शुक्रवारी म्यानमारमध्ये आलेल्या शक्तिशाली भूकंपानंतर, तिथली परिस्थीती अतिशय गंभीर असून, मृतांचा आकडा 1000 च्या वर पोहचल्याचे वृत्त समोर आले आहे. दरम्यान, भूकंपप्रवण क्षेत्रात बचाव कार्य वेगाने सुरू आहे.
मध्य म्यानमारमधील सागाईंग शहराजवळ शुक्रवारी आलेल्या 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची खोली कमी होती आणि त्यामुळे देशाच्या विस्तृत भागात व्यापक विध्वंस पाहायला मिळाला.
व्यापक विध्वंस
या प्रचंड तीव्रतेच्या भूकंपामुळे म्यानमारमध्ये व्यापक विध्वंस झाला आहे.
मंडले शहरात, अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या असून, स्थानिक लोकही बचावकार्यात मोठ्या प्रमाणावर सहभागी होताना दिसत आहेत.
जवळपास शंभर वर्ष जुना ‘अव ब्रिज’, जो सागाईंगपासून इरावदी नदीपर्यंत विस्तारला होता, तो देखील भूकंपाच्या धक्क्यामुळे वाहत्या पाण्यात कोसळला.
म्यानमार दोन भूगर्भीय प्लेट्सच्या सीमेवर स्थित आहे आणि हा जगातील सर्वात भूकंपीय सक्रिय देशांपैकी एक आहे. तथापि, सगाईंग प्रदेशात मोठ्या आणि विध्वंसक भूकंपांचे प्रमाण तुलनेने कमी आहे.
“इंडिया प्लेट आणि युरेशिया प्लेट यांच्यातील प्लेट सीमा साधारणतः उत्तर-दक्षिण दिशेने आणि देशाच्या मध्यभागातून जात आहेत,” असे लंडन युनिव्हर्सिटी कॉलेजच्या भूकंप तज्ज्ञ आणि प्राध्यापक जोआन्ना फॉरे वॉकर यांनी सांगितले.
त्यांनी सांगितले की, “या प्लेट्स एकमेकांच्या दिशेने भिन्न वेगाने पुढे सरकतात. ज्यामुळे “स्ट्राइक स्लिप” भूकंप होतात जे सामान्यतः “सबडक्शन झोन” (जसे की सुमात्रा भूकंप) मध्ये होणाऱ्यां भूकंपापेक्षा कमी शक्तिशाली असतात, जिथे एक प्लेट दुसऱ्या प्लेटखाली सरकते, ज्यामुळे ते 7 ते 8 मॅग्निट्यूडपर्यंत पोहोचू शकतात.”
मदतीसाठी विनंती
भूकंपामुळे झालेल्या विध्वंसाची तीव्रता पाहता, म्यानमारच्या सैन्याने आंतरराष्ट्रीय मदतीसाठी विनंती केली आहे.
सत्ताधारी पक्ष जंताच्या प्रमुखांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “कोणताही देश, कोणतीही संघटनेला साहाय्यासाठी पुढे येऊ शकतात, परदेशी साहाय्यासाठी आम्ही सर्व मार्ग खुले ठेवले आहेत.”
याला प्रतिसाद म्हणून, मदतीच्या ऑफर्सचा ओघ सुरु झाला आहे, ज्यामध्ये भारत म्यानमारच्या मदतीसाठी पुढे आलेला पहिला देश ठरला आहे.
मातीच्या ढिगाऱ्यात कामगारांचा शोध
थायलंडची राजधानी बँकॉक, जिथे भूकंपाच्या केंद्रापासून 1,000 किलोमीटर (620 मैल) अंतरावर, शनिवारी एका बचाव मोहिमेचा वेग वाढवण्यात आला, ज्यामध्ये 33 मजली टॉवरच्या ढिगाऱ्यात दबलेल्या बांधकाम कामगारांचा शोध घेतला जात होता.
“आम्ही आमच्या बाजूने सर्व काही करू, त्यांचा जीव वाचवण्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न करु, त्याकरता सर्व रिसोर्सेस वापरु,” असे बँकॉकचे गव्हर्नर चॅडचार्ट सिट्टीपुंट यांनी साइटवरुन सांगितले. यावेळी एक्स्केव्हेटर्स ढिगारे हलवत होते आणि ड्रोनच्या साहाय्याने मातीच्या ढिगाऱ्यात जीवित असलेल्या लोकांचा शोध सुरु होता.
बँकॉकमध्ये शुक्रवारी स्थिती संथ झाल्यानंतर चॅडचार्ट यांनी सांगितले की, “शंभराहून अधिक लोक शहरातील उद्यांनांमध्ये रात्री काढली होता, परंतु आता हळूहळू स्थिती सुधारत असल्याचे ते म्हणाले.”
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सट्या इनपुट्ससह)