Indo-UAE संयुक्त उपक्रमांतर्गत CRPF ला स्नायपर रायफल्स पुरवण्याचा करार

0

भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत (Indo-UAE JV), प्रगत स्नायपर रायफल आणि दारूगोळा पुरवण्याचा करार नुकताच पूर्ण केला गेला. ही देशांतर्गत संरक्षण खरेदीतील एक महत्त्वाची घटना आहे. अबू धाबी येथील कॅराकल आणि हैदराबादच्या इनकॉम टेल लि.(मेघा इंजिनिअर्सिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लि. कंपनी) यांच्यातील इनकॉम-कॅराकल (Incomm-Caracal) या संयुक्त उपक्रमाने, भारताच्या सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स (CRPF) कडून प्रगत स्नायपर रायफल आणि दारूगोळा पुरवण्यासाठी 17 कोटी रुपयांचा करार प्राप्त केला.

या पहिल्या ऑर्डरमध्ये .338 लापुआ मॅग्नम या कॅलिबरमधील 200 सीएसआर 338 रायफल्स आणि 20,000 फेऱ्यांचा दारूगोळा यांचा समावेश आहे. हे संयुक्त अरब अमिराती-भारत यांच्यातील वाढत्या संरक्षण सहकार्याचे आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत देशांतर्गत उत्पादनाचे महत्त्व दर्शविते.

स्पर्धात्मक निवड – अनेक दावेदारांमध्ये विजय

इनकॉम-कॅराकलने तांत्रिक आणि आर्थिक अशा दोन्ही मूल्यांकनांमध्ये अनेक प्रस्थापित प्रतिस्पर्धकांना मागे टाकून हा करार मिळवला. इस्रायल-समर्थित पीएलआर सिस्टिम्स आर्थिक टप्प्यातून बाहेर पडली, तर एसएसएस डिफेन्स, कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स, ह्यूजेस प्रिसीजन आणि नेको डेझर्ट टेक या देशांतर्गत स्पर्धकांना तांत्रिक चाचण्यांमध्ये अपयश आले.

या विजयामुळे संयुक्त अरब अमिरातीस्थित कॅराकल कंपनीची, भारतीय सुरक्षा क्षेत्रातील पकड मजबूत झाली आहे. यामुळे त्यांच्या तंत्रज्ञान हस्तांतरण आणि स्थानिक उत्पादनाच्या धोरणालाही पुष्टी मिळाली आहे.

संयुक्त अरब अमिरातीतून भारतात पहिले संरक्षण तंत्रज्ञान हस्तांतरण

कॅराकल आणि इनकॉम यांच्यातील भागीदारी हा एक ऐतिहासिक टप्पा आहे. संयुक्त अरब अमिरातीतून भारतात पहिल्यांदाच संरक्षण उत्पादन तंत्रज्ञानाचे हस्तांतरण झाले आहे. हैदराबादमधील ही फॅसिलिटी आता कार्यान्वित झाली आहे. येथे भारतीय परिस्थिती आणि गरजांनुसार छोट्या शस्त्रांची संपूर्ण श्रेणी तयार केली जात आहे.

कॅराकलचे सीईओ हमाद सालेम अल अमेरि म्हणाले की, “हे सहकार्य या गोष्टीचा पुरावा आहे की, जेव्हा महत्त्वाकांक्षा, क्षमता आणि पाठिंबा एकत्र येतात, तेव्हा भारतात उत्पादन करणे केवळ शक्यच नाही, तर ते यशस्वी देखील होते.”

ही फॅसिलिटी केवळ भारतीय सैन्यावर लक्ष केंद्रित करत नाही, तर कॅराकलच्या विस्तृत आंतरराष्ट्रीय धोरणाचा भाग म्हणून जागतिक ग्राहकांना शस्त्रे निर्यात करण्याचे केंद्र (export hub) म्हणूनही काम करते.

स्थानिक पातळीवर तयार केलेली सशास्त्रे

हैदराबादमधील इनकॉम-कॅराकल स्मॉल आर्म्स कॉम्प्लेक्समध्ये अनेक प्रगत शस्त्रे तयार केली जातात, ज्यामध्ये कार 816, एक 5.56×45 मिमी नाटो क्लोज-क्वार्टर बॅटल रायफल; कार 817, एक 7.62×51 मिमी नाटो असॉल्ट रायफल, सीएसआर 338 आणि सीएसआर 308 यांचा समावेश आहे, ज्या .338 लापुआ मॅग्नम आणि .308 विंचेस्टर कॅलिबरमध्ये उपलब्ध असलेल्या बोल्ट-अॅक्शन स्नायपर रायफल्स आहेत. याव्यतिरिक्त, ते सीएसआर 50, एक 12.7×99 मिमी नाटो अँटी-मटेरियल स्नायपर रायफल; सीएमपी9 , एक 9×19 मिमी कॉम्पॅक्ट सबमशीन गन; आणि कॅराकल ईएफ आणि एफ जेन II यांचा समावेश आहे, ज्या 9×19 मिमी सेमी-ऑटोमॅटिक पिस्तुल आहेत, यांचे उत्पादन करतात.

ही सर्व शस्त्रे, भारतीय सशस्त्र सेना, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, राज्य पोलीस दल आणि विशेष ऑपरेशन्स युनिट्सच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केली आहेत. फॅसिलिटीच्या मॉड्यूलर सेटअपमुळे निर्यातीसाठी उत्पादन झपाट्याने वाढवता येते.

