पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांना शनिवारी श्रीलंकेचा सर्वोच्च नागरी सन्मान “मित्र विभूषण”ने सन्मानित करण्यात आले. ते सध्या श्रीलंकेच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत.
श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार डिसानयके यांच्याकडून पंतप्रधान मोदींनी हा सन्मान स्विकारला.
“हा पुरस्कार म्हणजे भारताच्या 1.4 अब्ज लोकांचा आदर आहे,” अशा शब्दांत मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
सन्मान स्विकारल्यानंतर मोदी यांनी X वर लिहिले की: “आज मला राष्ट्रपती डिसानयके यांच्याकडून, ‘श्रीलंका मित्र विभूषण’ हा सन्मान मिळणे ही माझ्यासाठी अत्यंत गर्वाची बाब आहे. हा सन्मान फक्त माझा नाही, तर तो भारताच्या 1.4 अब्ज लोकांचा सन्मान आहे. हा सन्मान भारत आणि श्रीलंकेतील गहिरे मित्रत्व आणि ऐतिहासिक संबंध दर्शवितो.”
“या सन्मानासाठी मी श्रीलंकेचे राष्ट्रपती, सरकार आणि सर्व नागरिकांचे हार्दिक आभार व्यक्त करतो,” असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे श्रीलंकेच्या राष्ट्रपती अनुरा कुमार डिसानयके यांच्या आमंत्रणावर श्रीलंकेत आले होते, त्यांनी शनिवारी राष्ट्रपती सचिवालयाला भेट दिली.
“पंतप्रधान मोदी यांचे राष्ट्रपती सचिवालयात आगमन झाल्यावर, डिसानयके यांनी त्यांचे स्वागत केले,” असे श्रीलंकन राष्ट्रपतींच्या वेबसाइटवरून प्रकाशित केलेल्या एका निवेदनात सांगितले आहे.
सर्वसमावेशक स्वागत
मोदी, जे शुक्रवारी संध्याकाळी श्रीलंकेत पोहोचले, त्यांचे शनिवारी सकाळी कोलंबोमधील इंडिपेंडन्स स्क्वेअरवर औपचारिक स्वागत करण्यात आले.
श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी मोदींचे इंडिपेंडन्स स्क्वेअरवर स्वागत केले.
शुक्रवारी संध्याकाळी बँडरनाईक इंटरनॅशनल एअरपोर्टवर श्रीलंकेच्या पाच प्रमुख मंत्र्यांसह, परराष्ट्रमंत्री विजिता हेराथ यांनी भारतीय पंतप्रधानांचे स्वागत केले.
पंतप्रधान मोदी यांनी X वर लिहीले की, “मी कोलंबोला पोहोचलो तेव्हा विमानतळावर माझे स्वागत करणाऱ्या सर्व मंत्र्यांचे आणि मान्यवरांचे आभार. श्रीलंकेत आयोजित कार्यक्रमांची मी उत्सुकतेने प्रतिक्षा करत आहे.”
BIMSTEC शिखर परिषद
मोदी हे पहिले परदेशी नेते आहेत, ज्यांना श्रीलंकेचे राष्ट्रपती डिसानयके होस्ट करत आहेत.
मोदी श्रीलंका येथे, BIMSTEC शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी थायलंडच्या दोन दिवसीय दौऱ्यानंतर, श्रीलंकेत पोहोचले.
टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNS च्या इनपुट्ससह)