सर्जन व्हाइस ॲडमिरल कविता सहाय यांनी 14 ऑक्टोबर 24 रोजी महासंचालक वैद्यकीय सेवा (नौदल) म्हणून पदभार स्वीकारला. 30 डिसेंबर 1986 रोजी फ्लॅग ऑफिसर म्हणून लष्करी वैद्यकीय विभागात त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. पुणे येथील प्रतिष्ठित सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाच्या त्या माजी विद्यार्थिनी आहेत. त्यांनी नवी दिल्लीच्या प्रतिष्ठित एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान महाविद्यालयामधून पॅथॉलॉजीमध्ये विशेष आणि ऑन्कोपॅथॉलॉजीमध्ये अतिविशेष प्राविण्य मिळवले आहे. त्या आर्मी हॉस्पिटल रिसर्च आणि रेफरल आणि बेस हॉस्पिटल दिल्ली कँट मधील प्रयोगशाळा विज्ञान विभागाच्या प्राध्यापक आणि प्रमुख असल्याचे नौदलाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
त्या एएफएमसी, पुणे येथे पॅथॉलॉजी विभागाच्या प्राध्यापक म्हणूनही कार्यरत आहेत.
या ठिकाणी निवड होण्यापूर्वी त्या लष्करी वैद्यकीय विभाग केंद्र आणि महाविद्यालय आणि O i/C रेकॉर्डच्या पहिल्या महिला कमांडंट होत्या.
याशिवाय लष्करी वैद्यकीय विभागाच्या कर्नल कमांडंट म्हणून निवड झालेल्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत.
वैद्यकीय शिक्षणाच्या प्रगतीसाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना वर्ष 2013-14 मध्ये अमेरिकेतल्या फिलाडेल्फिया येथील प्रतिष्ठित फाउंडेशन फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ इंटरनॅशनल मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (FAIMER) या संस्थेने फेलोशिप दिली आहे.
ध्वज अधिकारी व्हाइस ॲडमिरल कविता सहाय यांना उत्कृष्ट सेवेसाठी 2024 मध्ये सेना पदक तर 2018 मध्ये विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे.