PM मोदींच्या मालदीव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, ‘INS Jatayu’ ची विशेष तैनाती

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी, 26 जुलै रोजी मालदीवच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, तिथला ऐतिहासिक दौरा करण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर, हिंद महासागर क्षेत्रातील भू-राजकीय तणाव पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. या भागात चीनने आपला आर्थिक आणि लष्करी प्रभाव वाढवायला सुरुवात केली असून, याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ठोस व योजनाबद्ध पावले उचलायला सुरुवात केली आहे. यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण पाऊल म्हणजे, लक्षद्वीपमधील मिनिकॉय बेटावर भारतीय नौदलाचे ‘INS Jatayu’ हे विशेष नौदल तळ कार्यान्वित करण्यात आले आहे.

मालदीवपासून फक्त 250 किलोमीटर अंतरावर असलेल्या INS Jatayu स्थापनेमुळे, भारताचे नौदल धोरण अधिक आक्रमक झालेले दिसून येत आहे. या तळावरून चीनच्या हिंद महासागर मार्गावरील सागरी वाहतुकीवर लक्ष ठेवणे आणि गरज भासल्यास ती अडवणे शक्य आहे. हेच मार्ग चीनच्या 80% ऊर्जेच्या पुरवठ्याचे आणि आंतरराष्ट्रीय सागरी व्यापाराचे मुख्य मार्ग आहेत.

Jatayu: हिंद महासागरातील भारताचा दक्षिणेकडील रक्षक

INS जटायू, हे हिंद महासागरातील “नाईन डिग्री चॅनेल”च्या उत्तर भागात स्थित आहे, जो जगातील एक अतिशय महत्त्वाचा आणि वर्दळीचा सागरी मार्ग मानला जातो. दररोज सुमारे 15,000 मालवाहू जहाजे, म्हणजे दर मिनिटाला 10 ते 12 जहाजे या मार्गावरून जातात. हा मार्ग मध्यपूर्व, आफ्रिका, आणि रशियाला आग्नेय आशिया व पॅसिफिक भागाशी जोडतो.

हा मार्ग फक्त सागरी वाहतुकीचा श्वास नसून, चीनसाठी एक धोका देखील आहे, कारण त्यांच्या तेल आणि व्यापार मालाची मोठ्या प्रमाणावर आयात-निर्यात या मार्गावर अवलंबून आहे. यापूर्वी भारताकडे अंदमान-निकोबार कमांडद्वारे मलक्का सामुद्रधुनीवर लक्ष ठेवण्याची व्यवस्था होती. परंतु INS Jatayu च्या स्थापनेमुळे भारताकडे आता दुसरा प्रभावी पर्याय आहे, जो चीनच्या पुरवठा मार्गाच्या अधिक जवळ आहे.

चीनची सावध पावले आणि भारताची प्रतिकारशक्ती

“स्ट्रिंग ऑफ पर्ल्स” या रणनीतीचा भाग म्हणून, चीन मालदीवमध्ये आपला प्रभाव वाढवत आहे, हे भारतासाठी चिंतेचे कारण ठरत आहे. “बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI)” अंतर्गत, चीनने मालदीवमध्ये अनेक पायाभूत प्रकल्पांना अर्थसहाय्य केले असून, स्थानिक राजकारणातही हस्तक्षेप वाढवला आहे.

2023 मध्ये, मोहम्मद मुईझ्झु यांच्या मालदीवच्या राष्ट्राध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर भारतविरोधी भूमिका अधिक ठळक झाली. त्यांनी “इंडिया आऊट” मोहिमेच्या आधारे निवडणूक लढवली आणि भारताच्या लष्करी उपस्थितीविरोधात उघड भूमिका घेत चीनशी जवळीक साधली. त्यांनी पहिला परदेश दौरा बीजिंगला केला, ज्यामुळे दिल्लीमध्ये अस्वस्थता निर्माण झाली.

