इस्रायलने दोन दशकांत प्रथमच, वेस्ट बँकमध्ये पाठवले रणगाडे

0
इस्रायलने
रॉयटर्स फोटो: 23 फेब्रुवारी 2025, इस्रायल-व्याप्त वेस्ट बँकमधील जेनिन येथे, लष्करी ऑपरेशनदरम्यान एक इस्रायली रणगडा.

रविवारी, इस्रायलने 20 वर्षांहून अधिक काळ व्यापलेल्या ‘वेस्ट बँक’ प्रदेशात प्रथमच रणगाडे पाठवले. कारण त्यांनी आपल्या लष्कराला या भागातील निर्वासित शिबिरांमध्ये पॅलेस्टिनी अतिरेकी गटांशी लढण्याकरता “दीर्घकालीन वास्तव्य” ची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत.

इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, यांनी पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका थांबवण्याचे आदेश दिल्यानंतर, गाझामधील नाजूक युद्धविरामाने नवीन अडथळे निर्माण झाल्यामुळे हे पाऊल टाकण्यात आल्याचे समजते. गाझामधील इस्रायली ओलीसांची सार्वजनिकरित्या अदला-बदली केल्याचा बदला म्हणून, युद्धबंदी अंतर्गत त्यांची सुटका करण्यात आली आहे.

वेस्ट बँकमध्ये गेल्या महिन्यात, दहा हजार पॅलेस्टिनी कुटुंबांना त्यांच्या घरातून हाकलले गेले, कारण मागील एका महिन्यात जेनिन आणि तुलकर्म सारख्या फ्लॅशपॉईंट शहरातील, गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या शरणार्थी शिबिरांमध्ये, सैन्याने हमास आणि इस्लामिक जिहादासह ​​इराणी-समर्थित गटांवर कारवाई केल्या.

इस्रायलच्या स्थापनेदरम्यान 1948 च्या युद्धात पळून गेलेले किंवा हाकलवून लावलेले पॅलेस्टिनींचे वंशज या छावण्यामंध्ये काही दशकांपासून वास्तव्यास आहेत.

संरक्षण मंत्री इस्रायल कॅट्झ यांनी सांगितले की, सुमारे 40,000 पॅलेस्टिनींना या शिबिरांमधून हलविण्यात आले होते.

दरम्यान, पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष- महमूद अब्बास यांचे प्रवक्ते नबिल अबू रुदेनेह, यांनी उत्तर वेस्ट बँकमध्ये रणगाडे तैनात करण्याच्या निर्णयाचा निषेध केला.

“ही एक धोकादायक इस्रायली चाल आहे ज्यामुळे स्थिरता किंवा शांतता प्रस्थापित होणार नाही,” असे ते म्हणाले.

जेनिन, तुलकरम आणि नूर शम्स, निर्वासित शिबिरांमध्ये ऑपरेशन सुरू ठेवत असताना आणि दक्षिणेकडील नाब्लस, कबातिया आणि देर कद्दीसमध्ये त्यांचा विस्तार करत असताना, त्यांनी २६ अतिरेक्यांना अटक केली आणि तीन बंदुका व काही अतिरिक्त शस्त्रे जप्त केली.

सैन्याने रस्ते खोदणे आणि वीज व पाणी पुरवठा विस्कळीत करणे यासह, घरे आणि महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा उद्ध्वस्त केल्या आहेत. रविवारी, इस्रायली रणगाडे इस्रायलमधून जेनिनच्या दिशेने वेस्ट बँकमध्ये जाताना दिसले.

7 ऑक्टोबर 2023 रोजी, दक्षिण इस्रायलमधील समुदायांवर हल्ला झाल्याच्या पार्श्वभूमीवर, गाझा किल्ल्यात एक वर्षाहून अधिक काळ इस्रायली सैन्याशी लढा देणाऱ्या हमासने म्हटले आहे की, ‘अशाप्रकारे रणगाडे पाठवल्याने कॅम्पमधील अतिरेकी लढवय्यांकडून इस्रायली सैन्याला भेडसावणारे धोके उघड झाले आहेत.’

