गाझा सिटी हल्ले इस्रायलने लांबणीवर टाकले, युद्धबंदीच्या आशा वाढल्या

0
गाझा सिटीमध्ये इस्रायलच्या नियोजित हल्ल्याला अजूनही काही आठवडे लागू शकतात, त्यामुळे संभाव्य युद्धबंदीसाठी आशा करायला हरकत नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर दुसरीकडे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी संकेत दिले आहेत की हल्ले “बऱ्यापैकी लवकर” सुरू होतील आणि हमासचा पराभव करूनच युद्ध संपेल.

गुरुवारी या योजनेला मंजुरी देण्यासाठी सुरक्षा मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित असलेल्या दोन अधिकाऱ्यांनी सांगितले की प्रभावित भागातून नागरिकांचे स्थलांतर ऑक्टोबरच्या सुरुवातीपर्यंत पूर्ण होऊ शकते, ज्यामुळे कराराला मंजुरी मिळण्यास वेळ मिळेल.

हल्ल्याच्या या योजनेमुळे उद्ध्वस्त झालेल्या एन्क्लेव्हला होणाऱ्या नुकसानाबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त करण्यात आली, जिथे उपासमारीचे संकट आणखी गडद झाले आहे. रविवारी, नेतन्याहू यांनी परदेशी पत्रकारांना ब्लूप्रिंट स्पष्ट करण्यासाठी बोलावले, ज्यामध्ये त्यांनी मानवीय मदत कशाप्रकारे दिली गेली याचे वर्णन केले आहे.

नेतन्याहू म्हणाले की गाझा सिटीवर सैन्याने हल्ला करण्यापूर्वी  प्रथम नागरिकांना युद्धक्षेत्रातून बाहेर पडण्याची इस्रायल परवानगी  देईल, ज्याचे वर्णन त्यांनी हमासच्या शेवटच्या दोन उर्वरित गडांपैकी एक म्हणून केले आहे आणि त्यांचा पराभव झाला की मगच युद्धाचा अंत होईल.

परंतु इस्रायलचे अर्थमंत्री बेझालेल स्मोट्रिच, सुरक्षा मंत्रिमंडळाचे सदस्य आणि इतरांनी अधिक कठोर कारवाईची मागणी केली आहे, त्यांनी सांगितले की ही योजना हमासला पराभूत करण्याऐवजी वाटाघाटीच्या टेबलावर परत आणण्यासाठी तयार करण्यात आली होती आणि त्यांनी नेतान्याहू यांना ती रद्द करण्याचे आवाहन केले.

इस्रायल-हमास वाटाघाटी

गाझामध्ये अजूनही अर्ध्या ओलिसांची सुटका करण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावावर इस्रायल आणि हमास यांच्यातील अप्रत्यक्ष वाटाघाटी गेल्या महिन्यात विरोधातच संपल्या, दोन्ही बाजूंकडून अजूनही अटींच्या बाबतीत तफावत आहे.

इस्रायलने गाझा सिटीवरील नवीन आक्रमण योजना प्रसारित करण्याचा निर्णय कदाचित पक्का नसावा, परंतु त्यामुळे हमासला वाटाघाटीच्या टेबलावर परत आणण्याच्या दृष्टीने त्याची मदत झाल्याचे मानले जाते. एका अरब राजदूताच्या मते, इजिप्त आणि कतार या मध्यस्थांनी वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सोडलेले नाही.

संपूर्ण गाझा ताब्यात घेण्याबाबत नेतन्याहू यांचे गांभीर्य पाहिल्यानंतर हमासकडून युद्धबंदीसाठी रचनात्मक चर्चा करण्याची नवीन तयारी असल्याचे राजदूतांनी सांगितले.

हमासचे वरिष्ठ अधिकारी बसेम नैम म्हणाले की, गटाने मध्यस्थांना सांगितले आहे की त्यांना अजूनही युद्धबंदी करारात रस आहे.

नेतन्याहू यांनी अखेरच्या कराराची निवड करण्याची शक्यता नाकारलेली नाही. पंतप्रधानांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की जर संबंधित प्रस्ताव आला तर तो इस्रायलच्या सुरक्षा मंत्रिमंडळासमोर आणला जाईल.

