ऑप. सिंदूरमधील ‘स्वदेशी’ संरक्षण उपकरणांच्या वापराने उंचावली देशाची मान!

0

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, यांनी सोमवारी एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, “ऑपरेशन सिंदूरमधील ‘स्वदेशी संरक्षण उपकरणांच्या’ प्रभावी वापरामुळे प्रादेशिक तसेच जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा लक्षणीयरीत्या वाढली आहे.”

सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्स (SIDM) च्या ‘संरक्षण स्वावलंबन: स्वदेशी उद्योगाद्वारे राष्ट्रीय सुरक्षा बळकट करणे’ या थीमवर आयोजित केलेल्या वार्षिक अधिवेशनात बोलताना, राजनाथ सिंह यांनी राष्ट्राचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी, स्वावलंबन आणि नवोपक्रम यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर जोर दिला.

सिंह यांना यावेळी, स्वदेशी बनावटीच्या आकाश क्षेपणास्त्र, ब्रह्मोस आणि आकाशतीर एअर डिफेन्स कंट्रोल सिस्टीम यांसारख्या प्रणालींच्या प्रभावी कामगिरीवर प्रकाश टाकला, तसेच त्यांच्या कार्यक्षमतेच्या यशामुळे अधोरेखित झालेल्या भारताच्या वाढत्या तांत्रिक क्षमतेचा उल्लेख केला. संरक्षणमंत्र्यांनी सशस्त्र दलांना आणि देशांतर्गत संरक्षण उद्योगांना, ज्यांना त्यांनी ‘उद्योग योद्धे’ (industry warriors) असे संबोधले, त्यांच्या ऑपरेशन सिंदूरमधील योगदानाबद्दल कौतुक केले.

सिंह म्हणाले की, “ऑपरेशन सिंदूरचा अभ्यास सातत्याने शिकण्यासाठी आणि भविष्यातील तयारीसाठी एक ‘केस स्टडी’ म्हणून केला गेला पाहिजे.” पुढे ते म्हणाले की, “या घटनेने आधुनिक संघर्षाचे अप्रत्याशित स्वरूप अधोरेखित केले आहे. आपण कोणत्याही आकस्मिक परिस्थितीसाठी तयार असले पाहिजे आणि आपली तयारी स्वदेशी क्षमतेवर आधारित असली पाहिजे.”

खाजगी कंपन्याना संरक्षण क्षेत्रात अधिकाधिक सहभाग घेण्यासाठी आवाहन करताना, सिंह यांनी देशांतर्गत उद्योगांना, मुख्य उपप्रणाली आणि घटकांच्या निर्मीतीवर लक्ष केंद्रित करण्याचे आणि पुरवठा तसेच देखभाल साखळीत आघाडी घेण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, “आपण हे सुनिश्चित केले पाहिजे की, भारताच्या संरक्षण उत्पादनांचा वापर केवळ इथल्यापुरता मर्यादित न राहता, खऱ्या अर्थाने ‘मेड इन इंडिया, मेड फॉर द वर्ल्ड’ अशी त्याची ओळख बनावी.

त्यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक मजबूत उत्पादन तळ तयार करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. तसेच क्वांटम मिशन, अटल इनोव्हेशन मिशन आणि नॅशनल रिसर्च फाऊंडेशन यांसारख्या उपक्रमांचा उल्लेख, मजबूत नवोपक्रम परिसंस्थना बळकटी देणारे माध्यम असा केला.

सिंह यांनी निदर्शनास आणून दिले की, भारताच्या संरक्षण उत्पादनात, 2014 मधील अंदाजे 46,000 कोटींच्या तुलनेत, आता 1.51 लाख कोटींपर्यंत प्रभावी वाढ झाली आहे. ज्यामध्ये खाजगी क्षेत्राचे योगदान 33,000 कोटी इतके आहे. दहा वर्षांपूर्वी 1,000 कोटींपेक्षा कमी असलेली संरक्षण निर्यात, आता अंदाजे 24,000 कोटींपर्यंत पोहोचली आहे. ते म्हणाले, “आम्हाला विश्वास आहे की, मार्च 2026 पर्यंत ही निर्यात 30,000 कोटींपर्यंत पोहोचेल.”

यावेळी त्यांनी, ‘संरक्षण खरेदी पुस्तिका 2025’ प्रदर्शित केल्याचे आणि पुढील प्रक्रियेत सुव्यवस्था आणण्यासाठी ‘संरक्षण संपादन प्रक्रिया 2020’ मध्ये सुधारणा केली जात असल्याचे देखील सांगितले. तसेच, ‘खाजगी क्षेत्रांना संरक्षण उत्पादनातील त्यांचा सध्याचा 25% वाटा, पुढील तीन वर्षांत किमान 50% पर्यंत वाढवण्याचे आवाहन केले.’

‘स्वदेशीकरण’ हाच एकमेव शाश्वत मार्ग आहे, याचा पुनरुच्चार करत सिंह यांनी स्पष्ट केले की: “देखभाल, दुरुस्ती आणि उत्पादनांचे सुटे भाग यासाठी आयात केलेल्या प्रणालींवर अवलंबून राहणे, पुढे जाऊन आर्थिक आणि सामरिक खर्च वाढवते.” त्यामुळे, “स्वदेशी उपकरणांनाच आपली मजबूत ढाल बनवणे, हे आपले मुख्य उद्दिष्ट असायला हवे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

मोठ्या प्रमाणात तांत्रिक उपायांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी स्वदेशी उद्योगांना प्रोत्साहित करताना, सिंह म्हणाले की, “iDEX आणि ADITI सारखे उपक्रम आधीच स्टार्टअप्स आणि नवीन विचारवंतांना सक्षम करत आहेत. पुढील वर्षी SIDM आपली दहा वर्षे पूर्ण करत असताना, मी आमच्या उद्योगांना एंड-टू-एंड स्वदेशी उत्पादने विकसित करण्याचे चॅलेंज स्विकारण्याचे आवाहन करतो. एकत्र येऊन, आपण भारताच्या संरक्षण भूभागाचे भविष्य पुन्हा नव्याने घडवूया, त्याला नवा आकार देऊया.”

या कार्यक्रमाला संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह, SIDM चे अध्यक्ष राजिंदर सिंह भाटिया, SIDM चे महासंचालक रमेश के, माजी अध्यक्ष एस.पी. शुक्ला, तसेच संरक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, उद्योग क्षेत्रातील नेते आणि युवा उद्योजक उपस्थित होते.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleMade-in-India Defence Equipment Showcased in Operation Sindoor Boosts India’s Global Standing: Rajnath Singh
Next articleInfantry Day 2025: The Day India Defended a Legally Acceded Kashmir

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here