टॅरिफसाठी आता भारतीय बासमती तांदूळ लक्ष्य?

0
विविध माध्यमांच्या वृत्तांनुसार, राष्ट्रपती ट्रम्प भारतातून आयात होणाऱ्या तांदळावर टॅरिफ लावू शकतात. व्हाईट हाऊसमध्ये अलिकडेच अमेरिकन शेतकऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत – जे एक महत्त्वाचे मतदार आहेत आणि ज्यांना टॅरिफमुळे जास्त खर्च आणि बाजारपेठेतील आव्हानांचा सामना करावा लागत आहे – ट्रम्प यांनी दावा केला की भारत अमेरिकेत तांदळाचे   अवपुंजन (एखाद्या देशात मोठ्या प्रमाणात वस्तूंची निर्यात केली जाते, ज्यामुळे त्या देशातील वस्तू निर्माण करणाऱ्या व्यापारीमंडळांना आर्थिक धोका निर्माण होतो) करत आहे.

 

“भारताला असे करण्याची परवानगी का आहे (अमेरिकेत तांदळाचे अवपुंजन करणे)? त्यांना टॅरिफ भरावा लागतो का? त्यांना तांदळावर सूट आहे का?”  असे त्यांनी ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांना विचारले.त्यावर “नाही सर, आम्ही अजूनही त्यांच्याबरोबरच्या व्यापार करारावर काम करत आहोत,” असे उत्तर होते.

“पण त्यांनी अवपुंजन करू नये. म्हणजे, मी ते ऐकले. मी ते इतरांकडून ऐकले. ते ते करू शकत नाहीत,” असे ट्रम्प म्हणाले होते.

यामुळे भारताविरुद्ध जागतिक व्यापार संघटनेच्या सुरू असलेल्या खटल्याबद्दल चर्चा झाली जिथे अमेरिकेने दिल्लीला दिलेल्या निर्यात अनुदानाबद्दल तक्रार केली आहे.

ग्लोबल ट्रेड रिसर्च इन्स्टिट्यूट (GTRI) नुसार, ट्रम्प यांनी जरी टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला तरी अमेरिकेने भारतातून 400 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपेक्षा कमी किमतीचा तांदूळ खरेदी केला, ज्यामध्ये प्रामुख्याने बासमती तांदळाचा समावेश होता. भारतातून परदेशात पाठवल्या जाणाऱ्या एकूण तांदळाच्या हे प्रमाण सुमारे 3 टक्के आहे.

“भारतीय तांदूळ निर्यात उद्योग लवचिक आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आहे,” असे इंडियन राईस एक्सपोर्टर्स फेडरेशनचे उपाध्यक्ष देव गर्ग म्हणाले. “अमेरिका एक महत्त्वाचा ग्राहक असला तरी, जागतिक बाजारपेठेत भारताच्या तांदळाच्या निर्यातीत विविधता आहे.

नवीन टॅरिफ सुधारणेपूर्वी, अमेरिकन बाजारपेठेत भारतीय तांदळाच्या आयातीवर 10 टक्के टॅरिफ लावण्यात आला होता. अलीकडील वाढीमुळे हे प्रमाण 50 टक्क्यांपर्यंत वाढले आहे, असे टाईम्स ऑफ इंडियामधील एका बातमीत म्हटले आहे. तरीही, निर्यात कायम राहिली आहे, जी ग्राहकांसाठी उत्पादनाचे मूलभूत महत्त्व दर्शवते.

बाजारपेठेतील निरीक्षणांवरून असे दिसून येते की अमेरिकन ग्राहकांना वाढीव टॅरिफ खर्चाचा मोठा भाग किरकोळ किमतींद्वारे सहन करावा लागत आहे, तर भारतीय उत्पादक आणि निर्यातदार त्यांचे मागील महसूल स्तर कायम ठेवत आहेत.

भारताची मुख्य तांदूळ निर्यात बाजारपेठ आखाती राज्ये आणि अशा ठिकाणी आहेत जिथे भारतीयांची लोकसंख्या मोठी आहे. भारतीय पाककृती आणि बिर्याणी सारख्या पदार्थांची वाढती लोकप्रियता पाहता -जे फक्त बासमती तांदळापासून बनवले जातात- या ठिकाणांची निर्यात मोठी आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज

+ posts
Previous articleLive शस्त्र चाचणीनंतर ऑस्ट्रेलियाने दिली घोस्ट बॅट ड्रोनची ऑर्डर
Next articleIMF ची पाकिस्तानच्या कार्यक्रमासाठी 1.2 अब्ज डॉलर्सच्या कर्जाला मंजुरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here