जेनिनमध्ये रणगाड्यांचा प्रवेश

गाझामधील लढाई सध्या 42-दिवसीय युद्धविरामादरम्यान थांबली असून, दक्षिण लिबाननमध्ये इराणी पाठिंब्याने चालणाऱ्या हिजबुल्लाह चळवळीविरुद्धचे संबंधित युद्ध देखील थांबले आहे, त्यामुळे आता इस्रायलचे लक्ष अधिकाधिक वेस्ट बँक प्रदेशाकडे वळले आहे.

वेस्ट बँकमधील इस्रायली लष्कराच्या सशस्त्र टँक्सच्या वापरामुळे, इस्रायल किती तीव्रतेने दहशतवादी गटांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे, हे स्पष्ट होते. हे गट इराणकडून दीर्घ काळापासून शस्त्रास्त्र आणि आर्थिक सहाय्य प्राप्त करत आहेत.

“दशकानंतर पहिल्यांदाच जुडिया आणि सामरियामध्ये आम्ही टँक पाठवले,” असे कॅट्झ यांनी रविवारी सांगितले, जेव्हा त्यांनी वेस्ट बँकसाठी इस्रायलमध्ये वापरण्यात येणाऱ्या बायबलिक नावांचा उल्लेख केला. “याचा एकच अर्थ आहे, की आम्ही शक्य तितक्या सर्व बाजूंनी दहशतवादाशी लढत आहोत,” असेही ते म्हणाले.

वेस्ट बँक प्रदेशात, गाझा युद्धाच्या सुरुवातीपासून इस्रायली लष्कराने शंभर एक पॅलेस्टिनी सैनिक आणि नागरिकांना ठार केले आहे, तर पॅलेस्टिनियन हल्ल्यांमुळे अनेक इस्रायलींचाही  मृत्यू झाला आहे. परंतु, हिंसा दुसऱ्या इन्फिताडा उठावादरम्यान दिसलेल्या पातळीपर्यंत पोहोचली नाही, जेव्हा पॅलेस्टियन प्राधिकरणाच्या सैन्याने इस्रायली लष्करीविरुद्ध लढाई केली होती.

इस्रायलने 1967 च्या मध्यपूर्व युद्धात, वेस्ट बँक प्रदेश काबीज केला होता, जो पॅलेस्टिनींच्या दृष्टीने भविष्यातील पॅलेस्टिनियन राज्याचे मुख्य ठिकाण होता. परंतु इस्रायली कट्टरपंथीयांकडून त्याच्या विलीनीकरणासाठी अधिकाधिक खुलेपणाने आवाहन केले जात आहे.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प, ज्यांनी गाझामधून पॅलेस्टिनियन लोकांना हटवून यूएस विकास प्रकल्पासाठी जागा तयार करण्याचे आवाहन केले होके, त्यांनी अजून पूर्ण विलीनीकरणाला समर्थन देण्याबाबत काहीही ठोस सांगितलेले नाही.

तरीही, गाझामधील त्यांच्या आवाहनाने पॅलेस्टिनी लोकांमध्ये दुसऱ्या ‘नकबा’ किंवा तत्सम आपत्तीची भीती जागृत केली आहे, हे नाव 1948 च्या युद्धात त्यांच्या बऱ्याच जमिनी गमावल्याबद्दल देण्यात आले आहे.

इस्रायलने याआधीच शरणार्थी छावण्यांचे नुकसान करण्यासाठी पावले उचलली आहेत, ज्यामध्ये मुख्य UN एजन्सी असलेल्या पॅलेस्टिनियन शरणार्थींसाठी UNRWA ला पूर्व जेरुसलेममध्ये त्यांचे मुख्यालय बंद करण्यास भाग पाडले आहे. रविवारी कॅट्झ यांनी सांगितले की, ज्या एजन्सीवर इस्रायलने अतिरेकी गटांना पाठिंबा देण्याचा आरोप केला आहे, तसेच त्यांना शिबिरांमधील क्रियाकलाप थांबवण्यास सांगण्यात आले आहे.

दरम्यान एजन्सीकडून याविषयी तातडीने कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही, ज्यांनी इस्रायली आरोपांचा विरोध केला आहे.

टीम भारतशक्ती
रॉयटर्सच्या इनपुट्ससह


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here