महापौर योलांडा सांचेझ यांचा मृतदेह असलेली शवपेटी मेक्सिकोच्या मिचोआकन राज्यातील कोटीजा येथे बंदुकधाऱ्यांनी केलेल्या हत्येनंतर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आली होती. (इव्हान मॅसियस/रॉयटर्स)
मेक्सिकोच्या पश्चिमेकडील एका शहराच्या महिला महापौरांवर सोमवारी बंदूकधाऱ्यांनी हल्ला करत त्यांची हत्या केली. आठवडाभरापूर्वीच या देशाने आपली पहिली महिला अध्यक्ष निवडली होती.
स्थानिक वृत्तपत्रांनुसार, 2021 पासून मिचोआकन राज्यातील कोटीजाच्या महापौर असलेल्या योलांडा सांचेझ यांच्यावर 19 गोळ्या झाडण्यात आल्या. शहराच्या मध्यवर्ती भागात ही घटना घडली.
त्या आणि त्यांचा अंगरक्षक-ज्याला देखील गोळी लागली होती- दोघांचाही सोमवारी रुग्णालयात अति रक्तस्त्रावामुळे मृत्यू झाला. या घटनेचा तपास सुरू आहे.
मिचोआकनचे महाधिवक्ता एड्रियन लोपेज सोलिस यांनी बुधवारी एका निवेदनात म्हटले आहे की, “नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातत्याने धमक्या देण्यात येत होत्या, महापौरांनी त्यांच्या फेडरल फोर्सेसना कामे करण्यापासून रोखावे किंवा कामे टाळावीत अशी मागणी धमक्या देणाऱ्यांनी केली होती.”
कोटीजाच्या आसपास प्रादेशिक नियंत्रणावरून गुन्हेगारी टोळ्यांमध्ये वाद असल्याने अशा मागण्या महापौर पूर्ण करू शकले नाहीत, असे ते म्हणाले.
2023 मध्ये शेजारच्या जालिस्को राज्याच्या भेटीवर असताना संघटित गुन्हेगारी गट जालिस्को न्यू जनरेशन कार्टेलने (सीजेएनजी) सांचेझ यांचे अपहरण केले होते.
रविवारी संपलेल्या मेक्सिकोच्या सार्वत्रिक निवडणूक प्रचारादरम्यान किमान 39 राजकीय उमेदवारांची हत्या करण्यात आली.
मेक्सिकोत बऱ्याच काळापासून अंमली पदार्थ आणि संघटित कार्टेलशी संबंधित गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. जानेवारीमध्ये, उत्तर मेक्सिकोच्या सीमावर्ती राज्य नुएव्हो लिओनमधील तपास अधिकाऱ्यांना मॉन्टेरीच्या औद्योगिक केंद्राजवळील रस्त्यावर एका वाहनात किमान दहा जळालेले मृतदेह सापडले होते.
पण नंतर त्यांना जवळच आणखी चार मृतदेह, मानवी हाडे आणि आणखी दोन कवट्या सापडल्या.
या सगळ्या प्रकरणात नेमके किती बळी पडले आणि त्यांचा मृत्यू कसा झाला हे ठरवण्यासाठी तपास सुरू होता.
2000 दशकाच्या सुरुवातीला, मॉन्टेरीला जुन्या झेटास कार्टेलच्या हिंसाचाराने उद्ध्वस्त केले होते पण नंतरच्या काळात ते शांत झाले होते. त्याच कार्टेलचा एक फुटलेला गट, ईशान्येकडील कार्टेल, शेजारच्या तमौलिपास राज्यातील नुएव्हो लारेडो या सीमावर्ती शहरावर आपले नियंत्रण राखून आहे.
Army Chief General Upendra Dwivedi has embarked on a five-day official visit to France from February 24 to 27, to deepen bilateral military cooperation...