दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन केलेल्या इस्लामिक स्टेटच्या अफगाण शाखा असलेल्या इसिस-खोरासनच्या तीन संशयित सदस्यांना बेल्जियममध्ये टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये ताब्यात घेण्यात आले. शुक्रवारी त्यांच्यावर हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला असल्याचे सरकारी अभियोक्ता कार्यालयाने सांगितले.
याशिवाय गुरुवारी देशभरात घरांची झडती घेण्यात आली. त्यावेळी ताब्यात घेतलेल्या चारजणांची सुटका करण्यात आली, त्यापैकी तिघांची न्यायाधीशांनी चौकशी केल्यानंतर सुटका करण्यात आली. हे सातहीजण चेचनियाचे होते.
Suspects arrested as part of a large-scale anti-terrorist operation across Belgium linked to ISKP, one of the jihadist group’s most lethal branches #terrorism https://t.co/FCCaD15Cxm
— Phil Gurski (@borealissaves) July 26, 2024
प्रॉसिक्युटरने सांगितले की ब्रुसेल्स आणि अँटवर्प, लीज आणि गेन्टसह इतर शहरांमधून ताब्यात घेण्यात आलेले हे सातहीजण चेचनियाचे मूळ रहिवासी असून ते इसिस-खोरासनचे सदस्य असल्याचा संशय होता.
संशयितांनी हल्ला करण्यासाठी आधीच विशिष्ट लक्ष्याची निवड केल्याचे कोणतेही संकेत मिळाले नाहीत, असे सरकारी वकिलांनी सांगितले. याव्यतिरिक्त त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला.
पॅरिसमधील ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहोळ्याच्या फक्त काही तास आधी ही शोध मोहीम राबवण्यात आली कारण तपास अधिकाऱ्यांना कोणतीही जोखीम पत्करायची नव्हती, असे वृत्त बेल्जियन माध्यमांनी दिले होते. अभियोक्ता कार्यालयाने पॅरिसमधील ऑलिम्पिक स्पर्धा यांचे लक्ष्य होते का? या रॉयटर्सच्या प्रश्नाला उत्तर दिले नाही. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी संध्याकाळी पार पडणार होता.
तपासाचा एक भाग म्हणून फ्रान्समध्ये कोणतीही अटक किंवा कसल्याही प्रकारची शोधमोहीम घेण्यात आली नाही, असे फ्रेंच दहशतवादविरोधी अभियोजकाने रॉयटर्सला सांगितले. मात्र फ्रेंच सुरक्षा अधिकारी या मोहीमेत सामील झाले होते की नाही याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही.
2015मध्ये पॅरिसवर झालेल्या हल्ल्याचे नियोजन आणि समन्वय हल्लेखोरांनी शेजारील बेल्जियममधून केले होता. या हल्ल्यात 130 लोक ठार आणि 368 जण जखमी झाले होते. हल्लेखोरांपैकी अनेकजण बेल्जियमचे नागरिक किंवा रहिवासी होते.
2016 मध्ये ब्रुसेल्स विमानतळावर झालेल्या बॉम्बस्फोटात 34 लोक ठार आणि 340 जण जखमी झाले होते. या हल्ल्यांसाठी दोषी ठरलेल्यांमध्ये सलाह अब्देसलाम याचा समावेश होता. सलाह हा 2015च्या पॅरिस हल्ल्याच्या खटल्यात मुख्य संशयित होता.
रामानंद सेनगुप्ता
(रॉयटर्स)