भारत, चीन आणि युक्रेन संबंधांबाबत जयशंकर यांची टिप्पणी

0
भारत
परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांचे मंगळवारी बर्लिनमध्ये जर्मनीच्या परराष्ट्रमंत्री एनालेना बेरबॉक यांनी स्वागत केले

भारत “चीनसोबतचा व्यापार बंद करणार नाही,” असे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी बर्लिनमध्ये जर्मन मुत्सद्दी आणि व्यावसायिक नेत्यांच्या परिषदेला संबोधित करताना सांगितले,
“आम्ही चीनसोबत होणाऱ्या व्यापारावर बंदी घातलेली नाही. ही जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि आघाडीचा उत्पादक देश आहे. प्रश्न हा आहे की आपण त्याच्याशी कोणत्या क्षेत्राशी संलग्न व्यापार करणार आहोत आणि कोणत्या अटींवर करणार आहोत. एका साध्या काळ्या-पांढऱ्या रंगातल्या उत्तरापेक्षा हे अधिक गुंतागुंतीचे आहे,” असे ते म्हणाले.
धोरणात्मक संवादासाठी भारत-आखाती सहकार्य परिषदेच्या पहिल्या मंत्रीस्तरीय बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर सौदी अरेबियातील रियाध येथून बर्लिन येथे आलेले डॉ. जयशंकर जर्मन परराष्ट्र कार्यालयाने आयोजित केलेल्या राजदूतांच्या वार्षिक परिषदेच्या व्यापार दिनाला संबोधित करत होते.


युक्रेनच्या संघर्षाबद्दल बोलताना, डॉ. जयशंकर यांनी  वाटाघाटी आणि संवादाद्वारेच कायमस्वरूपी तोडगा निघू शकतो या भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. हा संघर्ष युद्धभूमीवर सोडवला जाईल असे आम्हाला वाटत नाही. काही ठिकाणी वाटाघाटीची गरज भासेल. जेव्हा असे घडते, तेव्हा रशिया आणि युक्रेन या मुख्य पक्षांना त्यात सहभागी करून घेणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.

युद्धभूमीतच तोडगा निघेल असे आम्हाला वाटत नाही. वाटाघाटी आवश्यक आहेत. जर सल्ल्याची गरज असेल तर आम्ही तो देण्यास नेहमीच तयार आहोत,” असे ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांच्या दौऱ्यांकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

पायाभूत सुविधा, डिजिटलायझेशन, तंत्रज्ञान आणि ऊर्जा यासारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये भारताच्या वेगवान प्रगतीमुळे जर्मन गुंतवणूकदारांना मिळालेल्या संधीही त्यांनी अधोरेखित केल्या. झपाट्याने बदलत्या जागतिक परिस्थितीचा संदर्भ देत, त्यांचा सामना करण्यासाठी भारत-जर्मनी यांच्यातील मजबूत भागीदारीच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला.

“जागतिकीकरणाच्या काळात स्वतःच्या अस्तित्वाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत, सर्वत्र अस्थिरतेचे परिणाम जाणवत आहेत. त्यामुळे प्रमुख राष्ट्रांनी त्यांची क्षितिजे मर्यादित करणे असमर्थनीय आहे. म्हणूनच त्यावर कृती करण्यासाठी भागीदारी आणि समजूतदारपणा निर्माण करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन जयशंकर यांनी केले.
त्यानंतर जर्मनीच्या परराष्ट्रमंत्री एनालेना बेरबॉक यांच्याशी झालेल्या औपचारिक चर्चेदरम्यान, दोन्ही मंत्र्यांनी जगाच्या स्थितीवर-विशेषतः युक्रेन, गाझा आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशावर-तसेच द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारी वाढवण्याच्या दिशेने प्रयत्न करण्यासाठी आवश्यक विचारांची देवाणघेवाण केली.

या भेटीनंतर जर्मनीच्या परराष्ट्रमंत्री बेरबॉक यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना जयशंकर म्हणाले,“सेमीकंडक्टर्स, इलेक्ट्रिक मोबिलिटी, रिन्यूएबल इत्यादींसह नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानावर जोरदार लक्ष केंद्रित केले जात आहे. आम्हाला विश्वास आहे की यामुळे भारत-जर्मनी सहकार्यासाठी नवीन संधी निर्माण होऊ शकतात.”

“संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातही आमचे परस्परसंवाद वाढले आहेत. आम्ही यावर्षी पहिल्यांदाच हवाई सराव आयोजित केला. आणि पुढील महिन्यात गोव्यात तुमच्या नौदलाच्या जहाजांचे स्वागत करायला आम्ही उत्सुक आहोत. आमचे धोरण आणि इतर देवाणघेवाण परस्परांच्या दृष्टीने फायदेशीर आहे. आणि आपले संरक्षण उद्योग अधिक जवळून कसे सहकार्य करू शकतात हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे,” असे ते म्हणाले.

“परराष्ट्रमंत्री बेअरबॉक यांनी याआधी नमूद केलेल्या आमच्यातील सल्लामसलती या वर्षअखेरीस भारतात होणाऱ्या आंतर-सरकारी सल्लामसलतींच्या बैठकीपूर्वी होत आहेत. त्यादृष्टीने तयारी करण्यासाठी आजचे अधिवेशन खूप उपयुक्त ठरले आहे, असे मला वाटते,” असे ते म्हणाले.

डॉ. जयशंकर यांनी भेट घेतलेल्या इतर नेत्यांमध्ये खासदार आणि बुंडेस्टॅग परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्ष मायकेल रॉथ यांचा समावेश होता.

रामानंद सेनगुप्ता
(एजन्सीच्या इनपुट्ससह)


Spread the love
Previous articleरशियाचा कल विध्वंसक कारवायांकडे अधिक :  नॉर्वेचे गुप्तहेर प्रमुख
Next articleRussia Claims Striking Ammunition Depots, Ukraine Says Repelled Russian Offensives

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here