पंतप्रधान नरेंद्र मोदी, दोन दिवसीय वॉशिंग्टन दौऱ्यावर जाणार असून, 13 फेब्रुवारी रोजी ते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या टीमसोबत डिनर करतील अशी अपेक्षा आहे. मोदी यांच्या या दौऱ्यामध्ये कोणत्या महत्वपूर्ण विषयांवर चर्चा होईल, कोणते महत्वाचे निर्णय घेतले जातील याकडे सर्व जगाचे लक्ष लागून आहे.
कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडो-पॅसिफिक स्टडीजचे संस्थापक आणि मानद- अध्यक्ष प्रोफेसर चिंतामणी महापात्रा, हे भारतातील आघाडीच्या आंतरराष्ट्रीय संबंध तज्ञांपैकी एक आहेत. त्यांनी JNU, नवी दिल्ली येथील स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमध्ये माजी प्रो-व्हाईस चान्सलर आणि अमेरिकन स्टडीजचे प्राध्यापक म्हणून काम पाहिले असून, ते भारतातील आंतरराष्ट्रीय कामकाज परिषद (Indian Council of World Affairs) च्या प्रमुख प्रकाशन ‘इंडिया क्वार्टरली’चे संपादक देखील आहेत.
‘द जिस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत, प्रोफेसर महापात्रा यांनी- भारत-यू.एस. धोरणात्मक संबंध अध्यक्ष ट्रम्प यांच्या दुसऱ्या राजकीय कार्यकाळात मजबूत होऊ शकतात, असे त्यांना का वाटते याविषयी सांगितले आहे. तसेच यातील काही त्रासदायक बाबी आणि ट्रम्प यांच्या चंचल व्यक्तिमत्त्वावर देखील त्यांनी भाष्य केले आहे.
भेटीसंदर्भातील काही मुख्य मुद्दे:
• पंतप्रधान मोदींची भेट जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर होते आहे, ज्यावेळी युक्रेन आणि पश्चिम आशियामध्ये युद्ध चालू आहेत.
• यामुळे जागतिक अर्थव्यवस्था अडचणींत आली असून, आर्थिक आणि व्यापार चर्चांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
• भारत ही जगातील सर्वात वेगाने प्रगती करणारी अर्थव्यवस्था आहे आणि अमेरिका आर्थिक भागीदारीला प्राधान्य देते.
• मोदींची ही भेट भारत आणि यू.एस. यांच्यातील धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्याच्या हेतूने आहे. विशेषत: संरक्षण, सुरक्षा आणि व्यापार या क्षेत्रांतील भागीदारी.
मोदी-ट्रम्प भेटीतील अपेक्षा:
• बायडन यांचे सरकार असताना, अमेरिका-भारतामध्ये उद्भवलेल्या मतभेदांचे व्यवस्थापन करणे.
• ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात (ट्रम्प 1.0) मोदी आणि त्यांच्यात तयार झालेले दृढ हितसंबंध, भविष्यात अधिक मजबूत करण्यावर भर देणे.
• विशेषतः Indo-Pacific मधील संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य बळकट करणे.
• Indo-Pacific मधील तणावादरम्यान नेव्हिगेशनचे स्वातंत्र्य आणि प्रादेशिक स्थिरता सुनिश्चित करणे.
• दोन्ही देशातील आर्थिक संबंधांचा विस्तार करणे आणि द्विपक्षीय वाढीला कायम ठेवणे.
बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांचे निर्वासन
• भारताने केवळ अशाच स्थलांतरितांना स्विकारण्याचे मान्य केले आहे, जे भारतीय नागरिक असल्याचे ठोस प्रमाण देतात.
• भारत सरकारची भूमिका, व्यवहारातील कायदेशीरता टिकवून ठेवणे आणि कागदपत्र नसलेल्या स्थलांतराला समर्थन न देणे, अशी राहील.
• यामुळे इमिग्रेशनच्या मुद्द्यांवर अमेरिकेला सहकार्य करण्याची भारताची इच्छा स्पष्ट होते, ज्याचा ट्रम्प प्रशासनावर सकारात्मक प्रभाव निर्माण होऊ शकतो.
• बेकायदेशीर निर्वासितांची ओळख पडताळणी करणे हे एक आव्हान आहे, कारण अनेक व्यक्ती भारतीय वंशाचे असल्याचा दावा करतात मात्र मुळात ते भारतीय नसतात.
भारत-यू.एस. संबंधांची मजबूती
• भारतीय सरकार मोदींच्या या भेटीबद्दल आणि त्याच्या परिणामांबद्दल आशावादी आहे.
• मोदी- ट्रम्प यांच्यातील वैयक्तिक नातेसंबंध मजबूत आहेत, जे दोन्ही देशातील संबंध सुधारण्यास फायदेशीर ठरु शकतात.
• भारतीय आणि अमेरिकन वंशाचे लोक व्यवसाय, राजकारण आणि शास्त्रशिक्षण क्षेत्रात प्रभावी स्थानांवर असल्यामुळे, हे संबंध बळकट करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
• यू.एस. सरकारमधील भारतीय वंशाचे अधिकारी दोन्ही देशांमधील सामंजस्य वाढविण्यास मदत करतात.
