रशियाशी संबंध ठेवल्यास भारतासह अन्य देशांवर निर्बंध लागू शकतात: NATO

0

“ब्राझील, चीन आणि भारत यांसारख्या देशांना रशियाशी व्यावसायिक संबंध कायम ठेवल्यास, गंभीर द्वितीयक निर्बंधांचा सामना करावा लागू शकतो,” असा इशारा NATO चे सरचिटणीस जनरल मार्क रुटे यांनी बुधवारी दिला.

रुटे यांनी हे विधान, अमेरिकेन काँग्रेसमधील सिनेटर्सशी चर्चेदरम्यान केले, जेव्हा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनसाठी नवीन शस्त्रास्तांची घोषणा केली, आणि जर 50 दिवसांत शांतता करार झाला नाही तर, रशियन निर्यात खरेदी करणाऱ्यांवर 100% द्वितीयक कर आकारण्याची धमकी दिली.

“माझी या तीन देशांना, विशेषतः बीजिंग, दिल्ली किंवा ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांना विनंती आहे की, तुम्ही याकडे लक्ष द्यायला हवे, कारण याचा तुमच्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो,” असे रुटे यांनी पत्रकारांना सांगितले.

रुटे पुढे म्हणाले की, “त्यामुळे कृपया व्लादिमीर पुतिन यांना फोन करून सांगा की, त्यांना शांतता चर्चा गांभीर्याने घ्यावी लागेल, नाहीतर याचा ब्राझील, भारत आणि चीनवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होईल.” त्यांनी सोमवारी ट्रम्प यांची भेट घेतली आणि नवीन उपायांवर सहमती दर्शवली.

50 दिवसांचा विलंब

रिपब्लिकन यूएस सिनेटर थॉम टिलिस, यांनी ट्रम्प यांच्या निर्णयाचे कौतुक केले, पण 50 दिवसांच्या विलंबावर चिंता व्यक्त केली.

टिलिस म्हणाले की, “पुतिन या 50 दिवसांचा वापर युद्ध जिंकण्यासाठी किंवा अधिक लोकांना ठार मारून आणि अधिक भूभाग ताब्यात घेऊन, शांतता करारासाठी चांगल्या स्थितीत वाटाघाटी करण्यासाठी करु शकतात.”

पुढे ते म्हणाले की, “त्यामुळे आपण युक्रेनच्या सद्यस्थितीकडे पाहून असे म्हटले पाहिजे की, तुम्ही पुढील 50 दिवसांत काहीही केले तरी, तुमची कोणतीही उपलब्धी (युद्धात मिळवलेला प्रदेश) विचारात घेतली जाणार नाही.”

रुटे म्हणाले की, “युरोप युक्रेनला शांतता चर्चेत सर्वोत्तम स्थान मिळावे यासाठी निधी उपलब्ध करून देईल.”

त्यांनी सांगितले की, “ट्रम्प यांच्याशी झालेल्या करारानुसार, अमेरिका आता युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्रे पुरवेल. फक्त हवाई संरक्षणच नाही तर, क्षेपणास्त्रे आणि युरोपियन लोकांनी खर्च केलेला दारूगोळा देखील पुरवेल.”

युक्रेनसाठी लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांवर चर्चा सुरू आहे का असे विचारले असता, रुटे म्हणाले की: “ही बचावात्मक आणि आक्रमक अशी अनेक प्रकारची शस्त्रे आहेत, परंतु आम्ही याबाबत राष्ट्रपतींशी सविस्तर चर्चा केलेली नाही. पेंटागॉन, युरोपमधील मित्र राष्ट्रांचे सर्वोच्चकमांडर आणि युक्रेनियन लोकांसह यावर ते काम करत आहेत.”

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सकडून इनपुट्ससह)

+ posts
Previous articleIndia Joins Massive Multinational Military Drill in Australia as China Watches Closely
Next article100% Made-in-India AK-203 Rifle Still A Few Steps Away

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here