Friday, March 13, 2026
Solar
Home Bharat Shakti Marathi इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजताबा यांचा पहिला संदेश‌ प्रसारित, अमेरिकेला दिला इशारा

इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजताबा यांचा पहिला संदेश‌ प्रसारित, अमेरिकेला दिला इशारा

0
सर्वोच्च
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा दुसरा मुलगा मोजताबा खामेनी (उजवीकडे) यांनी  1 ऑक्टोबर 2024 रोजी तेहरान, इराण येथील हिजबुल्लाच्या कार्यालयाला भेट दिली. [इराणी सर्वोच्च नेत्याचे कार्यालय/डब्ल्यू. ए. एन. ए. (पश्चिम आशिया न्यूज एजन्सी)/हँडआउट व्हाया रॉयटर्स/फाईल फोटो] 

इराण आपल्या हुतात्म्यांच्या रक्ताचा बदला घेईल, ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) बंदच ठेवेल आणि अमेरिकेच्या तळांवर हल्ले करेल, असे इराणचे नवीन सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी एका निवेदनात म्हटले आहे. गुरुवारी सरकारी दूरचित्रवाणीवर हे निवेदन वाचून दाखवण्यात आले. आपल्या दिवंगत वडिलांची गादी सांभाळल्यानंतरची ही त्यांची पहिलीच प्रतिक्रिया होती.

या आव्हानात्मक संबोधनात, खामेनी यांनी म्हटले की, अमेरिकेने या प्रदेशातील आपले सर्व लष्करी तळ बंद केलेच पाहिजेत. इराणच्या किनारपट्टीवरून जाणारी आणि जगाच्या एकूण तेलपुरवठ्यापैकी पाचवा हिस्सा वाहून नेणारी होर्मुझची सामुद्रधुनी, शत्रूवर दबाव टाकण्यासाठी बंदच ठेवली गेली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

गुरुवारी इराकी बंदरात संशयित इराणी स्फोटकांनी भरलेल्या बोटींनी दोन तेल टँकरना धडक देऊन आग लावली. मध्य पूर्वेतून  केला जाणारा तेल पुरवठा बंद करण्यासाठी केल्या जाणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन आठवड्यांपूर्वी सुरू केलेले युद्ध अखेर आपण जिंकल्याचा जो दावा केला तो देखील खोडून काढला गेला आहे.

बसरा बंदराच्या किनाऱ्यावरून घेतलेल्या छायाचित्रांमध्ये रात्रीच्या आकाशात प्रचंड नारिंगी रंगाच्या आगीच्या गोळ्या उजळून निघाल्याचे दिसून आले आहे. या हल्ल्यामागे इराणी बोटींचा हात असल्याचा आरोप इराकी अधिकाऱ्यांनी केला. या हल्ल्यात किमान एक क्रू मेंबर मारला गेला आहे.

कालच, आखाती समुद्रात आणखी तीन जहाजांवर हल्ला करण्यात आला. इराणच्या क्रांतिकारी गार्ड्सने त्यापैकी किमान एका हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, एका थाई बल्क कॅरियरला आग लावण्यात आली होती, त्याने गार्ड्सने दिलेल्या आदेशांचे उल्लंघन केल्याचे म्हटले होते.

गुरुवारी संयुक्त अरब अमिरातीजवळ एका अज्ञात प्रक्षेपणाने आणखी एका कंटेनर जहाजाला धडक दिल्याचे वृत्त आहे.

फेब्रुवारीच्या अखेरीस अमेरिका-इस्रायलच्या बॉम्बहल्ल्याने सुरू झालेल्या या युद्धात आतापर्यंत सुमारे 2 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने जागतिक ऊर्जा पुरवठ्यात इतिहासातील सर्वात मोठा व्यत्यय निर्माण झाल्याचे म्हटले आहे.

इराणकडील लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा मोठा साठा नष्ट केल्याचा अमेरिका आणि इस्रायलचा दावा खोडून काढला. गुरुवारी कुवेत, इराक, संयुक्त अरब अमिराती (UAE), बहरीन आणि ओमानच्या दिशेने इराणी ड्रोन उडत गेल्याचे वृत्त आहे.

इराणचा पाठिंबा असलेल्या लेबनॉनमधील ‘हिजबुल्लाह’ या बंडखोरांच्या गटाने इस्रायलवर या युद्धातील आतापर्यंतचा सर्वात मोठा रॉकेट हल्ला केला; ज्यामुळे इस्रायलने पुन्हा एकदा बैरूतवर जोरदार हल्ले केले.

या आठवड्याच्या सुरुवातीला, हे युद्ध लवकरच संपेल असे ट्रम्प यांनी म्हटल्यामुळे तेलाचे दर काहीसे खाली आले होते; मात्र आता तेलाचे दर पुन्हा एकदा 100 डॉलर्स प्रति बॅरलच्या वर गेले आहेत. अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले थांबत नाहीत तोपर्यंत, जगातील सर्वात महत्त्वाचा ऊर्जा व्यापार मार्ग असलेल्या ‘हॉर्मुझच्या सामुद्रधुनी’तून (Strait of Hormuz) तेलाची वाहतूक होऊ देणार नाही, असे इराणने स्पष्ट केले आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज

+ posts
Previous articleतेलाच्या किंमत प्रति बॅरल 200 डॉलर करण्याची इराणची धमकी
Next articleसिटीबँकेच्या UAE मधील तर HSBC च्या कतारमधील शाखा तात्पुरत्या बंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here