द चीन फॅक्टर
• ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील संभाव्य व्यापार कराराविषयी अनेक अफवा आहेत.
• यूएस-चीन करारामुळे भारताच्या धोरणात्मक आणि आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. मात्र सध्यातरी असा कुठलाही करार होण्याची शक्यता नाही.
• व्यापार संघर्ष टाळण्यासाठी भारत- अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांसोबतचे संबंध संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.
• अमेरिका आणि चीन यांच्यात सध्या जागतिक नेतृत्वासाठी स्पर्धा सुरु आहे, जे भू-राजकीय लँडस्केपवर परिणाम करतात.
सातत्य नियम
नेतृत्वातील बदलांनंतरही, तंत्रज्ञान, संरक्षण आणि व्यापारातील प्रमुख सहकार्य सुरू राहण्याची अपेक्षा आहे.
• अमेरिकेतील द्विपक्षीय समर्थन राजकीय बदलांची पर्वा न करता, भारत-यू.एस. संबंधांना स्थिर ठेवते,
• माजी अध्यक्ष जो बायडन यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार- जेक सुलीव्हन, यांची अखेरची भारत भेट ही- धोरणात्मक सहकार्याच्या सातत्याचे सूचक आहे.
1. व्यापार आणि दर- व्यापार धोरणे, दर आणि बाजारपेठेतील प्रवेशासंबंधीचे मतभेद अनिर्णीत राहतात.
2. खलिस्तानी अतिरेकी- अमेरिकेत कार्यरत असलेल्या खलिस्तान समर्थक घटकांबद्दल, भारत चिंतेत आहे आणि कठोर कारवाई करू इच्छित आहे.
3. यूएस कमिशन ऑन रिलिजियस फ्रीडम रिपोर्ट्स- भारताला हे अहवाल पक्षपाती आणि दिशाभूल करणारे वाटतात.
4. भारतीय स्थलांतरितांबद्दल गैरसमज- भारतीय व्यावसायिकांचे महत्त्वपूर्ण योगदान असूनही, अमेरिका त्यांच्या नोकऱ्या काढून घेते आहे.
5. यूएस-रशिया संबंध- भारताच्या रशियासोबतच्या वाढत्या संबंधांमुळे, अमेरिकेसोबत मतभेद होऊ शकतात.
भविष्यातील संधी
1. तंत्रज्ञान आणि संरक्षण सहकार्य- प्रगत तंत्रज्ञान आणि संरक्षण प्रणालींमध्ये मजबूत सहकार्य करणे.
2. आर्थिक वाढ- दोन्ही देशांसाठी लाभदायक व्यापार संबंध आणि गुंतवणूक संधींना बळकट करणे.
3. इंडो-पॅसिफिक मध्ये धोरणात्मक भागीदारी- चीनच्या वाढत्या प्रभावाचा प्रतिकार करण्यासाठी भारत-यु.एस. मध्ये सामायिक दृष्टिकोन निर्माण करणे.
4. भारतीय वंशाच्या समुदायाचा प्रभाव- भारतीय आणि अमेरिकन समुदायाचा राजकारण आणि व्यवसायातील प्रभावाचा उपयोग करुन घेणे.
5. QUAD सहयोग – क्षेत्रीय सुरक्षा वाढवण्यासाठी QUAD (भारत, यू.एस., जपान, ऑस्ट्रेलिया चतुर्भुज सुरक्षा संबंध) संबंधांमध्ये कायमस्वरुपी सहकार्य प्रस्थापित करणे.
QUAD चे भविष्य
QUAD (Quadrilateral Security Dialogue) दोन्ही देशांसाठी कायमच एक धोरणात्मक प्राधान्य राहिले असून, अमेरिका आणि भारत त्याच्या वाढीसाठी वचनबद्ध आहेत.
• ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातील प्रशासनाने, QUAD चे पुनरुज्जीवन करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. भविष्यातही ही भूमिका सक्रिय राहण्याची अपेक्षा आहे.
• QUAD केवळ चीनचा सामना करण्यासाठी नाही तर व्यापक क्षेत्रीय सुरक्षा आणि आर्थिक उपक्रमांवरही लक्ष केंद्रित करण्यासाठी स्थापन केले गेले आहे.
निष्कर्ष
• मोदींचा वॉशिंग्टन दौरा भारत आणि अमेरिकेतील सर्वच क्षेत्रांमधले संबंध मजबूत करण्याची एक मोठी संधी आहे.
• व्यापार, सुरक्षा आणि इमिग्रेशन धोरणांमध्ये अनेक आव्हाने असूनही, दोन्ही राष्ट्रांचा एकूणच दृष्टीकोन हा सकारात्मक आहे.
• दोन्ही देश संरक्षण, व्यापार आणि प्रादेशिक स्थिरतेवर लक्ष केंद्रित करून, आपापसातील धोरणात्मक भागीदारी अशीच सुरू ठेवण्याचे आणि ती वृद्धिंगत करण्याचे उद्दिष्ट ठेवतात.
संपूर्ण मुलाखत: