अमेरिका-युक्रेन शांतता आराखड्याच्या अधिकृत आदेशाची क्रेमलिन वाट पाहणार

0

अमेरिका-युक्रेन शांतता चर्चेच्या सुरू असलेल्या वृत्तांवर भाष्य करण्यापूर्वी आपण अधिकृत माहितीची वाट पाहू असे क्रेमलिनने सोमवारी जाहीर केले. या  मुद्द्यासाठी केवळ मीडिया कव्हरेजवर अवलंबून राहणे खूपच गंभीर आणि गुंतागुंतीचा प्रकार असल्याचेही रशियाने म्हटले आहे.

अमेरिका आणि युक्रेनच्या वाटाघाटीकर्त्यांमधील चर्चा रविवारी जिनिव्हा येथे संपली, दोन्ही बाजूंनी “उत्तम शांतता योजनेवर” सहमती दर्शविल्याची घोषणा केली. या योजनेत ट्रम्प प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या पूर्वीच्या 28 कलमी योजनेत बदल‌ केले आहे, ज्यावर कीवच्या काही पाश्चात्य मित्र राष्ट्रांनी ही कलमे  मॉस्कोला जास्त अनुकूल असल्याचे सांगत टीका केली होती.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शुक्रवारी सांगितले की वॉशिंग्टनचे शांतता प्रस्ताव युक्रेनमधील संघर्ष सोडवण्यासाठी संभाव्य पाया म्हणून काम करू शकतात, परंतु जर कीवने जर ही योजना नाकारली तर रशियन सैन्य पुढे जात राहील असा इशारा दिला.

क्रेमलिनचे सगळ्या घडामोडींवर लक्ष, मात्र बैठकीबाबत अद्याप अधिकृत माहिती नाही.

क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी पत्रकारांना सांगितले की, जिनेव्हा चर्चेच्या निकालांबाबत रशियाला अद्याप कोणताही अधिकृत संदेश मिळालेला नाही.

“अर्थातच, गेल्या काही दिवसांपासून जिनेव्हामधून येणाऱ्या मीडिया रिपोर्ट्सवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत, परंतु आम्हाला अद्याप कोणतीही बातमी अधिकृतपणे मिळालेली नाही,” पेस्कोव्ह म्हणाले. “आम्ही एक विधान वाचले की, जिनेव्हामधील चर्चेनंतर, आम्ही आधी पाहिलेल्या मजकुरात काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. मात्र आम्ही वाट पाहू. असे दिसते की संवाद सुरू आहे.”

सुधारित मसुद्यात युक्रेनच्या संभाव्य नाटो सदस्यत्वाबाबत सुधारित कलम समाविष्ट आहे, या वृत्तावर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. ज्यामुळे भविष्यात युक्रेनच्या नाटो प्रवेशाची शक्यता उघड होऊ शकते.

“हा मुद्दा खूप महत्त्वाचा आणि गुंतागुंतीचा आहे जो केवळ मीडिया रिपोर्ट्सद्वारे समजून भाष्य करण्यासाठी नाही,” असे पेस्कोव्ह म्हणाले. “येथे, अधिकृत माध्यमांद्वारे मिळालेल्या माहितीवर अवलंबून राहणे आवश्यक आहे.

पुढील अमेरिका-रशिया बैठकांबाबत तात्काळ योजना नाहीत

पेस्कोव्ह पुढे म्हणाले की या आठवड्यात रशियन आणि अमेरिकन वाटाघाटीकर्त्यांमध्ये चर्चेच्या नवीन फेरीची सध्या कोणतीही योजना नाही. राजनैतिक मार्गांनी कराराच्या मजकुराला दुजोरा मिळयाची वाट पाहत असताना मॉस्को यासंबंधीच्या घडामोडींवर लक्ष ठेवत राहील, असे त्यांनी सांगितले.

क्रेमलिनचा सावध सूर अमेरिकेच्या नेतृत्वाखालील शांतता प्रयत्नांबाबत सुरू असलेल्या अनिश्चिततेचे प्रतिबिंबीत करणारा आहे, ज्याचा उद्देश रशियाने युक्रेनवर पूर्ण-प्रमाणात आक्रमण केल्यानंतर तीन वर्षांहून अधिक काळ कीव आणि मॉस्कोमध्ये समान मुद्दा शोधणे आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleBEL-Safran भारतात संयुक्तपणे करणार हॅमरची निर्मिती
Next articleजपान: अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी घेतला जातोय आढावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here