Sunday, March 1, 2026
Solar
MQ-9B
Home Bharat Shakti Marathi द्विपक्षीय व्यापार करारातील प्रगतीचे, JD Vance व पंतप्रधान मोदींकडून कौतुक

द्विपक्षीय व्यापार करारातील प्रगतीचे, JD Vance व पंतप्रधान मोदींकडून कौतुक

0

अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD Vance आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांनी सोमवारी झालेल्या भेटीदरम्यान व्यापार कराराच्या दिशेने होत असलेल्या चर्चांमधील लक्षणीय प्रगतीचे कौतुक केले. भारताने अमेरिकेचे शुल्क टाळण्याच्या आणि ट्रम्प प्रशासनासोबत संबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने, भारताने एक नवे पाऊल उचलले आहे.

जेडी व्हान्स, हे सोमवारी आपल्या कुटुंबासह चार दिवसांच्या वैयक्तिक दौऱ्यासाठी भारतात दाखल झाले. या दौऱ्यात त्यांनी ताजमहालला भेट दिली आणि जयपूरमध्ये एका कार्यक्रमात भाषण केले, अशी माहिती अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिली.

ऊर्जा, संरक्षण व तंत्रज्ञानातील सहकार्यावर भर

चर्चेदरम्यान, दोन्ही नेत्यांनी ऊर्जा, संरक्षण आणि धोरणात्मक तंत्रज्ञान क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्याच्या प्रयत्नांचा आढावा घेतला, असे पंतप्रधान मोदींच्या कार्यालयीन निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दोन्ही नेत्यांनी यावेळी विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली आणि संवाद व मुत्सद्देगिरीचा मार्ग स्विकारण्याचे आवाहन केले. हे विधान भारताच्या पारंपरिक भूमिकेला अनुसरून आहे, विशेषतः युक्रेन युद्धासंदर्भातील भूमिकेला.

“मोदींनी यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना आपल्या शुभेच्छा दिल्या व त्यांच्या भारत दौर्‍याची उत्सुकतेने वाट पाहत असल्याचे सांगितले,” असेही निवेदनात नमूद केले आहे.

व्हान्स यांच्या कार्यालयीन निवेदनाl नमूद केल्याप्रमाणे, ‘दोन्ही नेत्यांनी व्यापार विषयक चर्चांसाठी पुढील मार्गनकाशावर सहमती दर्शवली. एक द्विपक्षीय व्यापार करार हा दोन्ही देशांतील रोजगारनिर्मिती व जनकल्याणासाठी आधुनिक व्यापार धोरण उभारण्याची संधी आहे.’

व्हान्स यांच्या पत्नी उषा या भारतीय स्थलांतरितांच्या कन्या आहेत.

व्हान्स यांनी ईस्टर संडेला, रोम येथे पोप फ्रान्सिस यांच्याशी खासगी भेट घेतली आणि त्यानंतर सोमवारी ते नवी दिल्लीमध्ये दाखल झाले.

मोदी आणि व्हान्स यांनी, फेब्रुवारीमध्ये ट्रम्प यांच्या भेटीनंतर ठरवलेल्या विविध सहकार्य क्षेत्रांचा आढावा घेतला आणि सकारात्मक प्रगतीचे कौतुक केले. यात द्विपक्षीय व्यापारातील “न्याय” आणि संरक्षण भागीदारीचा समावेश आहे.

सर्वात मोठ्या व्यापार भागीदाराशी करार आवश्यक

रॉयटर्सच्या माहितीनुसार, भारत सरकार अमेरिकेहून होणाऱ्या आयातींपैकी निम्म्याहून अधिक आयातींवरील कर (Tariff) कमी करण्यास तयार आहे. 2024 मध्ये या आयातींची एकूण किंमत 41.8 अब्ज डॉलर्स इतकी होती.

तथापि, अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी भारताला “टॅरिफ गैरवापरकर्ता” आणि “टॅरिफ राजा” अशा दोन्ही उपाधींनी संबोधले आहे.

“व्हान्स यांच्या या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका संबंधांना अधिक चालना मिळेल,” असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी गुरुवारी सांगितले.

अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे. 2024 मध्ये, दोन्ही देशांमधील व्यापार $129 अब्ज डॉलरवर पोहोचला होता, ज्यामध्ये भारताच्या बाजूने $45.7 अब्ज डॉलरचा अधिशेष होता.

व्यापार करार लवकरच

ट्रम्प यांनी 9 एप्रिल रोजी, भारतासह अन्य मोठ्या व्यापार भागीदारांसाठी, शुल्कवाढीवर 90 दिवसांची मुदतवाढ जाहीर केली, त्यामुळे भारताला लवकरच व्यापार करार निश्चित होण्याची अपेक्षा आहे.

भारतीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, यांनी सोमवारी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये सांगितले की, “भारत यंदाच्या शरद ऋतूमध्ये व्यापार कराराचा पहिला टप्पा सकारात्मकपणे पूर्ण करेल अशी अपेक्षा आहे.”

व्हान्स यांचा भारत दौरा, ट्रम्प यांच्या आगामी भारत दौर्‍यासाठी पार्श्वभूमी तयार करत असल्याचे मानले जात आहे. ट्रम्प यांचा दौरा Quad गटाच्या शिखर परिषदेच्या निमित्ताने अपेक्षित असून, या गटात भारत. ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका या देशांचा समावेश आहे.

व्हान्स यांचा निर्णायक दौरा

दिल्लीमधील, ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन या थिंक टँकचे परराष्ट्र धोरण प्रमुख हर्ष पंत म्हणाले की, “व्हान्स यांचा भारत दौरा, सध्याच्या व्यापार चर्चांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा आहे.”

“अमेरिका-चीन तणाव वाढत असल्यामुळे आणि व्हान्स हे अमेरिकन राजनैतिक धोरणात प्रमुख भूमिका बजावत असल्यामुळे, त्यांच्या या भेटीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे,” असेही ते म्हणाले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleयेमेनच्या सना येथे अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात किमान 12 ठार, 30 जखमी
Next articleपुतिन यांच्या शांतता प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर, रशियाचा Odesa वर ड्रोन हल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here