महिलांना गर्भपात करण्याचा घटनात्मक अधिकार देणारा फ्रान्स ठरला जगातला पहिला देश

0

महिलांना गर्भपात  करण्याचा घटनात्मक अधिकार देणारा फ्रान्स  हा जगातील पहिला देश ठरला आहे. फ्रान्स संसदेच्या संयुक्त सभागृहात गर्भपाताच्या अधिकाराशी संबंधित विधेयकाच्या बाजूने ७८० तर विरोधात ७२ मतं पडली.

सिनेट आणि असेंब्ली या दोघांनीही या प्रस्तावाला यापूर्वीच मान्यता दिली होती. व्हर्सायच्या राजवाड्यात सोमवारी झालेल्या दोनही सभागृहांच्या झालेल्या विशेष संयुक्त मतदानाद्वारे त्याचे कायद्यात रूपांतर करण्यात आले. फ्रानसच्या राज्यघटनेत सुधारणा करण्यासाठी किमान तीन पंचमांश (3/5) बहुमताची आवश्यकता असते.

अमेरिकेसह पश्चिमेकडील विविध देशांमध्ये गर्भपाताच्या निर्णयाला आव्हान दिले जात असताना त्याला घटनात्मक हक्कामध्ये समाविष्ट करण्याचे फ्रान्सचे धोरण म्हणूनच वेगळे ठरले आहे. व्हॅटिकनने याआधीच घोषित केले की “सार्वत्रिक मानवी हक्कांच्या युगात, मानवी जीव घेण्याचा विचार हा ‘अधिकार’ असू शकत नाही”. मात्र चर्चच्या या विरोधाला न जुमानता फ्रानसने हे पाऊल उचलले आहे.

या निर्णयानंतर फ्रान्समध्ये आयफेल टॉवर समोर महिलांनी “माय बॉडी, माय चॉइस” म्हणत सेलिब्रेशन केले. मजकूर “काँग्रेसच्या शिक्का” द्वारे प्रमाणित केल्यानंतर आणि सरकारला पाठविला जातो. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या कार्यालयाने सांगितले की, दुरुस्तीचे चिन्हांकित करण्याचा औपचारिक समारंभ शुक्रवारी आंतरराष्ट्रीय महिला हक्क दिनी आयोजित केला जाईल. या नव्या कायद्याचा औपचारिक सोहळा शुक्रवारी, आंतरराष्ट्रीय महिला हक्क दिनी आयोजित केला जाईल असे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले आहे.

फ्रान्समध्ये १९७५ पासून गर्भपात कायदेशीर आहे. मात्र अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने 2022 मध्ये रो विरुद्ध वेड यांच्यामधील निकाल फेटाळून, राज्यांना या भावनिक मुद्द्यावर वैयक्तिकरित्या निर्णय घेऊ द्यावा असे सांगितल्यामुळे आता या नवीन अधिकाराकडे संरक्षण घेण्याचा एक मार्ग म्हणून पाहिले जात आहे.

फ्रान्सचे पंतप्रधान गॅब्रिएल अटल यांनी या विधेयकावर प्रतिक्रिया देताना म्हटले , ‘आम्ही सर्व महिलांना संदेश देत आहोत की शरीर तुमचे आहे आणि त्याचे काय करायचे ते इतर कोणीही ठरवणार नाही.’ “आता इतिहासाला वर्तमानाने उत्तर दिले पाहिजे. हा अधिकार आपल्या घटनेत समाविष्ट करणे म्हणजे भूतकाळातील शोकांतिका, त्यामागील दु:ख आणि वेदना यांचे दार बंद करणे होय. त्यामुळे प्रतिक्रियावाद्यांना महिलांवर टीका करण्यापासून रोखता येईल.”

“आपण हे विसरू नये की याला पुन्हा विरोध होऊ शकतो. ते कधीही होणार नाही याची खातरजमा करण्यासाठी प्रत्यक्ष कृती करूया “, असे ते म्हणाले. “मी आपल्या सीमेवरील आणि त्यापलीकडच्या सर्व महिलांना सांगतो की आज आशेच्या जगाचे युग सुरू होत आहे.”

रामानंद सेनगुप्ता


Spread the love
Previous articleराष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून निक्की हेली बाहेर; ट्रम्प बायडेनमध्ये थेट लढत
Next articleCargo Confiscated From Pak-bound Ship Can Be Utilised For Military Purpose, Per DRDO Report

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here