विस्तारित रेंज अँटी-सबमरीन क्षेपणास्त्र वापरकर्ता चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण

0

भारताच्या स्वदेशी संरक्षण क्षमतांना लक्षणीय चालना देताना, भारतीय नौदलाने आयएनएस कवरत्ती येथून विस्तारित रेंज अँटी-सबमरीन रॉकेटची (ईआरएएसआर) वापरकर्ता चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. 23 जून ते 7 जुलै दरम्यान घेण्यात आलेल्या चाचण्यांमुळे या प्रणालीला नौदल सेवेत समाविष्ट करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल पडले आहे.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) विकसित केलेली ईआरएएसआर ही पूर्णपणे स्वदेशी पाणबुडीविरोधी शस्त्र प्रणाली आहे, जी स्वदेशी रॉकेट प्रक्षेपकांनी (आयआरएल) सुसज्ज असलेल्या भारतीय नौदलाच्या जहाजांमधून प्रक्षेपित करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. पाणबुडीविरोधी युद्ध (एएसडब्ल्यू) क्षमता वाढवण्यासाठी, पाण्याखालील धोक्यांविरूद्ध विस्तारित श्रेणी आणि अचूकता प्रदान करण्यासाठी हे रॉकेट एक महत्त्वपूर्ण घटक आहे.

ही प्रणाली DRDOच्या शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापना (एआरडीई), पुणे यांनी हाय एनर्जी मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी (एचईएमआरएल) आणि नेव्हल सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल लॅबोरेटरी (एनएसटीएल), विशाखापट्टणम यांनी संयुक्तपणे विकसित केली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ईआरएएसआरमध्ये ट्विन-रॉकेट मोटर कॉन्फिगरेशन आहे ज्यामुळे विस्तृत श्रेणीतील गरजा पूर्ण करण्यास सक्षम करते. हे स्वदेशी विकसित इलेक्ट्रॉनिक टाइम फ्युझसह सुसज्ज आहे आणि सर्व चाचण्यांमध्ये उच्च अचूकता आणि सुसंगतता दर्शविली आहे.

एकूण 17 ईआरएसआरची विविध श्रेणींमध्ये यशस्वी चाचणी घेण्यात आली. चाचण्यांमध्ये रेंज परफॉर्मन्स, इलेक्ट्रॉनिक टाइम फ्यूज फंक्शनिंग आणि वॉरहेड फंक्शनिंग यासारख्या सर्व विशिष्ट उद्दिष्टांच्या यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या.

युजर ट्रायल यशस्वीपणे पूर्ण झाल्यावर भारतीय नौदलामध्ये लवकरच ईआरएएसआर प्रणालीचा समावेश होण्याची शक्यता आहे. भारत डायनॅमिक्स लिमिटेड, हैदराबाद आणि सोलर डिफेन्स अँड एअरोस्पेस लिमिटेड, नागपूर हे ईआरएएसआर रॉकेट्सचे उत्पादन भागीदार आहेत.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO भारतीय नौदल आणि या प्रणालीचा विकास आणि चाचण्यांमध्ये सहभागी झालेल्या उद्योगांचे अभिनंदन केले आहे. भारतीय नौदलात ही यंत्रणा दाखल झाल्याने नौदलाची मारक शक्ती वाढेल, असे ते म्हणाले.

संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि DRDO चे अध्यक्ष डॉ. समीर व्ही कामत यांनीही ईआरएएसआरच डिझाइन आणि विकासामध्ये सहभागी झालेल्या पथकांची प्रशंसा केली.

टीम भारतशक्ती  

+ posts
Previous articleसागरी क्षेत्र जागरूकता मजबूत करण्यासाठी नौदल-BEL यांच्यात करार
Next articleचीन,पाकिस्तान,बांगलादेश एकत्रीकरणाचा भारतावर परिणाम होण्याची शक्यता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here