गाझामधील अल जझीराचे पत्रकार अतिरेकी असल्याचा इस्रायलचा आरोप

0
अल जझीराचे पत्रकार
इस्रायल संरक्षण दलाचे बोधचिन्ह

गाझामधील अल जझीराच्या सहा पॅलेस्टिनी पत्रकारांची नावे घेत हे पत्रकारसुद्धा हमास किंवा इस्लामिक जिहाद दहशतवादी गटाचे सदस्य असल्याचे इस्रायली सैन्याने म्हटले आहे.

पत्रकारांना गप्प करण्याचा हा प्रयत्न आहे असे म्हणत कतार नेटवर्कने हा आरोप फेटाळला आहे.

नेटवर्कने एका निवेदनात म्हटले आहे की, “गाझामधील आपल्या पत्रकारांवरील इस्रायली आरोपांचा अल जझीरा निषेध करते आणि त्यांना लक्ष्य करणे (हे) अन्यायकारक  असल्याचा इशारा देते.”

इस्रायली सैन्याने काही कागदपत्रे प्रकाशित केली आहेत. ही आपल्याला गाझामध्ये सापडली होती, ज्याने हे सिद्ध झाले आहे की या लोकांचा या गटांशी लष्करी संबंध आहे, असे इस्रायली सैन्याने पुढे म्हटले आहे.

रॉयटर्सला या कागदपत्रांची सत्यता तत्काळ पडताळता आलेली नाही.

इस्रायली सैन्याने सांगितले की या कागदपत्रांमध्ये हमास आणि इस्लामिक जिहादच्या कर्मचाऱ्यांचे तपशील, पगार, दहशतवादी प्रशिक्षण अभ्यासक्रम, फोन डिरेक्टरी आणि त्यांना झालेल्या दुखापतीच्या अहवालांचा समावेश आहे.

ही कागदपत्रे कतारी अल जझीरा मीडिया नेटवर्कमध्ये हमास दहशतवादी असल्याचे पुरावा म्हणून काम करतात,” असे लष्कराने म्हटले आहे.

अल जझीराने यावर प्रतिक्रिया देताना संगितले की, “नेटवर्क या बनावट आरोपांकडे या प्रदेशातील उर्वरित काही पत्रकारांना गप्प करण्याचा उघड प्रयत्न म्हणून पाहते, ज्यामुळे जगभरातील नागरिकांसमोर युद्धाची कठोर वास्तविकता लपवण्याचा हेतू स्पष्ट होतो.”

द कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट्स मिडल ईस्ट प्रोग्रामने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की हे आरोप पॅलेस्टिनी पत्रकारांसाठी ”कोणताही पुरावा नसतानाही दहशतवादी’  असा शिक्का मारून  कलंकित करण्यासारखे आहेत.

इस्रायलने बऱ्याच काळापासून अल जझीरावर हमासचे मुखपत्र असल्याचा आरोप केला आहे. गेल्या वर्षभरात इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव अल जझीराचे कामकाज बंद करण्याचे आदेश दिले आहेत, त्याच्या कार्यालयांवर छापे टाकले आहेत आणि उपकरणे जप्त केली आहेत.

अल जझीराने म्हटले आहे की इस्रायलने त्यांच्याविरुद्ध केलेली कारवाई गुन्हेगारी प्रवृत्तीची, क्रूर आणि बेजबाबदारपणाची होती. आताचे ताजे आरोप त्यांच्याबद्दलच्या शत्रुत्वाच्या व्यापक पद्धतीचा भाग आहे.

नेटवर्कचे म्हणणे आहे की त्याचा दहशतवादी गटांशी कोणताही संबंध नाही. इस्रायली सैन्याने गाझा युद्धात समीर अबू दक्का आणि हमजा अल-दहदूह यांच्यासह त्यांच्या अनेक पत्रकारांची जाणूनबुजून हत्या केल्याचा आरोप केला आहे.

इस्रायलच्या म्हणण्याप्रमाणे ते पत्रकारांना लक्ष्य करत नाही.

1996मध्ये कतारमध्ये अल जझीराची स्थापना झाली आणि  आपल्या जागतिक प्रोफाइलला बळकटी देण्याचा एक मार्ग म्हणून नेटवर्ककडे पाहिले.

इजिप्त आणि अमेरिकेसह इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धबंदी व्हावी यासाठीच्या वाटाघाटींंमध्ये कतारने मध्यस्थाची भूमिका निभवली आहे. अर्थात या वाटाघाटी कित्येक
महिन्यांपासून ठप्प आहेत.

तृप्ती नाथ
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleदहशतवादी हल्ल्यांच्या इशाऱ्यामुळे श्रीलंका हाय अलर्टवर
Next articleChinese Vessel Driven Away Twice For Disrupting Energy Survey By Indonesians In SCS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here