भारतीय नौदलात नव्याने समाविष्ट झालेली stealth-guided missile frigate INS Tushil, गिनीच्या आखातातील गस्त मोहिमेनंतर नामिबियातील वॉल्विस बे येथे यशस्वीरित्या दाखल झाली. आफ्रिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरील युद्धनौकेचा हा पहिलाच प्रवास आहे, जो या प्रदेशातील सागरी सहकार्याला बळकटी देण्याच्या भारताच्या वचनबद्धतेला अधोरेखित करतो.”सागरी सहकार्य वाढवणे आणि समान धोक्यांचा सामना करण्यावर लक्ष केंद्रित करून भारत आणि नामिबियामधील द्विपक्षीय संबंध मजबूत करणे हा या भेटीचा उद्देश होता,” असे भारतीय नौदलाने म्हटले आहे.
आपल्या भेटीदरम्यान, INS Tushilने नामिबियन नौदलाशी व्यावसायिक, सांस्कृतिक आणि सामाजिक मैत्री वाढविण्याच्या दृष्टीने तयार केलेल्या अनेक उपक्रमांमध्ये भाग घेतला. आयएनएस तुशिलचे कमांडिंग ऑफिसर कॅप्टन पीटर वर्गीस आणि वाल्विस बेचे उपमहापौर सारा नदापेवोशाली मुतोंडोका तसेच नामिबियन नौदलाचे नेव्हल ऑपरेशन्सचे कमांडर रिअर ॲडमिरल ज्युनियर ग्रेड एरातस लाझारस यांच्यासह नामिबियाचे प्रमुख अधिकारी यांच्यासोबत भारतीय नौदल अधिकाऱ्यांच्या विविध बैठका पार पडल्या.
या भेटीदरम्यान व्यावसायिक संवादांमध्ये संयुक्त परिचालन नियोजन सत्रे, परस्पर भेटी आणि नौदल कर्मचाऱ्यांमध्ये ज्ञानाची देवाणघेवाण यांचा समावेश होता. मैत्रीपूर्ण व्हॉलीबॉल सामने, संयुक्त योग सत्रात नामिबियन नौदल, स्थानिक पोलिस कर्मचारी आणि भारतीय उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यांचा सहभाग यासह हे संबंध अधिकृत कर्तव्यांच्या पलीकडेही वाढले.
आपल्या सामुदायिक आवाक्याची व्याप्ती वाढवण्याचा एक भाग म्हणून, वॉल्विस खाडीतील रहिवाशांचे INS Tushilवर स्वागत करण्यात आले, त्यांना युद्धनौकेच्या प्रगत क्षमतांची झलक दाखवण्यात आली तसेच भारतीय नौदलाचे तांत्रिक कौशल्यही दाखवले गेले.
INS Tushilचा नामिबिया दौरा भारत आणि नामिबियामधील वाढती सागरी भागीदारी अधोरेखित करून हिंद महासागर आणि आफ्रिकन सागरी क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि सहकार्याप्रती भारताची व्यापक बांधिलकी प्रतिबिंबित करतो.
INS Tushil ही युद्धनौका रशियातील कॅलिनिनग्राड येथील यंतर शिपयार्डने बांधली असून 9 डिसेंबर 2024 रोजी ती भारतीय नौदलात दाखल झाली. या युद्धनौकेची पहिली कार्यान्वित तैनाती 17 डिसेंबर 2024 रोजी सुरू झाली, जेव्हा ती कॅलिनिनग्रॅडहून भारताकडे रवाना झाली. आयएनएस तुशिलने लंडन, डकार आणि सेनेगलसह अनेक मित्र देशांना पोर्ट कॉल केले. या नौकेने वाटेत इतर नौदलांसह संयुक्त गस्त आणि सागरी भागीदारी सरावातही भाग घेतला.
टीम भारतशक्ती