रशियाचा कल तेल आणि वायूसारख्या त्याच्या पायाभूत सुविधांची तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्याकडे अधिक असण्याची शक्यता असल्याचा दावा नॉर्वेच्या गुप्तहेर प्रमुखांनी केला आहे.
नॉर्वेच्या परदेशी गुप्तचर सेवेच्या प्रमुखांनी सांगितले की युक्रेनला पाश्चिमात्य देशांकडून मिळणारा पाठिंबा मोडून काढण्यासाठी रशिया अधिक धाडसी प्रयत्न करत आहे.
नॉर्वेजियन गुप्तचर सेवेचे (एनआयएस) प्रमुख व्हाईस ॲडमिरल निल्स अँड्रियास स्टेनसोनेस यांनी रॉयटर्सला सांगितले की, आव्हानांची पातळी बदलली आहे.
“आम्हाला विश्वास आहे की घातपाती कारवाया होण्याची शक्यता जास्त आहे,सध्या युरोपमध्ये अशा घातपाती कारवाया घडताना दिसत आहे.”
नॉर्वेच्या गुप्तहेर प्रमुखांनी पुढे सांगितले की घातपात घडवून आणण्याच्या कृतीतून असे सूचित होते की ते (रशियन) याबाबत कोणताही विधिनिषेध बाळगत नाहीत. “रशिया पाश्चिमात्य देशांकडून केले जाणारे असे आरोप पूर्णपणे नाकारतो.
ओस्लो येथील त्याच्या दूतावासातील वरिष्ठ यावर प्रतिक्रिया द्यायला त्वरित उपलब्ध झाले नाहीत. यावर्षाच्या सुरुवातीला, नॉर्वेच्या गुप्तचर संस्थांनी असे मत मांडले होते की रशियाला अशी विध्वंसक कृत्ये घडवून आणणे “विवेकपूर्ण वाटू शकते.”
ते गेल्या वर्षीच्या परिस्थितीपेक्षा यंदाची परिस्थिती पूर्णपणे बदललेली असल्याचे सांगतात आणि म्हणतात की पेट्रोलियम हे आता मुख्य लक्ष्य आहे. नॉर्वे हा युरोपचा सर्वात मोठा वायू पुरवठादार आणि प्रमुख कच्च्या तेलाचा निर्यातदार आहे. परदेशात गुप्त माहिती गोळा करण्यासाठी आणि नॉर्वेच्या सैन्याला पाठिंबा देण्यासाठी स्टेनसोन्सची एजन्सी जबाबदार आहे. पण ते म्हणाले की राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा रशिया पाश्चिमात्य देशांसाठी “कमी-अधिक प्रमाणात एक वाळीत टाकण्यात आलेले राष्ट्र” बनले आहे.
सप्टेंबर 2022 मध्ये नोर्ड स्ट्रीम पाईपलाईन्सच्या विध्वंसानंतर, नॉर्वेने नाटो मित्रराष्ट्रांच्या पाठिंब्याने उत्तर समुद्रातील तेल आणि वायू प्लॅटफॉर्मच्या संरक्षणासाठी आपले नौदल तैनात केले. तरीही, सुमारे 9 हजार किमी (5 हजार 590 मैल) पसरलेल्या गॅस पाईपलाईन्सचा समावेश असलेल्या नॉर्वेच्या समुद्राखालील पायाभूत सुविधा इतक्या प्रचंड आहेत की त्यांचे संरक्षण करणे कठीण बनले आहे.
नॉर्वेमध्ये 90हून अधिक ऑफशोअर तेल आणि वायू क्षेत्र देखील आहे.
दुसरीकडे रशिया वारंवार तक्रार करत आहे की, नॉर्डिक प्रवाहाच्या तपासाची जबाबदारी असलेला जर्मनी या स्फोटांच्या तपासासाठी फारसे प्रयत्न करताना दिसत नाही.
या स्फोटांमुळे बाल्टिक समुद्राच्या खाली युरोपमध्ये रशियन वायू वाहून नेण्यासाठी बांधण्यात आलेल्या दोन पाईपलाईन्स फुटल्या. रशियाने युक्रेनमध्ये हजारो सैन्य पाठवल्याच्या सात महिन्यांनी झालेल्या या स्फोटांची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही.
तर दुसरीकडे या स्फोटांसाठी आपण जबाबदार नसल्याचे मॉस्कोचे म्हणणे आहे. जर्मन सरकारी वकिलांनी गेल्या महिन्यात सांगितले की त्यांनी हल्ल्यांच्या संदर्भात पोलंडमधील युक्रेनियन डायव्हिंग प्रशिक्षकाच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.
युक्रेनने मात्र या स्फोटांमध्ये आपला सहभाग असल्याचे नाकारले आहे.
तृप्ती नाथ
(रॉयटर्स)