चीनचे तियानगोंग अंतराळ केंद्र: सत्य की केवळ एक दिखावा?

0
तियानगोंग

चीनच्या तियानगोंग अंतराळ केंद्रावरून, 2021 मध्ये झालेल्या वैज्ञानिक उपक्रमाचा एक जुना स्क्रीनशॉट पुन्हा समोर आल्याने, या आठवड्यात ऑनलाइन चर्चेला उधाण आले आहे, ज्यामध्ये अनेक लोकांनी त्या फुटेजच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, सोशल मीडियावरील राष्ट्रप्रेमी युजर अकाउंट्सनी त्याला जलद प्रत्युत्तर देण्याची मोहीस सुरू केली आहे.

वेईबो, वीचॅट आणि शिआओहोंगशू सारख्या प्लॅटफॉर्म्सवर, एक चिथावणीखोर प्रश्न विजेच्या वेगाने पसरत आहे, तो म्हणजे “चीनचे तियानगोंग येथील अंतराळ स्थानक वास्तवात आहे की तो केवळ एक दिखावा आहे?”

डिसेंबर 2021 मधील एका प्रयोगादरम्यान घेतलेल्या या स्क्रीनशॉटमध्ये, ज्यात अंतराळवीर वांग यापिंग यांनी “बॉयन्सी डिसअपीअरन्स एक्सपेरिमेंट” (शून्य गुरुत्वाकर्षण वातावरणात केली जाणारी अदृश्य होण्याची चाचणी) केले होती, ज्याच एक पाण्याचा कप हवेत तरंगण्याऐवजी सूक्ष्म-गुरुत्वाकर्षणामध्येही स्थिर दिसत होता. नोव्हेंबर 2025 मध्ये, ही प्रतीमा पुन्हा व्हायरल झाली, तेव्हा इंटरनेट युजर्सनी त्या फ्रेमचे बारकाईने परीक्षण केले आणि कप त्याच जागी स्थिर का आहे, असा प्रश्न उपस्थित केला.

ही चर्चा, चीनच्या कठोर देखरेखीखाली असलेल्या इंटरनेट दुनियेतील, या आठवड्यातील बहुचर्चित विषयांपैकी एक बनली. फ्रेमच्या तपशीलांची तपासणी करणाऱ्या संशयास्पद पोस्ट्ससोबत, जाणीवपूर्वक हे चित्र दाखवण्यात आहे की, हे तयार करण्यात आले आहे, असे प्रश्न कमेंट्सद्वारे उपस्थित केले जात आहेत.

‘लिटल पिंक्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रप्रेमी युजर्सनी याला त्वरित प्रतिसाद दिला आणि कमेंट्समध्ये- देशभक्तीपर घोषणांनी, टीकाकारांचा निषेध करणाऱ्या पोस्ट्सनी आणि चायनीज कम्युनिस्ट पक्षाचा बचाव करणाऱ्या युक्तिवादाचा मारा केला. त्यांच्या पोस्ट्समध्ये, संशय उपस्थित करणाऱ्यांवर चीनच्या अंतराळ कामगिरीला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला.

काही तासांतच, राज्याशी संबंधित एक परिचित घोषणा #Anti-China Party Starts with One Image, Everything Else is Fabricated या जबरदस्तीने प्रचारित केलेल्या हॅशटॅगच्या रूपात पुन्हा समोर आली. जेव्हा जेव्हा टीकाकार एकच स्क्रीनशॉट शेअर करतात आणि अधिकृत कथानकावर प्रश्नचिन्ह उभे करतात, तेव्हा चिनी सोशल मीडियावर हा वाक्यांश सामान्यपणे वापरला जातो. याचा ढोबळ अर्थ असा आहे की: “चीनविरोधी लोक एक चित्र व्हायरल करतात, आणि बाकीचे सगळे खोटे असल्याचा दावा करतात.” हा हॅशटॅग पहिल्यांदाच चालवण्यात आलेला नाही; याआधी चीनचे लष्करी व्हिडिओ, शिंजियांग (Xinjiang) येथील प्रतिमा आणि यापूर्वीच्या अंतराळ-संबंधित पोस्ट्सबद्दलच्या वादांमध्ये त्याचा वापर करण्यात आला आहे, जिथे वापरकर्त्यांनी व्हिज्युअल तपशीलांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तियानगोंग प्रकरणात, जेव्हा राष्ट्रप्रेमींनी एका चौकटीतून कथा रचल्याचा आरोप करत, लोकांचा संशय दडपण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हाच नारा पुन्हा आला.

या वादात ज्यांनी चीनच्या अंतराळ केंद्राचा बचाव केला, त्यांचे म्हणणे होते की पाण्याचा तो कप अंतराळात तरंगू नये म्हणून एका जागी अडकवून ठेवला होता, आणि पाणी स्थिर दिसण्याचे कारण म्हणजे द्रवाचा नैसर्गिक गुणधर्म ‘पृष्ठभाग तणाव’ (Surface Tension) हा होता. दुसरीकडे, संशय घेणाऱ्या लोकांनी सांगितले की, मूळ पूर्ण व्हिडिओमध्ये अंतराळवीर वांग यापिंग तो कप नंतर उचलतात हे खरे आहे, पण ऑनलाइन फिरणारा तो विशिष्ट ‘स्क्रीनशॉट’ खूप जवळून घेतला असल्यामुळे लोकांना संभ्रम निर्माण झाला. काही टीकाकारांनी असे मत मांडले की, अधिकृत प्रसारणामध्ये जेव्हा असे ‘निवडक दृश्य’ दाखवले जातात, तेव्हा गैरसमज होण्याची शक्यता वाढते.

इतर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी राष्ट्रप्रेमी प्रतिक्रियेच्या तीव्रतेची खिल्ली उडवली, आणि एका प्लास्टिक कपबद्दलच्या किरकोळ अफवेमुळे एवढा आक्रमक बचाव का घेण्यात आला, असा प्रश्न विचारला. हा वाद वैज्ञानिक स्पष्टीकरणे, उपहास, राष्ट्रवादी वक्तृत्व आणि सततचे उठणारे प्रश्न, यांच्या मिश्रणात रूपांतरित झाला.

अनेक तास, वेईबोवर विचारांची एक खुली स्पर्धा रंगली, ज्यात संशयी पोस्ट्सनी सर्वांचे काही अंशीच लोकांचे लक्ष वेधले, परंतु त्यावर घेण्यात आलेल्या अधिकृत भूमिका, समर्थकांची प्रत्युत्तरे, -सरकारी हॅशटॅग आणि संबंधित सामग्रीने त्याला अधिक बढावा दिला.

कपाबद्दलचा गैरसमज अखेरीस स्पष्ट झाला असला तरी, या घटनेने हे अधोरेखित केले की, चीनमधील ऑनलाइन चर्चा किती वेगाने वाढू शकतात, विशेषत: जेव्हा त्यात तियानगोंगसारख्या हाय-प्रोफाइल राष्ट्रीय कार्यक्रमांच्या माध्यमातून, राज्याद्वारे जारी केलेल्या प्रतिमांचा समावेश असतो.

मूळ लेखिका- रेशम

+ posts
Previous articleउत्तर कोरियातील अण्वस्त्र साठ्यात चिंताजनक वाढ; अहवालातून धोक्याचे संकेत
Next articleझेलेन्स्की यांच्या चीफ ऑफ स्टाफच्या निवासस्थानी युक्रेनी अधिकाऱ्यांचा छापा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here