
भारतीय वंशाच्या या तंत्रज्ञाने आत्महत्या केल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे.
टेकक्रंचने दिलेल्या निवेदनात म्हटले आहेः “मुख्य वैद्यकीय परीक्षक कार्यालयाने (ओसीएमई) मृत व्यक्तीची ओळख सॅन फ्रान्सिस्को येथील 26 वर्षीय सुचिर बालाजी अशी केली आहे. मृत्यूच्या पद्धतीवरून ती आत्महत्या असल्याचे निश्चित करण्यात आले आहे.”
सॅन फ्रान्सिस्को पोलीस विभागाच्या प्रवक्त्याने टेकक्रंचला सांगितले की, 26 नोव्हेंबर रोजी बुकानन स्ट्रीट अपार्टमेंटमध्ये बालाजी मृतावस्थेत आढळला.
OpenAIच्या या माजी संशोधकाच्या मृतदेहाची तपासणी करण्यासाठी शहरातील लोअर हाईट जिल्ह्यातील अधिकारी आणि डॉक्टरांना बालाजीच्या निवासस्थानी पाचारण करण्यात आले. पोलिसांनी टेक वेबसाइटला सांगितले की, प्राथमिक तपासादरम्यान तिथे कोणताही गैरप्रकार किंवा झटापट झाल्याचा कसलाही पुरावा सापडला नाही.
सुचिर बालाजीच्या LinkedIn page वरील माहितीनुसार त्याने नोव्हेंबर 2020 ते ऑगस्ट 2024 पर्यंत OpenAI सोबत काम केल्याचे दिसून येते. चॅटजीपीटी विकसित करणारी तंत्रज्ञान कंपनी OpenAIने सांगितले की तंत्रज्ञाच्या मृत्यूची मिळालेली बातमी मन ‘सुन्न’ करणारी आहे.
“आज ही अविश्वसनीय दुःखद बातमी ऐकून आम्ही सुन्न झालो आहोत आणि या कठीण काळात आमच्या संवेदना सुचिरच्या प्रियजनांसोबत आहेत,” असे OpenAIच्या प्रवक्त्याने टेकक्रंचला पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे.
अब्जाधीश एलन मस्क यांनी तंत्रज्ञाच्या मृत्यूवर प्रतिक्रिया देताना एक्सवर एक काहीसा बुचकळ्यात टाकणारा संदेश पोस्ट केला.
एलन मस्क आणि सॅम ऑल्टमन यांनी संयुक्तपणे 2015 मध्ये OpenAI ची स्थापना केली. मस्क यांनी नंतर ती कंपनी सोडली आणि प्रतिस्पर्धी स्टार्टअप xAIची स्थापना केली.
न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत, सुचिर बालाजी यांनी सांगितले की त्यांनी OpenAI च्या नोकरीचा राजीनामा दिला कारण त्यांना यापुढे तंत्रज्ञानात योगदान द्यायचे नव्हते. त्यांचा असा विश्वास होता की यामुळे समाजाचे फायद्यापेक्षा अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. OpenAI कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन करत असल्याचा देखील बालाजी यांनी आरोप केला असल्याचे वृत्त आहे.
तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि जनरेटिव्ह एआयच्या मुद्द्यावर बोलताना बालाजी यांनी यापूर्वी एक्सवर लिहिले होते, “काही संदर्भ देण्यासाठीः मी सुमारे 4 वर्षे OpenAI मध्ये होतो आणि त्यातील शेवटची दीड वर्षे ChatGPTवर काम केले. मला सुरुवातीला कॉपीराइट, त्याचा योग्य वापर इत्यादींबद्दल जास्त माहिती नव्हती. मात्र GenAI कंपन्यांविरुद्ध दाखल करण्यात आलेले सर्व खटले पाहिल्यानंतर माझी उत्सुकता ताणली गेली.”
“जेव्हा मी हा मुद्दा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मी या निष्कर्षावर आलो की याचा योग्य वापर करणे हा एआय उत्पादनांसाठी एक अतिशय अविश्वसनीय संरक्षणासारखा उत्पादकांना दिसतो कारण ते प्रशिक्षित व्यक्तींनी तयार केलेल्या डेटाशी स्पर्धा करणारे पर्याय तयार करू शकतात हा त्यातला मूलभूत मुद्दा आहे,” असे त्याने म्हटले.
“मी माझ्या या पोस्टमध्ये या सगळ्या गोष्टींवर विश्वास का ठेवतो याची अधिक तपशीलवार कारणे लिहिली आहेत. अर्थात, मी वकील नाही, परंतु तरीही मला असे वाटते की गैर-वकिलांसाठी देखील कायदा समजून घेणे महत्वाचे आहे,” असे बालाजीने एक्सवर पोस्ट केले होते.
एकीकडे असे म्हटले जात असताना, ही ChatGPT किंवा OpenAI वरील टीका म्हणून कोणी वाचावे असे वाटत नाही, कारण योग्य वापर आणि जनरेटिव्ह एआय हा कोणत्याही एका उत्पादन किंवा कंपनीपेक्षा अधिक व्यापक मुद्दा आहे. मी मशीन लर्निंगच्या संशोधकांना कॉपीराईटविषयी अधिक जाणून घेण्यासाठी प्रोत्साहित करतो – हा खरोखरच एक महत्त्वाचा विषय आहे आणि गूगल बुक्ससारखे वारंवार उद्धृत केले जाणारे उदाहरण प्रत्यक्षात वाटते तितके सहाय्यक नाही,” असे बालाजीने एक्सवर लिहिले.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)