भारतात दारूगोळा उत्पादनाला गती

शस्त्र निर्मितीबरोबरच, कॅराकलने भारतात महत्त्वाच्या दारूगोळ्याच्या कॅलिबरच्या स्थानिक उत्पादनाला वेग दिला आहे. यात 9×19 मिमी; 5.56×45 मिमी; 7.62×51 मिमी; आणि 12.7×99 मिमी (.50 बीएमजी) यांचा समावेश आहे.

कॅराकलला दारूगोळ्याचे उत्पादन हा एक महत्त्वाचा उपक्रम वाटतो, जो भारतीय संरक्षण दले आणि प्रादेशिक सहयोगींना सेवा देण्यासाठी वेगाने वाढवता येऊ शकतो.

अल अमेरि यांनी भरतशक्तीला सांगितले की, “आम्ही भारतात मौल्यवान कामाचा अनुभव मिळवला आहे, ज्यामुळे आम्हाला आमच्या स्थानिक दारूगोळ्याची क्षमता वेगाने वाढविण्यात मदत मिळेल.”

जागतिक धोरण, भारतीय अंमलबजावणी

संयुक्त अरब अमिरातीच्या एज ग्रुप अंतर्गत एक प्रमुख संस्था म्हणून, कॅराकल जर्मनी, अमेरिका आणि आता भारतात उत्पादन ऑपरेशन्ससह जागतिक स्तरावर विस्तार करत आहे. कंपनी आफ्रिका आणि आग्नेय आशियामध्ये भविष्यातील विस्ताराचे लक्ष्य ठेवत आहे, यासाठी ती धोरणात्मक भागीदारी आणि लवचिक उत्पादन मॉडेलचा लाभ घेत आहे.

भारतात, कॅराकलने एमकेयू सारख्या देशांतर्गत संरक्षण कंपन्यांसोबत सहकार्य प्रस्थापित केले आहे, जेणेकरून लष्करी आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या ग्राहकांसाठी शस्त्रे, ऑप्टिक्स आणि उपकरणे एकत्रित असलेली पूर्णपणे समाकलित शस्त्र प्रणाली देऊ शकतील.

भारताच्या संरक्षण क्षेत्रासाठी धोरणात्मक परिणाम

हा सीआरपीएफ करार, केवळ एक व्यावसायिक विजय नाही. हे भारताच्या संरक्षण खरेदीमधील एका व्यापक प्रवृत्तीचा संकेत आहे. स्वदेशी उत्पादन क्षमता असलेल्या परदेशी-मूळ प्लॅटफॉर्मसाठी वाढती मोकळीक यातून अधोरेखित होते. इनकॉम-कॅराकल संयुक्त उपक्रम, त्याच्या सखोल एकीकरणामुळे, भारताच्या ‘आत्मनिर्भर भारत’ चौकटीखालील भविष्यातील आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी एक आदर्श ठरू शकतो.

वितरणाची अंतिम मुदत आणि तांत्रिक वैशिष्ट्ये

कंपनीच्या अधिकाऱ्यांनुसार, सीएसआर 338 स्नायपर रायफलचा पहिला लॉट 2025 च्या चौथ्या तिमाहीत (Q4 2025) वितरित केला जाण्याची शक्यता आहे.

या रायफलमध्ये .338 लापुआ मॅग्नम कॅलिबर आणि 27-इंच बॅरल सारखी प्रमुख तांत्रिक वैशिष्ट्ये आहेत, जी उत्कृष्ट अचूकता आणि शक्ती देतात. त्याची मॅगझीन क्षमता 10 फेऱ्यांची आहे आणि सुधारित शूटिंग कामगिरीसाठी दोन-टप्प्यातील समायोज्य अचूक ट्रिगर आहे. सुरक्षेला प्राधान्य दिले आहे, कारण त्यात अॅम्बिडेक्स्ट्रस कंट्रोल्स आहेत, ज्यामुळे ते डाव्या आणि उजव्या दोन्ही हाताच्या नेमबाजांसाठी वापरण्यास सोयीस्कर आहे. याव्यतिरिक्त, त्याचे स्टॉक बहुउपयोगी आहे, जे अधिक सुलभता आणि आरामासाठी चार-स्थिती, टेलिस्कोपिक आणि फोल्डेबल डिझाइन प्रदान करते.

इनकॉमचे संचालक सुमनथ पातुरू यांनी, या कराराचा व्यापक प्रभाव अधोरेखित केला: “हे केवळ रायफल पुरवण्याबद्दल नाही, तर जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान हस्तांतरित करणे, भारतात उच्च-कुशल उत्पादन रोजगार निर्माण करणे आणि देशाच्या संरक्षण औद्योगिक तळाला मजबूत करण्याबद्दल आहे. आमचे उद्दिष्ट वेळेवर वितरण करणे, लाइफसायकल सेवांद्वारे समर्थन देणे आणि भविष्यातील मागणीसाठी उत्पादन वाढवणे हे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

मूळ लेखिका- हुमा सिद्दिकी

+ posts
Previous articleExtension for CDS Gen Chauhan: Success in War, Stalemate in Reform
Next article‘First-of-its-kind’: India Test-Fires Agni-Prime Missile from Rail-Based Launcher

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here