MDAVF च्या गुंतवणूकीमुळे, संरक्षण क्षेत्रातील इंधन पायाभूत सुविधांना बळकटी

0

ऊर्जा पायाभूत सुविधांची सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रातील लवचिकता वाढवण्यासाठी, महाराष्ट्र डिफेन्स अँड एरोस्पेस व्हेंचर फंड (MDAVF) ने ‘अ‍ॅटम अलॉइज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या डीप-टेक स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. हा स्टार्टअप स्फोट-प्रतिरोधक इंधन साठवणूक तंत्रज्ञानासाठी ओळखला जातो.

ही गुंतवणूक, IDBI कॅपिटल मार्केटस् अँड सिक्युरिटीज लिमिटेड द्वारे करण्यात आली आहे. हे एक सरकार-समर्थित धोरणात्मक पाऊल असून, एलपीजी, डिझेल, पेट्रोल आणि नवीकरणीय इंधनाच्या साठवणुकीसारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांमध्ये स्फोट प्रतिबंधक प्रणालींचा वापर वाढवणे हा याचा उद्देश आहे. ‘अ‍ॅटम अलॉइज’ ने विकसित केलेली पेटंट सामग्री प्रणाली कोणत्याही सेन्सर किंवा रसायनांशिवाय स्फोट टाळण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

हे तंत्रज्ञान, लष्करी आणि व्यावसायिक दोन्ही स्तरांवर तपासले गेले आहे. गोळी लागून, घातपातामुळे किंवा मोठ्या बिघाडामुळेही स्फोट होत नाही, ज्यामुळे उच्च-धोका असलेल्या परिस्थितीतही ही प्रणाली प्रभावी ठरते.

भारत सरकारने ‘अ‍ॅटम अलॉइज’ ला ‘डीप टेक – सेफ्टी अँड सिक्युरिटी’ श्रेणीमध्ये, राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्काराने नुकतेच सन्मानित केले आहे. यामुळे राष्ट्रीय पायाभूत सुविधांच्या संरक्षणात ही कंपनी एक महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

‘IDBI कॅपिटल’ चे वरिष्ठ उपाध्यक्ष अमेय बेलोरकर यांनी सांगितले की, “अ‍ॅटम अलॉइज’ पायाभूत सुविधांच्या सुरक्षेसाठी नवीन मापदंड स्थापित करत आहे. ही केवळ आर्थिक गुंतवणूक नसून, राष्ट्रीय सुरक्षेसाठीची एक बांधिलकी आहे. त्यांचे निष्क्रिय आणि पुरस्कारप्राप्त तंत्रज्ञान हे भारताला इंधन क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी आवश्यक आहे.”

तर, ‘IDBI कॅपिटल’ चे सहाय्यक उपाध्यक्ष विक्रम जैन यांनी सांगितले की, “आम्ही राष्ट्रीय स्तरावरील आव्हाने सोडवणाऱ्या उपायांमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक आहोत. ‘अ‍ॅटम अलॉइज’ ने उद्दिष्ट आणि अचूकता यांचा उत्तम मेळ साधणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे.”

एका राष्ट्रीय संरक्षण विचारसरणीच्या वरिष्ठ विश्लेषकाने सांगितले, “हे तंत्रज्ञान केवळ आग विझवत नाही, तर युद्धभूमीसारख्या परिस्थितीतही स्फोट पूर्णपणे टाळते. हे एक मोठे बदल घडवणारे तंत्रज्ञान आहे.”

‘ऑपरेशन सिंदूर’ मधील हवाई आणि घातपाती हल्ल्यांनंतर, ऊर्जा पायाभूत सुविधांमधील असुरक्षितता समोर आली होती. यानंतर ‘MDAVF’ ची ही गुंतवणूक, राष्ट्रीय सुरक्षा धोरणांतील निष्क्रिय, प्रतिबंधात्मक संरक्षण तंत्रज्ञानाकडे भारताचा वाढता कल दर्शवते.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous article60 व्या शहीद वर्धापनदिनानिमित्त, कॅप्टन सी.एन सिंग यांचा गौरवपूर्वक सन्मान
Next articlePost-Operation Sindoor: Drones Become Frontline Assets as India Accelerates Drone-Centric Warfare

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here