गाझा शांतता योजनेवरील संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाला इंडोनेशियाचा पाठिंबा

0
इंडोनेशियाचा

मंगळवारी, इंडोनेशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले की, गाझामधील युद्ध समाप्तीसाठी आणि आंतरराष्ट्रीय स्थिरीकरण दल (स्टेबलायझेशन फोर्स) तयार करण्यासाठी, अमेरिकेने तयार केलेल्या आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या योजनेला पाठिंबा देणाऱ्या, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावाचे इंडोनेशिया स्वागत करते.

परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या इव्हॉन म्युवेंगकांग यांनी सोमवारी सांगितले की, “इंडोनेशियाचा या ठरावाला पूर्ण पाठिंबा असून, सर्व पक्षांचा- विशेषतः पॅलेस्टिनी प्राधिकरणाचा यात सहभाग आवश्यक असल्याचे आम्ही अधोरेखित केले आहे.”

इव्हॉन यांनी एका निवेदनात म्हटले की, “हा ठराव पॅलेस्टिनी प्राधिकरणाच्या क्षमता वाढीद्वारे संघर्ष निराकरणाला आणि दीर्घकालीन शांततेला प्राधान्य देतो.” त्या पुढे म्हणाल्या की, “इंडोनेशिया नेहमीच एका स्वतंत्र आणि सार्वभौम पॅलेस्टिनी राष्ट्राला पाठिंबा देईल.”

शांतता राखण्यासाठी पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न

ट्रम्प प्रशासन इंडोनेशिया आणि इजिप्तसारख्या देशांना, शांतता रक्षक दलासाठी सैन्य पुरवण्यास राजी करण्याचा प्रयत्न करत आहे. हे दल शस्त्रे निष्क्रिय करून आणि लष्करी पायाभूत सुविधा नष्ट करून गाझाच्या लष्करीकरण प्रक्रियेला पाठिंबा देईल.

जगातील सर्वात मोठे मुस्लिम-बहुल राष्ट्र आणि पॅलेस्टिनी मुद्द्याचे दीर्घकाळ समर्थन करणारा इंडोनेशिया, आरोग्य आणि पायाभूत सुविधांसारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करेल,’ असे सांगत, देशाच्या संरक्षण मंत्रालयाने गेल्या आठवड्यात स्पष्ट केले की, “ते 20,000 सैनिक तैनात करण्यास तयार आहेत.”

इंडोनेशियाचा पॅलेस्टाईनला दीर्घकालीन पाठिंबा

इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो, यांनी सप्टेंबरमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्र महासभेत सांगितले की,
“जर संयुक्त राष्ट्रांचा ठराव आला, तर इंडोनेशिया गाझामध्ये 20,000 किंवा त्याहून अधिक शांततेचे रक्षण करणारे सैन्य तैनात करण्यास तयार आहे.”

इस्रायल आणि पॅलेस्टिनी अतिरेकी गट हमास यांनी गेल्या महिन्यात, गाझासाठी ट्रम्प यांच्या 20-कलमी योजनेच्या पहिल्या टप्प्याला सहमती दर्शविली, ज्यामध्ये युद्धविराम आणि ओलिसंना सोडण्याचा करार समाविष्ट आहे.

परंतु संयुक्त राष्ट्रांचा हा ठराव, गाझातील एका अंतरिम प्रशासकीय संस्थेला वैधता प्रदान करण्यासाठी आणि सैन्य पाठवण्याचा विचार करणाऱ्या देशांना आश्वस्त करण्यासाठी, एक महत्त्वपूर्ण मार्ग असल्याचे म्हटले जाते.

इंडोनेशिया, पॅलेस्टाईनमध्ये द्वि-राष्ट्र उपायांचे समर्थन करतो. त्याने अनेकदा इस्रायलच्या गाझामधील हिंसेचा निषेध केला आहे आणि मानवतावादी मदत पाठवली आहे. सध्या, इंडोनेशियाचे इस्रायलसोबत कोणतेही राजनैतिक संबंध नाहीत.

विश्लेषकांचे म्हणणे आहे की, प्रबोवो यांच्या परराष्ट्र धोरणाच्या भूमिकेत अलीकडच्या काही महिन्यांत थोडासा बदल झाला आहे. ऑक्टोबरमध्ये संयुक्त राष्ट्रांमध्ये दिलेल्या भाषणाकडे त्यांनी लक्ष वेधले, ज्यात त्यांनी स्वतंत्र पॅलेस्टिनी राष्ट्राच्या मागणीचा पुनरुच्चार केला होता, मात्र त्यासोबतच इस्रायलच्या सुरक्षिततेची आणि संरक्षणाची हमी देण्याची गरजही अधोरेखित केली होती.

टीम स्ट्रॅटन्यूज

+ posts
Previous articleदलाई लामांचा पुनर्जन्म हा धार्मिक मुद्दा आहे, राजकीय खेळ नाही: माजी NSA
Next articleजागतिक आर्थिक परिस्थिती अनिश्चित; धोका कमी करण्याची गरज: जयशंकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here