
गाझा आरोग्य अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, 20 मार्च 2025 रोजी, इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 70 पॅलेस्टिनी लोकांचा मृत्यू झाला आणि अनेकजण जखमी झाले. इस्रायलने गाझावर पुन्हा एकदा एअरस्ट्राईक्स करायला सुरुवात केली आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, इस्रायली हवाई हल्ल्यांनी गाझा पट्टीच्या उत्तर आणि दक्षिण भागातील अनेक घरे उद्ध्वस्त केली. दरम्यान, याबाबत इस्रायलकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही.
जमिनीवरील कारवाया पुन्हा सुरू
जानेवारीपासून सुरू असलेला युद्धबंदीचा करार मोडल्यानंतर, बुधवारी इस्रायली लष्कराने सांगितले की, त्यांच्या सैन्याने मध्य आणि दक्षिण गाझामध्ये जमिनीवरील कारवाई देखील पुन्हा सुरू केली आहे.
ऑक्टोबर 2023 मध्ये, संघर्ष सुरू झाल्यापासूनच्या सर्वात घातक घटनांपैकी एक असलेल्या हवाई हल्ल्यात, 400 हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले होते, मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी पुन्हा जमिनीवरील कारवाई करण्यात आली.
मंगळवारपासून सुरु झालेल्या, हवाई हल्ल्यांमध्ये 510 पॅलेस्टिनी ठार झाले आहेत, ज्यात निम्म्याहून अधिक महिला आणि मुले आहेत, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी रॉयटर्सला दिली.
‘केंद्रित’ चळवळ
इस्रायली लष्कराने म्हटले आहे की, त्यांच्या कारवायांमुळे गाझाला विभागणाऱ्या नेत्झरिम कॉरिडॉरवरील आपले नियंत्रण वाढले असून, ही एन्क्लेव्हच्या उत्तर आणि दक्षिणेमध्ये आंशिक बफर झोन तयार करण्याच्या उद्देशाने केलेली एक “केंद्रित चळवळ” युक्ती आहे.
तर पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासने म्हटले आहे की, जमिनीवरील कारवाई आणि नेत्झरिम कॉरिडॉरमध्ये घुसखोरी ही दोन महिन्यांपूर्वीच्या युद्धविराम कराराचे “नवीन आणि धोकादायक उल्लंघन” आहे.
एका निवेदनात, गटाने कराराच्या प्रतिबद्धतेची पुष्टी केली असून, मध्यस्थांना “त्यांच्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याचे” आवाहन केले आहे.
गुरुवारी रॉयटर्सशी बोलताना, हमासच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “मध्यस्थांनी दोन्ही युद्ध करणाऱ्या बाजूंसोबत त्यांचे प्रयत्न वाढवले आहेत परंतु अद्याप कोणताही यश मिळालेले नाही,”
गटाने प्रत्युत्तर देण्याच्या कोणत्याही स्पष्ट धमक्या दिलेल्या नाहीत.
इस्रायल-हमास संघर्ष
हमासच्या अतिरेक्यांनी 7 ऑक्टोबर 2013 रोजी, इस्रायली समुदायांवर हल्ला केल्यानंतर हा संघर्ष सुरु झाला, ज्यामध्ये 1,200 लोक मारले गेले आणि 250 हून अधिक लोकांना ओलीस ठेवले गेले, असे इस्रायली आकडेवारीवरून दिसून येते.
गाझाच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर झालेल्या संघर्षात 49,000 हून अधिक पॅलेस्टिनी लोक मारले गेले असून, संपूर्ण गाझा परिसर मोडकळीस आला आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)