष्कराच्या नव्या ‘भैरव लाइट कमांडो बटालियन, ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पूर्णपणे कार्यान्वित होणार आहेत. लष्करी अधिकाऱ्यांच्या मते, ही एक महत्त्वाची रचनात्मक पुनर्रचना असून, पाकिस्तान सीमारेषेवर जलद आणि अचानक कारवाया करण्यासाठी भारताच्या क्षमतेला बळकटी मिळणार आहे.

मे महिन्यात, पाकिस्तानसोबत झालेल्या चार दिवसांच्या संघर्षानंतर हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘रुद्र ब्रिगेड’, ‘दिव्यास्त्र बॅटरी’ आणि ‘शक्तिबाण रेजिमेंट’ यांसारख्या नवीन युनिट्सचा समावेश करून, लष्कराच्या एकूण संरचनेत मोठा बदल होत असल्याचे हे प्रतीक आहे. या सर्वांची, संवेदनशील सीमांवर विघटन, हल्ला आणि ऑपरेशन्स सूरू ठेवण्यासाठी एकात्मिक आणि चपळ फॉर्मेशन म्हणून एकत्रीत रचना केली गेली आहे.

भैरव: इन्फंट्री आणि स्पेशल फोर्सेसमधील दुवा

‘घातक’ प्लाटूनच्या विस्तारित आवृत्तीच्या धर्तीवर, प्रत्येक ‘भैरव’ बटालियनमध्ये अंदाजे 250 सैनिक असतील. हे सैनिक प्रमाणित पायदळ बटालियनपेक्षा संख्येने कमी आणि वजनाने हलके असतील, परंतु वेग, लवचिकता आणि डावपेचात्मक धक्क्यासाठी (tactical shock) ते अधिक अनुकूल आहेत. ही नवीन युनिट्स, स्पेशल फोर्सेस आणि पायदळ यांच्यामधील डावपेचात्मक दरी कमी करण्यासाठी तयार करण्यात आली आहेत. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी अलीकडेच कारगिल युद्ध स्मारकामध्ये बोलताना त्यांना आश्चर्याच्या तत्त्वावर आधारित एक “घातक शक्ती” म्हटले.

महिंद्रा आर्माडो लाइट स्पेशलिस्ट व्हेइकल्स (LSV), या भूभागावर चालणाऱ्या वाहनांनी सुसज्ज, ‘भैरव’ युनिट्स – बंकर-बस्टिंग, रणगाडा विरोधी मोहिमा आणि सीमापार हल्ल्यांसाठी वेगाने तैनात करण्यास सक्षम असतील. LSV सहा फायर रणगाडा विरोधी क्षेपणास्त्रे वाहून नेऊ शकते आणि 81 मि.मी. आणि 120 मि.मी.च्या वाहनावर बसवलेल्या मोर्टार प्रणालीशी देखील एकत्रित करता येते, जे अनुक्रमे 5 किमी आणि 8.2 किमीच्या पलीकडील लक्ष्यांना नष्ट करू शकतात. त्यांच्या शस्त्रागारात रात्र दृष्टीसाठी उपयुक्त AK-203 आणि SIG-716 रायफल्स, तसेच वाहनांवर बसवलेले मोर्टार आणि रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र प्रणालींचा समावेश आहे.

नवीन पीढीच्या युद्धाची सामरिक तयारी

लष्कराचे परिवर्तन केवळ कमांडो बटालियनपुरते मर्यादित नाही. पायदळ युनिट्सची पुनर्रचना आक्रमक आणि ड्रोन-विरोधी युद्धासाठी समर्पित ड्रोन प्लाटूनसह केली जात आहे, जी ऑगस्टपर्यंत सर्व फॉर्मेशन्समध्ये लागू करण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, तोफखाना विभागाला दिव्यास्त्र बॅटरी (ड्रोन आणि लोइटरिंग दारूगोळ्यासह एकत्रित पारंपारिक तोफखाना) आणि शक्तिबाण रेजिमेंट (स्मार्ट दारूगोळ्यासह समर्पित ड्रोन-तोफखाना युनिट्स) सह आधुनिक बनवले जात आहे.

एकूण 5 दिव्यास्त्र बॅटरी तयार करण्याची भारतीय लष्कराची योजना आहे, ज्यापैकी सेंट्रल कमांड वगळता, प्रत्येक प्रमुख कमांडसाठी एक बॅटरी असेल. याव्यतिरिक्त, पहिल्या टप्प्यात तीन शक्तिबाण रेजिमेंट कार्यान्वित करण्याची योजना आहे. ही रेजिमेंट पूर्णपणे नवीन फॉर्मेशन नसून, सध्याच्या तोफखाना युनिट्समधून तयार केली जात आहे, ज्यामुळे पुढील पिढीच्या युद्धासाठी सध्याच्या संसाधनांचा पुरेपूर वापर केला जाईल.

दोन रुद्र ब्रिगेड – म्हणजेच ‘एकात्मिक युद्ध गट’ (Integrated Battle Group- IBG) ची सुधारित आवृत्ती, ज्यात पायदळ, चिलखती वाहने, तोफखाना, ड्रोन आणि लॉजिस्टिक्स यांना एकाच स्ट्राइक पॅकेजमध्ये एकत्र केले जाते, आधीच सीमेवर तैनात करण्यात आले आहेत.

पाकिस्तान-केंद्रित पवित्रा

भारतीय लष्कराची ही पुनर्रचना, पाकिस्तानविरोधातील जलद, सीमित आणि लक्षवेधी कारवाया शक्य करुन दाखवण्याच्या भारताच्या धोरणावर प्रकाश टाकते. यामध्ये शत्रूच्या तोफखान्यावर हल्ला, दारुगोळ्याच्या साठ्यावर मोडतोड, आणि सीमावर्ती संरक्षण मोर्चे उखडणे अशा कारवायांचा समावेश आहे. अधिकाऱ्यांच्या मते, भविष्यात 40 ते 50 ‘भैरव’ बटालियन्स उभारल्या जाऊ शकतात.

संरक्षण विश्लेषकांच्या मते, “हे बदल मोठ्या प्रमाणावर सैन्या हालचाल करण्याऐवजी, डावपेचात्मक स्तरावर ‘सर्जिकल स्ट्राइकची क्षमता’ बळकट करण्याचा प्रयत्न आहे. हलक्या वजनाच्या आणि तंत्रज्ञान-सक्षम युनिट्समध्ये, आक्रमक शक्ती वितरित करून, पाकिस्तानला रोखण्यासाठी सबळ प्रतिकारक्षमता निर्माण करणे आणि विश्वासार्हता टिकवून ठेवणे, हे लष्कराचे उद्दिष्ट आहे.

मूळ लेखिका- हुमा सिद्दकी

+ posts
Previous articleभारत-अमेरिका संबंध बिघडत असताना, भारत-चीन संबंध सुधारतील का?
Next articleरशियाने सार्वभौमत्वाचा आदर करावा- हंगेरीच्या पीटर मग्यार यांचे आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here