बलशाली भारत आणि आत्मनिर्भर भारताचे प्रतीक, आयएनएस विक्रांत

0

No matter how slow you make progress, you are far better than anyone who isn’t trying.
हे भारताच्या बाबतीत तंतोतंत लागू होत आहे. भारतीय संरक्षण क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून होते. पण अलिकडे ‘मेक इन इंडिया’चा पुरस्कार करत आत्मनिर्भरतेवर आपण भर दिल्याने हे चित्र हळूहळू बदलत आहे. आता आपण संरक्षण सामग्रीची निर्यात देखील करू लागलो आहे. आत्मनिर्भर उपक्रमात आपण सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) संधी दिल्याने आपली प्रगती लक्षणीय ठरत आहे. आयएनएस विक्रांत ही विमानवाहू नौका या आत्मनिर्भर उपक्रमात मैलाचा दगड ठरणार आहे. ही नौका येत्या 14 किंवा 15 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला अर्पण करतील.

स्वातंत्र्यानंतर भारताने ब्रिटनकडील एचएमएस हर्क्युलस ही विमानवाहू नौका खरेदी केली. तिचेच पुढे आयएनएस विक्रांत असे नामकरण झाले. पाकिस्तानविरुद्धच्या 1971च्या युद्धात या नौकेची महत्त्वपूर्ण कामगिरी राहिली. 1987ला ही नौका भारतीय नौदलाच्या सेवतून निवृत्त झाली. याच काळात भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस विराट दाखल झाली. 1987मध्ये ब्रिटनकडून ही नौका आपण विकत घेतली. तेव्हा तिचे नाव एचएमएस हर्मिस होते. तीही 2013ला सेवानिवृत्त झाली. 2013च्याच आसपास रशियाकडून आपण अॅडमिरल गोश्कॉव्ह ही विमानवाहून नौका विकत घेतली. तिचे आताचे नाव आयएनएस विक्रमादित्य आहे. हीच एकमेव विमानवाहू नौका सध्या भारतीय नौदलाच्या ताफ्यात आहे.

कोचिन शिपयार्डमध्ये आयएनएस विक्रांतची बांधणी झाली. या नौकेचे इंजिन, रडार व अन्य काही भाग वगळता जवळपास 76 टक्के सुटे भाग स्वदेशी आहेत. त्यात सहभागी असलेल्या कंपन्या या सर्व भारतीयच आहेत. अशा नौकांसाठी विशेष स्टीलची गरज असते, पण ते बाहेरून न मागवता स्टील अॅथॉरिटी ऑफ इंडियानेच तयार केले आहे. यासाठी तब्बल 21 हजार टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. स्वत:च्या विमानवाहू नौकेचे डिझाइन तयार करून बांधणी करणारा भारत हा जगातील सहावा-सातवा देश आहे.

या विमानावरील धावपट्टीचे नियोजन कसे आहे? यामुळे भारतीय सागरी सीमेच्या सुरक्षेमध्ये किती फायदा होणार आहे? या जहाजाचे नाव विक्रांत नाव का ठेवले? या जहाजाच्या कोणकोणत्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत?

या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी Bharat Shakti Marathi या युट्यूब चॅनलवर पाहा –


Spread the love
Previous articleThis I-Day, Howitzer Developed By DRDO To Be A Part Of 21-Gun Salute
Next articleस्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : भारतीय नौदल @75

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here