पंतप्रधान मोदींचा यंदा इटलीत होणाऱ्या जी-7 शिखर परिषदेतील सहभाग हा बहुध्रुवीयतेप्रती (multipolarity) भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो, असे विश्लेषकांचे मत आहे. 2019 पासून सलग पाचव्यांदा पंतप्रधान मोदी जी 7 परिषदेला उपस्थित राहणार आहेत
जगातील सात सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था आणि युरोपीय संघातील 27 सदस्य देशांचा समावेश असलेल्या जी-7साठी भारत अनोळखी नाही.
दोन दशकांपूर्वी जी-7 आउटरीच शिखर परिषदेसाठी भारताला पहिल्यांदा आमंत्रित करण्यात आले होते आणि आतापर्यंत 11 शिखर परिषदांना भारताने हजेरी लावली आहे. भारताच्या होत असलेल्या उदयाला मिळालेली मान्यता म्हणून याकडे पाहिले जाते.
पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी इटलीला निघालेल्या मोदी यांनी अपुलिया येथे सुरू झालेल्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर जी-7मधील अनेक देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या. पण युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांना त्यांनी मारलेल्या आश्वासक मिठी आणि संदेशाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
झेलेन्स्कीसोबतच्या त्यांच्या भेटीचा सारांश ‘एक्स’ वरील पोस्टमध्ये मांडताना ही भेट ‘अतिशय फलदायी’ ठरली आहे आणि भारत ‘संवाद, मुत्सद्देगिरीद्वारे शांततापूर्ण निर्णयाला प्रोत्साहन देत आहे.’
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेतल्यानंतर मोदी यांनी भारत-ब्रिटन सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. संरक्षण क्षेत्रातील संबंध आणखी दृढ करण्याबाबतही आम्ही बोललो, असे ते म्हणाले.
त्याचप्रमाणे, त्यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा ‘एक्स’ वर ‘मोन अमी’ (माझा मित्र) असा उल्लेख करत एकाच वर्षातील त्यांची ही चौथी बैठक भारत आणि फ्रान्स यांच्यातील दृढ संबंधांना भारताने दिलेले प्राधान्य प्रतिबिंबित करते असे सांगितले.
जी-7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचीही भेट घेतली.
मनोहर पर्रीकर इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड ॲनालिसिसच्या युरोप आणि युरेशिया सेंटरमधील फेलो डॉ. स्वस्ती राव यांनी स्ट्रॅटन्यूज ग्लोबलला सांगितले की, भारताने जी-7 देशांशी केवळ एक गट म्हणून नव्हे तर द्विपक्षीय पातळीवरही संबंध वाढवणे योग्य ठरेल.
“कॅनडाव्यतिरिक्त, भारताचे सामूहिकपणे पाश्चिमात्य देशांशी असलेले द्विपक्षीय संबंध सध्या अपवादात्मकरीत्या चांगले आहेत आणि त्याचा फायदा उठवण्याची हीच योग्य वेळ आहे. भूमध्य आणि इंडो पॅसिफिकमधील पाश्चिमात्य भागीदारांच्या सहकार्यासाठी खूप वाव आहे, जे एक पूर्णपणे नवीन क्षेत्र आहे “, असे त्या म्हणाल्या.
जागतिक आर्थिक व्यवस्था बहुध्रुवीय राहणार आहे आणि असे पर्याय खुले ठेवणे भारताच्या हिताचे आहे, असे त्या म्हणाल्या. “भारत बहुतेक आर्थिक बहुपक्षीय गटांचा एक भाग होणार आहे कारण आर्थिक क्षेत्रात आपल्यात बहुध्रुवीयता आहे. बहुआयामी जागतिक दृष्टिकोनावर अधिक लक्ष केंद्रित केल्याने भारताला डावपेचांना वाव मिळेल.”
मात्र भारताचे आर्थिक हितसंबंध आज पूर्णपणे पाश्चिमात्य देशांशी निगडीत आहेत यात शंका नाही, असे त्यांना वाटले. “हे अगदी स्पष्ट आहे की भारताचे मोठे भागीदार हे सगळे पाश्चात्य देश आहेत. आपल्या हितसंबंधांचे प्राधान्य पाश्चिमात्य देशांकडे आहे.
‘जवळजवळ दोन दशकांपासून जी 7 शिखर परिषदेत भारताची नियमित उपस्थिती, जी 7 चा सदस्य नसलेल्या चीनला प्रचंड त्रास देणारी आहे. जी 7 च्या संदर्भात भारत बहुतांश निर्णयांमध्ये कसा सहभागी होत आहे याकडे चीनचे बारकाईने लक्ष आहे. यामुळे भारताचे जागतिक स्तरावरील स्थानदेखील दिसून येते कारण भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे.”
जी 7 आउटरीच समिटमध्ये भारताची उपस्थिती केवळ ग्लोबल साऊथ या कारणांपुरतीच मर्यादित नाही. “जी 7 स्तरावरील धोरणे आणि नियोजनाचा थेट परिणाम भारतासह G 20 च्या अर्थव्यवस्थेवर होतो,” असंही त्या म्हणाल्या.
परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी एआय, ऊर्जा, आफ्रिका आणि भूमध्य सागरावर लक्ष केंद्रित करणार आहेत.
भारत हा एक प्रमुख देश आणि तिथे एक प्रचंड मोठी लोकशाही आहे प्रत्येकजण भारतावर स्थैर्य आणणारा घटक म्हणून विश्वास ठेवत आहे कारण ग्लोबल साऊथमध्ये त्याला महत्त्वाचे स्थान आहे,” असे जी 8चे माजी इटालियन शेरपा आणि जी 20चे राजदूत जिआम्पिएरो मासोलो म्हणाले.
इटलीला रवाना होण्यापूर्वीच्या आपल्या निवेदनात, मोदी यांनी इटलीला याआधी झालेले दौरे आणि पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या भारत भेटीला उजाळा दिला. द्विपक्षीय संबंध वाढवण्यात या दौऱ्याची महत्त्वपूर्ण योगदान आहे. “आम्ही भारत-इटली धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी आणि इंडो-पॅसिफिक आणि भूमध्य प्रदेशातील सहकार्य वाढवण्यासाठी वचनबद्ध आहोत,” असे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.
अत्यंत व्यस्त वेळापत्रक असूनही, मोदी यांनी पाच मिनिटे इटलीत स्थायिक झालेल्या भारतीयांना भेटण्यासाठी आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी राखून ठेवली होती.
तृप्ती नाथ