कल्याणी सिस्टिम्सने हॉवित्झर पार्ट्ससाठीचा पहिला UAE–India करार केला

0

एका अत्यंत महत्त्वाच्या संरक्षण उद्योगातील सहयोअंतर्गत पहिल्यांदाच, UAE च्या ग्रेडवन कंपनीची उपकंपनी- MP3 इंटरनॅशनल आणि भारतातील कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेड (KSSL) यांच्यात ‘यूएईच्या सशस्त्र दलांना तोफखाना (आर्टिलरी) उपकरणे’ पुरवण्याबाबत करार झाला आहे.

अबू धाबी येथे या कराराची अधिकृत घोषणा करण्यात आली. ज्यामध्ये, हेवी तोफखाना प्लॅटफॉर्मची अचूकता आणि कार्यक्षमता वाढवणाऱ्या, 155 मिमी हॉवित्झर (Howitzer) बंदुकांची बॅरल्स आणि अन्य महत्त्वाचे सुटे भाग यांच्या पुरवठा समाविष्ट आहे. या महत्वपूर्ण UAE–India करारावर, MP3 इंटरनॅशनलचे सीईओ खलीफा अल अली आणि KSSL चे सीईओ निलेश तुंगर यांनी स्वाक्षरी केली.

‘या कराराचे महत्त्व पुरवठ्यापलीकडेही कित्येक पटीने अधिक आहे,’ असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. “हा करार म्हणजे केवळ खरेदीचा व्यवहार नसून, स्वयंपूर्णता आणि प्रगत उत्पादनाच्या सामायिक उद्दिष्टांवर आधारित एक धोरणात्मक भागीदारी आहे,” असे अल अली यांनी सांगितले. तुंगर यांनी, खाडी क्षेत्रामधील भारताच्या संरक्षण उद्योगासाठी याचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, “यूएईला जागतिक दर्जाची क्षमता पुरवताना आम्हाला अभिमान वाटतो, आणि या भागातील संरक्षण पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी आम्ही एकत्र काम करणार आहोत.”

UAE साठी हा करार त्याच्या दीर्घकालीन स्वदेशी क्षमतेच्या विकास धोरणाला पाठबळ देतो आणि त्याच्या संरक्षण सज्जतेमध्ये वाढ करतो. तर, भारतासाठी हा करार प्रगत संरक्षण उत्पादन क्षेत्रातील जागतिक पुरवठादार म्हणून भारताची भूमिका अधिक बळकट करतो आणि खाडी देशांसोबत नवी दिल्लीत वाढत असलेले सुरक्षाविषयक संबंध दृढ करतो.

ग्रेडवन ही लष्करी उपकरणे, दारुगोळा आणि मिशन-क्लिटिकल सिस्टिम्स पुरवणारी महत्त्वाची कंपनी आहे. ती EDGE समूहाच्या आंतरराष्ट्रीय पोहोचीद्वारे जागतिक स्तरावर भागीदारी विस्तारत आहे. यूएई आणि भारतामध्ये तंत्रज्ञान हस्तांतरण, संयुक्त विकास आणि प्रणाली एकत्रीकरण यासारख्या सहकार्याचे आधीपासूनच संबंध आहेत, जे दोन्ही देशांच्या स्पर्धात्मकता आणि स्वयंपूर्णतेत वाढ करत आहेत.

तोफखान्याच्या सुट्या भागांसाठी झालेली ही पहिलीच थेट भागीदारी असून, दोन्ही देशांमधील संरक्षण उद्योगातील संबंध अधिक दृढ करण्यास मदत करणार आहे.

हा नवीन करार, यूएई आणि भारत यांच्यातील संरक्षण सहकार्यामधले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, जो दोन्ही देशांच्या सामायिक सुरक्षा आणि धोरणात्मक हितसंबंधांवर आधारित औद्योगिक सहकार्याला चालना देतो.

– टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleमॉरिशस आणि IOR ला बळकटी देण्यासाठी भारताची आर्थिक पॅकेजची घोषणा
Next articleयुएस टॅरिफ्सदरम्यान, India-EU व्यापार वाटाघाटी निर्णायक टप्प्यात दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here