परंतु जून 2024 मध्ये, मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळाच्या शपथविधीला मुईझ्झु यांनी उपस्थित राहणे आणि त्यानंतर मोदींचा नियोजित मालदीव दौरा हे दोन्ही घटनाक्रम संबंधांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता दर्शवतात. याला अनेक राजनैतिक विश्लेषक “नवीन समीकरणांची सुरुवात” म्हणून पाहत आहेत.

हिंद महासागरातील चीनची असुरक्षितता

हिंद महासागरात चीनची कमकुवत बाजू त्याच्या लष्करी क्षमतेमुळे नाही, तर पुरवठा मार्गांवरील अवलंबनामुळे आहे. चीनचा आफ्रिका आणि खाडी देशांसोबत मोठ्या प्रमाणावर व्यापार, विशेषतः तेल व्यापार हा सागरी मार्गांनी होतो. जर तणाव वाढला, तर भारताकडे अंडमान-निकोबार (पूर्व) आणि मिनिकॉय (पश्चिम) अशा दोन ठिकाणी चीनच्या पुरवठा मार्गावर प्रभाव टाकण्याची क्षमता आहे.

INS Jatayu हे केवळ एक नौदल तळ नसून, चीनला एक स्पष्ट संदेश आहे की: “भारत आता अनेक पातळ्यांवर चीनच्या विस्तारवादी धोरणाला प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहे.”

INS Jatayu वरील मुख्य विकसनाधीन क्षमता:

  • लष्करी वाहतूक विमानांच्या उतरण्यासाठी सक्षम असलेली 2.5 किमी लांबीची धावपट्टी
  • ब्राह्मोस क्षेपणास्त्र यंत्रणा – भूमीवरून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांची तैनाती
  • संपूर्णपणे कार्यरत तटरेखा रडार स्टेशन – अरबी समुद्रात पृष्ठभाग व पाणबुडी हालचालींच्या निरीक्षणसाठी


INS Jatayu: भारताच्या सागरी धोरणातील टर्निंग पॉइंट

भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनी INS जटायूला, “सागरी समतोल राखणारा” तळ असे संबोधले आहे, विशेषतः जेव्हा चीनची व्यापारी आणि नौदल वाहतूक हिंद महासागरात वाढत आहे.

या तळाच्या प्रमुख जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे असतील:

  • नाईन डिग्री चॅनेलमधील हालचालींचे सखोल निरीक्षण
  • नौदल व हवाई मोहिमांसाठी पुढचा कार्यकारी तळ म्हणून वापर
  • चाचणी, जलद प्रतिसाद व मानवतावादी मदतीच्या मोहिमांसाठी पुरवठा केंद्र

चीनने मालदीवमध्ये बंदरे, विमानतळ आणि पूल यांसारख्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक वाढवलेली असताना, भारताची पावले ठाम असून क्षेत्रीय स्थैर्यावर लक्ष केंद्रीत आहेत. मोदींचा दौरा आणि INS जटायूच्या उभारणीची वेळ, मालदीवसाठी मैत्रीचा हात तर चीनसाठी संयमात पण ठाम इशारा ठरत आहे.

भारताचा रणनीतिक मास्टरस्ट्रोक

पंतप्रधान मोदींचा मालदीव दौरा अनेक स्तरांवर भक्कम रणनीतिक संदेश देणारा आहे, ज्यामध्ये: भारत-मालदीव संबंधांचा पुनर्विचार, चीनच्या वाढत्या प्रभावाला उत्तर आणि हिंद महासागरात भारताच्या सागरी सामर्थ्याची ठाम पुनःस्थापना या मुद्द्यांचा समावेश आहे.

— हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleINS Jatayu Positioned to Counter China as PM Modi Plans Strategic Visit to Maldives
Next articleगाझामध्ये मदतीची वाट पाहत असलेले 67 पॅलेस्टिनी नागरिक ठार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here