रविवारी जेव्हा त्यांना विचारण्यात आले की ते युद्धबंदीचा विचार करता नवीन आक्रमण थांबवतील का, तेव्हा नेतन्याहू यांनी जाहीरपणे कठोर भूमिका घेतली.

“आम्ही हमासला पराभूत करण्याच्या उद्देशाने सर्व 20 (जिवंत बंधकांना) सोडण्याचे लक्ष्य ठेवत आहोत. आम्ही आंशिक कराराबद्दल बोलत होतो, आम्ही आंशिक करारासाठी गेलो होतो पण आम्हाला भरकटवले गेले,” ते म्हणाले “आम्ही हमासचा नाश करणार आहोत, आम्ही थांबत नाही, आम्ही पुढे जाणार आहोत,” असेही ते पुढे म्हणाले.

‘मृत्यूचा सापळा’

इस्रायली सैन्याला नवीन हल्ल्याच्या योजना जलदगतीने अमलात आणण्याचे निर्देश दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.

“मला शक्य तितक्या लवकर युद्ध संपवायचे आहे आणि म्हणूनच मी IDF ला (इस्रायल संरक्षण दल)  गाझा शहराचा ताबा घेण्यासाठीचे वेळापत्रक आणखी कमी करण्याचे निर्देश दिले आहेत,” असे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, ही वेळ “बऱ्यापैकी लवकर” येईल.

परंतु गुरुवारी सुरक्षा मंत्रिमंडळात मांडण्यात आलेल्या योजना पूर्णत्वास येण्यास सुमारे पाच महिने लागू शकतात, असे बैठकीत उपस्थित असलेल्या दोन अधिकाऱ्यांनी सांगितले.

गाझा शहर हा शेवटचा बालेकिल्ला आहे ज्याच्या पतनामुळे हमासचा पराभव जलद होईल या नेतन्याहू यांच्या वक्तव्याला एका वर्षापूर्वी दक्षिण गाझामध्ये आणखी एका हल्ल्यापूर्वीच्या विधानांचा संदर्भ होता.

एप्रिल 2024 मध्ये, अयशस्वी झालेल्या युद्धबंदी वाटाघाटींच्या मागील फेरीदरम्यान, नेतन्याहू यांनी रफाहमध्ये दीर्घकाळ हल्ला सुरू ठेवण्याची प्रतिज्ञा केली होती ज्यामुळे हमासच्या विरुद्ध “पूर्ण विजय” मिळेल.

मे 2024 मध्ये इस्रायलने रफाहवर हल्ला केला, त्यावेळी लाखो पॅलेस्टिनी नागरिक त्या भागातून पळून गेले होते. या गटाचा नेता आणि 2023 मध्ये झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार याह्या सिनवार याला इस्रायली सैन्याने सुमारे पाच महिन्यांनंतर तिथेच ठार मारले.

आता हमासचे प्रमुख नेते मारले गेले असताना आणि उरलेले हमास हल्लेखोर गाझाच्या अवशेषांमध्ये लपलेले असतानाही, नेतन्याहू यांना नवीन योजनेबद्दल शंका आहे – त्यांच्या लष्करी प्रमुखांनीही ज्यांनी याला मृत्यूचा सापळा म्हटले होते – आणि ते लवकरच युद्ध संपवेल अशी आशा आहे.

“ही मोहीम  इस्रायल आणि त्याच्या सुरक्षेसाठी धोका आहे आणि ती निरर्थक आहे,” असे इस्रायलचे विरोधी पक्षनेते यायर लापिड म्हणाले. “ओलिस मरतील, सैनिक मरतील, अर्थव्यवस्था कोसळेल आणि इस्रायलची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा कोसळेल.”

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleभारतात टॅरिफ संघर्षामुळे, अमेरिकन उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन
Next articleभारत-अमेरिका व्यापार पेच सोडविण्यासाठी राजनैतिक हालचाली अत्यावश्यक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here